निसर्ग - कऱ्हाड

निसर्ग - कऱ्हाड निसर्गावर प्रेम करूया, निसर्गाची काळजी घेऊया

*सौ गुंजीकर मॅडम* यांनी मागील वर्षी आपल्या वृक्ष दत्तक उपक्रमातून 4 जांभळाची छोटी रोप दत्तक घेतली होती त्यांची छान काळजी...
09/07/2026

*सौ गुंजीकर मॅडम* यांनी मागील वर्षी आपल्या वृक्ष दत्तक उपक्रमातून 4 जांभळाची छोटी रोप दत्तक घेतली होती त्यांची छान काळजी घेऊन वाढवली आणि आता ती सक्षम झाल्यावर आज त्यांनी आपल्याकडे सुपूर्त केली

या सेवेबद्दल त्यांचे व त्यांच्या परिवाराचे मनपुर्वक धन्यवाद 🙏🙏

लवकरच आपण या रोपांचे योग्य ठिकाणी रोपण करून निसर्गाच्या स्वाधीन करूयात

08/07/2026

बघा विचार करा

05/07/2026

दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला म्हणायची वेळ आली आहे. दुसरे झाडे लावतील मग आपण जगु हे आता विसरा.. स्वतः श्वास घेताय ना तर झाडे लावा झाडे जगवा 🌳🌳

🌳 *आजची निसर्गसेवा* 🌳 आज दि 5/7/2026 रोजी आगाशिव पायथ्याशी वनविभाग पक्षीतीर्थ जवळ गडावर पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता...
05/07/2026

🌳 *आजची निसर्गसेवा* 🌳

आज दि 5/7/2026 रोजी आगाशिव पायथ्याशी वनविभाग पक्षीतीर्थ जवळ गडावर पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता आपण बनविलेल्या बंधाऱ्यात यावे यासाठी 2 फूट रुंद आणि अंदाजे 50 फूट रुंद चर खोदून त्याला उतरत्या बाजूला दगड आणि माती लावण्यात आली शिर्के परिवार आणि अमेय व त्याचे मित्र आल्याने खुप कमी वेळात लांब चर करता आली

यासोबत *सौ सुनेत्रा पाटील मॅडम* यांनी आपल्या दत्तक उपक्रमात घेऊन 3 वर्ष डब्यात वाढविलेल्या वडाच्या रोपाचे आज वाढदिवसानिमित्त (वाढदिवस 30 जून ला होता) आगाशिव पायथ्याशी रोपण करण्यात आले

डोंगरावर छान पाऊस सुरू असल्याने वातावरण एकदम मस्त आहे जमिनीत पाणी ही मुरत आहे त्यामुळे आपली सर्व झाडे वाढत आहेत पक्षितीर्थ मध्ये ही छान पाणी साठले आहे

आजच्या निसर्गसेवेत
*चि राणा पवार*
*चि वरुण जाधव*
*चि अमेय शिर्के*
*सौ शशिकला शिर्के*
*सौ सुनेत्रा पाटील*
*श्री सुरेश शिर्के*
*श्री प्रमोद पाटील*
*श्री दिपक रायबागी*
यांनी सहभाग घेतला या सर्वांना तसेच या पृथ्वीतळावर आज निसर्गसेवा केलेल्या सर्वांना मनपुर्वक धन्यवाद 🙏

आपणास ही आवड असेल तर नक्की निसर्गसेवेत सहभागी व्हावे संपर्क 9762274042
🙏जय पर्यावरण🙏

03/07/2026
🌳 *आजची निसर्गसेवा* 🌳 आज दि 21/6/2026 रोजी आगाशिव पायथ्याशी वनविभाग पक्षीतीर्थ जवळ आपण लावलेल्या सर्व झाडाना सोबत घेऊन ग...
21/06/2026

🌳 *आजची निसर्गसेवा* 🌳

आज दि 21/6/2026 रोजी आगाशिव पायथ्याशी वनविभाग पक्षीतीर्थ जवळ आपण लावलेल्या सर्व झाडाना सोबत घेऊन गेलेले 50 लिटर जीवामृत मिक्स पाणी घातले
सर्व झाडांना आच्छादन केले असल्याने आणि जीवामृत मुळे खूप कमी पाण्यात आपली सर्व झाडे छान वाढत आहेत

यावेळी पाऊस अनियमित पडणार आहे त्यामुळे पडलेल्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरवणे आणि साठवून ठेवणे आवश्यक आहे यासाठी शक्य तिथे छोटे बंधारे करणे आवश्यक आहे आणि सर्व झाडांना आच्छादन करणे ही तितकेच आवश्यक आहे

आजच्या निसर्गसेवेत
*श्री अक्षय कुंभार*
*श्री योगेश पाटील*
*श्री दिपक रायबागी*
यांनी सहभाग घेतला या सर्वांना तसेच या पृथ्वीतळावर आज निसर्गसेवा केलेल्या सर्वांना मनपुर्वक धन्यवाद 🙏

आपणास ही आवड असेल तर नक्की निसर्गसेवेत सहभागी व्हावे संपर्क 9762274042
🙏जय पर्यावरण🙏

Address

Agashiv Gad
Karad
415110

Telephone

9762274042

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when निसर्ग - कऱ्हाड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share