VillageBook,Kolhapur

VillageBook,Kolhapur श्री शिवछत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेल्या व पंचगंगंच्या काठी दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द अ

कोरोना प्रतिबंधासाठी शासनाची सर्वतोपरी मदत- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ◆ कोरोना प्रतिबंधक लसींचा अधिकाधिक पुरवठा होण्य...
25/06/2021

कोरोना प्रतिबंधासाठी शासनाची सर्वतोपरी मदत- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

◆ कोरोना प्रतिबंधक लसींचा अधिकाधिक पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करणार

कोल्हापूर जिल्ह्याचा रुग्णदर नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाधिक लसींचे डोस मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती देवून कोरोना प्रतिबंधासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोरोना प्रादुर्भाव नियंत्रण आढावा बैठक आज श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल माळी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषा कुंभार आदी उपस्थित होते.

यावेळी आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय तसेच हाफकिन संस्थेच्या कार्यकारी संचालकांशी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीदरम्यान दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कोल्हापूर जिल्ह्याला अधिकाधिक लसींचे डोस उपलब्ध करुन द्यावेत, अशा सूचना केल्या. तसेच इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालय व गडहिंग्लजमधील उपजिल्हा रुग्णालयासाठी सिटी स्कॅन मशीन लवकरात लवकर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत,असे सांगितले. जिल्ह्यात म्युकर मायकोसिस रुग्णांची संख्या, उपचार पद्धती, उपलब्ध औषधसाठा, प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना आदी बाबींचा आढावा घेऊन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात 'कोरोना मुक्त गाव' अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. जेणेकरून ग्रामीण भागातील रुग्ण संख्या नियंत्रणात येवू शकेल. कोरोनाची तिसरी लाट व डेल्टा प्लस व्हेरियंटच्या प्रतिबंधासाठी संबंधित यंत्रणेने आटोकाट प्रयत्न करावेत.
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, जिल्ह्यात तपासण्या वाढवण्यात आल्या असून कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्याला दररोज 50 हजार लसींचा पुरवठा होणे गरजेचे आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.
महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी शहरात तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
00000

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1073298036383487&id=536126633433966
28/04/2020

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1073298036383487&id=536126633433966

‘कोरोना’शी लढणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनासाठी करवसुलीच्या टक्केवारीची अट शिथील

‘कोरोना’शी लढणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनासाठी करवसुलीच्या टक्केवारीची अट शिथील
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई, दि. २८ – राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०२० – २१ या चालू आर्थिक वर्षात करवसुलीवर आधारित वेतन न देता त्यांना किमान वेतन देण्याचा निर्णय राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. गावांमधील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योद्ध्याप्रमाणे काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना चालू वर्षी करवसुलीशी निगडीत वेतन न देता किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

Maha Info Corona Website
मागील वर्षी राज्यात आपत्ती, पूरपरिस्थिती अशी संकटे उद्भवली होती. तसेच सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये सर्व प्रकारची करवसुली कमी झालेली आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गावागावांमध्ये आदर्श असे काम केले आहे. वेतनाच्या सध्या प्रचलित पद्धतीनुसार त्यांचे वेतन करवसुलीच्या टक्केवारीशी जोडण्यात येते. सध्या ही पद्धती अवलंबिल्यास त्यांना अत्यल्प वेतन मिळेल, जे की अन्यायकारक ठरेल. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना चालू आर्थिक वर्षात सध्या करवसुलीच्या टक्केवारीच्या आधारे वेतन न देता त्यांना निर्धारित किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गावामध्ये कमी करवसुली झाली असली तरी चांगले वेतन मिळणार आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च ग्रामपंचायत आणि राज्य शासनामार्फत करण्यात येतो. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या हिश्श्यामधून अधिकचा खर्च भागविण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

सविस्तर वृत्त- https://mahasamvad.in/?p=10724

#कोरोनाशीलढा #आजच्याठळकबातम्या #कोरोना

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1069620740084550&id=536126633433966
23/04/2020

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1069620740084550&id=536126633433966

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या एकूण २ लाख ७४ हजार इतक्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, ग्रामविकास विभागांतर्गत सर्व यंत्रणा जीवाची पर्वा न करता दिवसरात्र कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करीत आहेत. ग्रामविकास विभागाचे हे कर्मचारी म्हणजे या विषाणूच्या विरुद्ध लढणारे योद्धेच आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे या रकमेचे वितरण करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त- https://mahasamvad.in/?p=10101

#कोरोनाशीलढा #आजच्याठळकबातम्या #कोरोना

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1068070680239556&id=536126633433966
21/04/2020

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1068070680239556&id=536126633433966

ग्रामविकास विभागातील विविध पदांच्या पदभरतीच्या नावाखाली https://www.egrampanchayat.com या संकेतस्थळावर खोटी जाहिरात प्रसिद्ध करून महाराष्ट्र शासन व तरुणांची फसवणूक करणाऱ्या अनोळखी इसमा विरूद्ध गुन्हा दाखल.

कोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात १५ निवारागृहांमध्ये ८०४ जण संस्थात्मक अलगीकरणातजिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 16...
21/04/2020

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात १५ निवारागृहांमध्ये ८०४ जण संस्थात्मक अलगीकरणात

जिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 166 आणि परराज्यातील 638 अशा एकूण 804 जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील 22 परराज्यातील 6 अशा 28 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे. रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत राज्यातील 20 परराज्यातील 9 अशा 29 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे. मुलींची शाळा क्र. 6 लाईन बाजार येथे राज्यातील 7 परराज्यातील 11 असे एकूण 18 असून याची क्षमता 25 जणांची आहे.

सविस्तर वृत्त- https://bit.ly/3eANHFU

#कोरोनाशीलढा #आजच्याठळकबातम्या #कोरोना

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1067734633606494&id=536126633433966
21/04/2020

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1067734633606494&id=536126633433966

सावधान....कृपया नोकरीच्या खोट्या जाहिरातीस तरुणांनी भुलू नये.

ग्रामविकास विभागातील विविध पदांच्या पदभरतीच्या नावाखाली https://www.egrampanchayat.com या संकेतस्थळावर खोटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे कोणतीही पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही. राज्यस्तरीय सरळसेवा निवड समिती अशा प्रकारची कोणतीही समिती ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त कार्यरत नाही. प्रकल्प व्यवस्थापक, ई-ग्रामपंचायत असे कोणतेही पद अस्तित्वात नाही. ही जाहिरात पूर्णत: खोटी आहे.

त्यामुळे या भरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार आहे.

सविस्तर वृत्त- https://bit.ly/34Uw7sa

 #खाजगी_डॉक्टरांनो,  #हात_जोडतो. #ओपीडी व इतर सेवा सुरू ठेवा ! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक आवाहन      कोल...
13/04/2020

#खाजगी_डॉक्टरांनो, #हात_जोडतो. #ओपीडी व इतर सेवा सुरू ठेवा !

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक आवाहन

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच खाजगी डॉक्टरांनो, तुम्हाला हात जोडतो.....ओपीडी आणि इतर सेवा सुरू ठेवा! असे भावनिक आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. कोरोना सोडून इतर आजार आणि व्याधींच्या रुग्णांची फरपट होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. याबाबत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे , जिल्हयामधील अनेक खाजगी दवाखाने, मल्टीस्पेशालिटी दवाखाने यांनी कोरोना व्हायरसच्या भितीपोटी ओ.पी.डी. व इतर सेवा बंद केल्या आहेत किंवा परिमेडिकल स्टाफ येत नाहीत, अशी सबब सांगितली जाते हे बरोबर नाही. कोरोना सोडून अनेक आजार, व्याधी आहेत. त्यासाठी जावावे कोठे? खोकला, सर्दि, पइसे किंवा कोरोना लक्षणे असलेली पेशंट ही सरकारी हॉस्पीटलला पाठवावे, अशी
सुचना शासकिय पातळीवर केली आहे. परंतु, इतर जे आजार आहेत उदा: कॅन्सर , हृदयविकार, मूत्रपिंड,
डायबेटीज, पित्ताशय, हार्णिया, दातांचे रुग्ण, हाडांचे विकार , डोळ्यांचे पेशंट असे अनेक आजार, व्याधी आहेत की यासाठी लोकांनी या लॉकडाऊनच्या काळात जावयाचे कोठे? त्यांचे हाल -अपेष्टा पाहून मी अधीक अस्वस्थ होत आहे.लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेच्या विविध स्वरूपाच्या तक्रारी येत आहेत . यामध्ये प्रसूतीसाठी अवघडलेल्या भगिनी आणि लहान बाळांच्या व्यथा तर मन सुन्न करून टाकणाऱ्या आहेत. अशा संकट काळातच डॉक्टरांनो सेवा करून गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हीच खरी वेळ आहे. माझी हात जोडून विनती आहे की आपणास देवाने ही सेवा करण्याची संधी दिली आहे. ती आपण आजपर्यंत प्रामाणिकपणे करत आला आहात . तुमचे आजचे वैभव याच लोकांच्या सहकार्याने उभे राहिले आहे. तुमची मुले डॉक्टर झाली. जो आपण व्याप वाढविलेला आहे, त्या वैभवाला रुग्णांच्या सेवेमुळे सुंदरता लाभेल. घेतलेला वसा टाकू नका.
मी गेली सातत्याने १५ वर्षांपासून धर्मादाय दवाखान्यामधून दर आठवड्याला १५ ते २० पेशंट नित्यनेमाने मुंबईला घेऊन जाऊन उपचार व शस्त्रक्रिया करून घेऊन आणत होतो. मुख्यमंत्री सहायता निधीमधून अनेकांना आर्थिक सहायतासाठी मदत करत होतो. कोरोनामुळे लॉकडाऊन पासून वहातूक बंद झाली. दवाखान्याने तारखा दिल्या, ते पेशंट माझ्याकडे येतात त्यांच्या व्यथा त्यांचे होणारे हाल पाहिल्यानंतर मी नि:शब्द होतो . आज माझ्याकडे त्यांचे उत्तर नाही. त्यापैकी अनेक मुंबईमधील हॉस्पीटल कोरोना रोगाचा त्यांच्या स्टाफमध्ये फैलाव झाल्यामुळे शासनाने सिल केले आहेत. फक्त कोल्हापूरमधील मोठ्या खाजगी दवाखान्यामधून उपचार करून घेणे, एवढाच मार्ग आहे. तेवढी सेवा आपण करावी, एवढीच कळकळीची विनंती आहे.
खाजगी दवाखान्याला जर शासकीय पातळीवर अडचणी असतील किंवा शासकीय पातळीवर अडचणी असतील, कोणत्या रोष्टीची आवश्यकता असलेस मी निश्चीत त्यामध्ये सहकार्य करीन. परंतू, आपली सेवा अखंडीत सुरू ठेवावी व समाजाचा दुवा घ्यावा, अशी विनती करतो. महात्मा फुले जिवनदायी योजना व आयुष्यमान योजना, तसेच एस आय कामगार व इतर योजना या मिळवून देणेसाठी मी तुम्हाला सहकार्य करीन, याचा विश्वास देतो. रोष घेऊ नये.

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालकांना २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची म...
08/04/2020

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालकांना २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

गावपातळीवरील हे कर्मचारी म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील सैनिकच

कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणारे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याबरोबरच आता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत काम करणारे केंद्र चालक (संगणक परिचालक) यांनाही २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

सविस्तर वृत्त- https://bit.ly/2wnR1Tu

#कोरोनाशीलढा #आजच्याठळकबातम्या #कोरोना

Address

Zillha Parishad Nagala Park
Kolhapur
416001

Opening Hours

Monday 9:45am - 5:45am
Tuesday 9:45am - 5:45am
Wednesday 9:45am - 5:45am
Thursday 9:45am - 5:45am
Friday 9:45am - 5:45am
Saturday 9:45am - 5:45am

Telephone

2312652454

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to VillageBook,Kolhapur:

Share