GramPanchayat Thara

GramPanchayat Thara सदरील खाते हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सुरू करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत  ग्रामपंचायत - थारा तालुका किनवट येथे मां उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पा.पु....
11/01/2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत - थारा तालुका किनवट येथे मां उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पा.पु. व स्वच्छता विभाग श्री. मयुरकुमार आंदेलवाड साहेब यांनी भेट दिली. सदर भेटीदरम्यान गावामध्ये घेण्यात आलेले नावीन्यपूर्ण उपक्रम, परसबाग लागवड, स्वच्छता मोहीम, पाणलोट क्षेत्र, पोषण आहार तसेच इतर कार्यक्रमाचा आढावा घेत गावकऱ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या... सोबत विस्तार अधिकारी श्री निवृत्ती मुकणर आणि जीवन कांबळे साहेब यांनी सुद्धा उपस्थिती दर्शविली आणि गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.
त्यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, राष्ट्रविकास संस्थेचे अधिकारी, महिला, गावकरी उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व अती प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प अंतर्गत राष्ट्रविकास संस्थेच्या माध्यमातून ग्रामप...
10/11/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व अती प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प अंतर्गत राष्ट्रविकास संस्थेच्या माध्यमातून ग्रामपंचायत थारा येथे उपस्थित गावकरी व शेतकरी ह्यांना खालील विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले,
1. नवीन शेतकरी गट स्थापन करणे
2. महिला बचत गट स्थापन करणे
3. गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणे
4. कृषी समृद्धी योजने अंतर्गत चिया लागवड, मका लागवड ह्या घटकाचा लाभ घेणे , त्या साठी आवश्यक अर्ज, कागदपत्र संपूर्ण माहिती देण्यात आली.
5. तसेच जैविक संसाधन निविष्ठा केंद्र ह्याची स्थापना करण्यासाठी अर्ज करणे.
6. वनराई बंधारा, जलतारा, विहीर पुनर्भरण, बोअरवेल पुनर्भरण ह्या बाबतीत माहिती देण्यात आली.
7. रोजगार हमीच्या कामाबाबत माहिती देण्यात आली.
8. जलसंधारण कामाबाबत माहिती देण्यात आली.
9. ऍग्रिस्टॅक नोंदणी, फॉर्मर आयडी का महत्वाची आहे ह्या बाबतीत माहिती देण्यात आली.
आजच्या मीटिंग च्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांनी चिया पीक लागवड, मका लागवड ह्यासाठी अर्ज करण्यासाठी सहमती दर्शवली.
तसेच आज 40 ते 50 शेतकऱ्याना त्यांचा फॉर्मर आयडी नंबर काढून दिला.

सहकार्य - 1. संदीप उदारे
2. साईनाथ चव्हाण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत थारा च्या माध्यमातून वेगवेगळ्या गाव विकासाच्या कामांना सुरुवात क...
03/11/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत थारा च्या माध्यमातून वेगवेगळ्या गाव विकासाच्या कामांना सुरुवात करण्यात आली ह्या मध्ये
1. पंचायत समिती किनवट माध्यमातून जलतारा, रेन वॉटर हार्वेस्टिंग कामांचे मार्कआऊट टाकण्यात आले.
2. उपजिल्हा रुग्णालय, उपकेंद्र ह्यांच्या माध्यमातून महिलांची हिमोग्लोबिन व आरोग्य तपासणी करण्यात आल्या .
3. वनविभाग बोधडी बू. च्या माध्यमातून 400 वन झाडांची उचल सावरी येथील नर्सरी मधून करण्यात आली, ह्या साठी वनविभाग व वन परिक्षेत्र अधिकारी ह्यांनी मोलाचे सहकार्य केले.
4. निराधार महिलांना व तसेच इतर गावकऱ्यांना आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आले.
5. गावामध्ये ग्रामपंचायत च्या माध्यमातून 300 नारळ रोपांची लागवड करण्यात आली.

वरील उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी गावातील महिलांनी हिरीरीने सहभाग नोंदवला आहे. तसेच शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी, गावकरी, इतर गावसंबंधित कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, राष्ट्रविकास संस्था किनवट चे अधिकारी कर्मचारी सर्वांनी आपल्या आपल्या परीने भरपूर आणि मोलाचे सहकार्य केले.
https://www.instagram.com/p/DQldwJPkaqZ/?igsh=MXIzdW54eHczcWhqMg==

08/10/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत थारा च्या माध्यमातून गाव स्थरावरिल विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी, गावकरी, ग्राम पंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पेसा मोबिलायझार, बचत गट ICRP, बचत गटातील महिला तसेच राष्ट्रविकास ऍग्रो एज्युकेशन संस्था ह्यांचे पदाधिकारी ह्यांनी हिरारीने सहभाग घेतला व स्वच्छतेला शुभारंभ केला.

Address

मु. पोस्ट/थारा, तालुका/किनवट, जिल्हा/नांदेड
Kinwat
431804

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GramPanchayat Thara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share