16/03/2026
भाग - २
त्यांच्यापर्यंत पोहोचते किंवा त्यांना त्यांच्या वयाला अनुसरून अनावश्यक असलेल्या गोष्टी सुद्धा खूप लवकर समजत आहेत आणि याबाबत पालक अनभिज्ञ असतात. स्मिता ताईंनी याच्यावरच भर देत सांगितलं की जर घरातलंच वातावरण मोकळं असेल, जर घरातूनच पालक अशा विषयांवर मुलांशी मोकळेपणाने बोलू शकत असतील, त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक आणि योग्य उत्तरे देऊ शकत असतील तर मुलं ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करणार नाहीत. यासाठी आपण पालक म्हणून सजग असणे आणि पालक म्हणून या गोष्टी आधी स्वतःला योग्य रीतीने माहिती असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर मुलांशी या विषयावरती बोलताना मुल कोणत्या वयातले आहे, त्याला आता कितपत माहिती सांगितली पाहिजे आणि शब्द किती काळजीपूर्वक, योग्य रीतीने वापरले पाहिजेत याचे महत्त्व त्यांनी सांगितले.
मुलांमध्ये असलेल्या कुतूहलापोटी किंवा पियर प्रेशर याच्यातून सुद्धा मुले चुकीच्या सवयींना, व्यसनांना बळी पडतात आणि यातूनच हळूहळू गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत जाते. जर लहानपणापासूनच आपण घरात मोकळेपणाने या विषयावरती बोलू शकलो आणि लैंगिकता व्यापक दृष्टिकोनातून बघू शकलो, त्यातला संकोच, भीती जर मुलांच्या मनातून काढून टाकू शकलो तर ते पुढे स्वतःहून या गोष्टी कराव्यात की नाहीत याचा विचार नक्कीच करतील. या सत्रात हेच अधोरेखित होतं की विषय कितीही नाजूक असला तरी पालकांचं आणि मुलांचं नातं इतकं मोकळं असलं पाहिजे की त्यांना पडणारे प्रश्न, त्यांच्या मनात असणारी भीती, शंका या त्यांनी पहिल्यांदा पालकांना विचाराव्यात. जर पालक सजग असतील तर ते नक्कीच योग्य रीतीने त्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतील. गरज वाटली तर समुपदेशनाची सुद्धा मदत घेऊ शकतील. तर हा विषय गुप्तता पाळण्याबद्दलचा किंवा त्याबद्दल संकोच असण्याचा नसून ही काळाची गरज आहे.
Swapnali Chavan
१६ मार्च, २०२६