13/03/2026
गॅस बुकिंग बंद नाही! बुक करण्याची नियमावली समजून घ्या!
✅ गॅस बुकिंगचे नेमके गणित काय?
- गॅस कंपन्यांनी सिलिंडरच्या बुकिंगसाठी एक निश्चित ‘टाइम लाईन’ (वेळापत्रक) ठरवून दिली आहे. त्या नियमांचे पालन केल्यासच पुढील बुकिंग स्वीकारले जाते.
- २५ दिवसांचे अंतर : केंद्र सरकारच्या आणि ऑइल कंपन्यांच्या नियमानुसार, एका बुकिंगनंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी किमान २५ दिवसांचे अंतर असणे आवश्यक आहे. जर तुम्ही आज सिलिंडर बुक केला, तर त्या तारखेपासून पुढील २५ दिवस तुम्हाला दुसरे बुकिंग करता येणार नाही.
- आधीच बुकिंग करणे का गरजेचे? जेव्हा तुम्ही एक नवीन सिलिंडर शेगडीला लावता, तेव्हा तो साधारणपणे महिनाभर चालतो. म्हणूनच, तो संपण्यापूर्वी (उदा. १०-१५ दिवस आधी) बुकिंग करणे तुम्हाला सोयीचे ठरते. परंतु, हे बुकिंग मागील बुकिंगच्या २५ दिवसांनंतरच शक्य होते.
- वेळेचे नियोजन : ज्या वेळेला तुमचा गॅस संपत येतो, त्याच सुमारास तुमची २५ दिवसांची मुदत पूर्ण होत असते. त्यामुळे बुकिंग ‘बंद’ नसून ते ठराविक कालावधीनंतरच ‘सुरू’ होते.
महत्वचा मुद्दा....
✅ जर तुम्हाला बुकिंग करताना अडचण येत असेल, तर ते तुमच्या मागील बुकिंगच्या तारखेपासून २५ दिवस पूर्ण झाले नसल्यामुळे नवीन बुक करता येत नाही. त्यामुळे संयम ठेवा आणि अधिकृत ॲप्स उदा. Hello BPCL app किंवा अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवरूनच बुकिंग करून तपासा..