Laxmi Patil

Laxmi Patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Laxmi Patil, Social service, Kolhapur.

"आभाळमाया जाणीव मानवतेची"
01/12/2021

"आभाळमाया जाणीव मानवतेची"

*आभाळमाया शैक्षणिक सामाजिक सेवा संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमास हवी आहे तुमची साथ* 🙏🏻🙏🏻_ 🤝🏻📚🎒📚🎒📚🤝🏻  *शिक्षक दिन आम्हासाठी ग...
03/09/2021

*आभाळमाया शैक्षणिक सामाजिक सेवा संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमास हवी आहे तुमची साथ* 🙏🏻🙏🏻_ 🤝🏻📚🎒📚🎒📚🤝🏻 *शिक्षक दिन आम्हासाठी गौरवशाली!!! या दिनाचे औचित्य साधून आभाळमाया विद्यार्थी शैक्षणिक पालकत्व उपक्रमातून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पुरवून शिक्षक दिन साजरा करुया!!!* 📚📚📚📚🎒🎒
आभाळमाया शैक्षणिक सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर ही समाजातील गोरगरीब वंचित घटकांना आधार देत कार्यरत आहे ...*समाजातील हुशार होतकरू गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा एक हात देऊन चला जपूया मानवतेचे सुंदर नाते* 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🎒🎒🎒🎒🎒🎒🎒📚📚📚📚

*मदत कशी पोहोचवाल* ?
नोंदणीकृत आभाळमाया शैक्षणिक सामाजिक संस्थेकडे एका विद्यार्थ्यासाठी आँनलाईन ५०० रु -किंवा अधिक रक्कम. *गुगल पे फोन पे 9881929357* *
क्रमांकावर पाठवून गरजू - *होतकरू वंचित गुणवान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्याच्या पंखात शिकण्याचे बळ देऊ शकता
आपण दिलेल्या शैक्षणिक दातृत्वा तून आभाळमाया सेवाभावी वृत्तीने गरजू गुणवंत विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहचवेल .
या मदती बद्दल आभाळमाया संस्थेकडून आपणास "शिक्षक गौरव " सन्मानपत्र दिले जाईल !
शिक्षक प्रगत राष्ट्र निर्मितीचे खरे आधारस्तंभ आहेत !
चला तर मग
गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे येवूया🙏🏻
शिक्षक दिन असा साजरा करूया !

ऑनलाईन पेमेंटसाठी
फोन पे /गुगल पे क्र .
9881929357🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

*🙏🏻नमस्कार  आदरणीय बंधू -भगिनीनो🙏🏻*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻*मला लोकमतचा Excellent Teacher Award जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील  शिक...
29/08/2021

*🙏🏻नमस्कार आदरणीय बंधू -भगिनीनो🙏🏻*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*मला लोकमतचा Excellent Teacher Award जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील सर्व विभागाच्या अनेक* *शिक्षक बंधू भगिनी प्रशासकीय अधिकारी स्नेही आप्तेष्ट व सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तीनी माझ्यावर शुभेच्छांचा* *वर्षाव केला.. त्याबद्धल मी सर्वां ची कृतज्ञ आहे*..
*आपण नेहमीच मला पाठबळ दिले आहे. आजवर आपण माझ्या प्रत्येक कामात मला शुभेच्छा आशीर्वाद देऊन मला प्रेरणा दिली आहात आज हा दिमाखदार सन्मान आपल्या आशीर्वादाची फलश्रुती आहे... हा सोहळा दुपारी चार* *वाजता होणार असून लोकमत समुहाच्या नियोजनानुसार फक्त मी आणि माझे पती अशा दोघानांच प्रवेश मिळणार आहे*. *त्यामुळे माझी इच्छा आत्मिक तळमळ असूनही मी आपणास या कार्यक्रमास आमंत्रित करू शकत नाही. त्याबद्धल क्षमस्व*. .
*.तथापि हा सन्मान सोहळा आपण लोकमत समुहाने दिलेल्या* *सोबतच्या लिंकवर पाहू शकता. तो तुम्ही निश्चित पहाल अशी धारणा धरून पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानते*. 🙏🏻🙏🏻. *आपली विश्वासू*
*सौ लक्ष्मी पाटील*
💫 *संचालिका दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूर* 💫 *महिला जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ कोल्हापूर*
💫 *अध्यापिका विद्यामंदिर कणेरीवाडी*
💫 *संस्थापक अध्यक्ष आभाळमाया शैक्षणिक सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर*

https://youtu.be/TOqRUlTAyMs आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहून लाईक करावा ही विनंती आपली एक लाईक आम्हाला आमच्या शैक्षणिक कार...
28/07/2021

https://youtu.be/TOqRUlTAyMs
आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहून लाईक करावा ही विनंती आपली एक लाईक आम्हाला
आमच्या शैक्षणिक कार्यात सदैव प्रेरणा देत राहील🙏🙏

दिनांक 24 जुलै 2021 विद्यार्थी सोहम सुभाष जावीर याच्या घरी दिलेली शैक्षणिक स्नेहभेट

जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजवून महाराष्ट्रातील सामाजि...
26/06/2021

जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजवून महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाला गती देणारे सुधारणावादी समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.

शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे !! #शिवराज्याभिषेक_दिन  #शिवस्वराज...
06/06/2021

शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे !!
#शिवराज्याभिषेक_दिन
#शिवस्वराज्यदिन

 #सहभागी_व्हा!जे जे उत्तम उदात्त आहेशिक्षक बंधू भागिनी जवळी...काव्यप्रतिभा फुलूनी येण्या लिहा कवितेच्या ओळी...!सन्मानाचे...
21/04/2021

#सहभागी_व्हा!

जे जे उत्तम उदात्त आहे
शिक्षक बंधू भागिनी जवळी...
काव्यप्रतिभा फुलूनी येण्या
लिहा कवितेच्या ओळी...!

सन्मानाचे हक्कदार व्हा
व्हा सृजनाचे वाली...
तुमच्यासाठी आभाळमाया
स्पर्धा घेऊन आली...

राज्यातील भावा बहिणींनो
चला कवितेच्या गावा...
आमच्या कडूनी तव प्रतिभेचा
गौरव महान व्हावा... !

कोरोनाला करून पराभूत
जग चैतन्याने भरवू
कवितेच्या शस्त्राने आता
कोरोनाला हरवू...!

#सौ_लक्ष्मी_पाटील

*आभाळमाया शैक्षणिक व सामाजिक सेवासंस्था,कोल्हापूर*आयोजित*राज्यस्तरीय ऑनलाईन कविता वाचन/गायन स्पर्धा-२०२१*____________🙏 न...
21/04/2021

*आभाळमाया शैक्षणिक व सामाजिक सेवासंस्था,कोल्हापूर*
आयोजित
*राज्यस्तरीय ऑनलाईन कविता वाचन/गायन स्पर्धा-२०२१*
____________
🙏 नमस्कार,
कोरोनाच्या भयग्रस्त निराशेच्या वातावरणात स्वतःसह इतरांनाही काही क्षण रिझवावे, मानवी मूल्यांची रुजवणूक वृद्धिंगत व्हावी आणि शिक्षकांना आविष्कार करणेस मंच उपलब्ध व्हावा, या उदात्त हेतूने आभाळमाया शैक्षणिक व सामाजिक सेवासंस्था,कोल्हापूर यांचेवतीने महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक-शिक्षिकांसाठी
*ऑनलाईन कविता वाचन/कविता गायन स्पर्धा २०२१ चे आयोजन* केले आहे.
📝 *स्पर्धा कालावधी-* २१ एप्रिल २०२१ ते ५ मे २०२१
📝स्पर्धा दोन गटात होईल.
१)स्वरचित कविता वाचन/ गायन सादरीकरण.
२) संकलित (इतर कोणाही कवी/कवयित्रीची कविता) कविता वाचन/ गायन सादरीकरण.

*🏆बक्षिसे🏆*
*▪️स्वरचित कविता वाचन सादरीकरण▪️* (पुरुष व महिला विभागात स्वतंत्र ३ बक्षिसे)
🥇प्रथम क्रमांक- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र
🥈द्वितीय क्रमांक- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र
🥉तृतीय क्रमांक- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र

*▪️संकलित कविता वाचन सादरीकरण▪️*
(पुरुष व महिला विभागात स्वतंत्र ३ बक्षिसे)
🥇प्रथम क्रमांक- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र
🥈द्वितीय क्रमांक- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र
🥉तृतीय क्रमांक- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र
तसेच स्पर्धेत सहभागी सर्वांना ऑनलाईन 'सहभाग प्रमाणपत्र'
_________________
*🔹स्पर्धेचे नियम-अटी व सूचना🔹*
📝स्पर्धक स्वतःच्या किंवा संकलित कवितेचे सर्वसाधारण वाचन किंवा कविता गायन ही करू शकतील.
📝 व्हिडीओ कविता सादरीकरण कालावधी- जास्तीत जास्त ४ मिनिटे.
यापेक्षा जास्त झाल्यास कविता स्पर्धेतून बाद ठरवण्यात येईल.
📝व्हिडीओ पाठवण्याची अंतिम मुदत- ५ मे २०२१,रात्री १२ पर्यंत.
*📝कवितेचा व्हिडीओ व टेक्स्ट कविता खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा E-mail वर पाठवावी*
*Wp- 9696826464*
*-9421348611*
*Email*
*[email protected]*

📝व्हिडीओच्या सुरुवातीला "आभाळमाया संस्था कोल्हापूर आयोजित राज्यस्तरीय कवितावाचन सादरीकरण स्पर्धा सन २०२१" असा उल्लेख करून स्वतःचे नाव,आपल्या शाळेचे नाव व आपल्या कवितेच्या शिर्षकाचा उल्लेख करावा व कविता वाचन/कविता गायन करावे.

📝मोबाईल(स्क्रीन )आडवा धरूनच योग्य अंतरावरुन व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे.

📝संस्थेच्या You Tube चॅनेलवर व्हिडीओ अपलोड केल्यानंतर त्याला मिळणारे likes,views तसेच मान्यवर परिक्षकांचे गुणदान यावर निकाल मूल्यांकन होईल.

📝सादरीकरणातून कुणाच्याही धार्मिक, राजकीय, जातीय भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

📝स्पर्धेचा निकाल मुदत संपल्यावर दहा दिवसानंतर जाहीर केला जाईल.

📝स्पर्धा व निकाल या संदर्भात सर्व हक्क आयोजकांकडे अबाधित राहतील.

📝बक्षीस वितरण समारंभ- कोरोना निर्बंध उठल्यानंतर घेतला जाईल.
________________
✍ आपले नम्र,
अध्यक्ष व संचालक मंडळ
आभाळमाया शैक्षणिक व सामाजिक सेवासंस्था,कोल्हापूर

दैनिक महासत्ता व जागृत लोकनेता : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 102 विद्यार्थ्यांनी घेतला पहिलीच्या वर्गात प्रेवश
16/04/2021

दैनिक महासत्ता व जागृत लोकनेता : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 102 विद्यार्थ्यांनी घेतला पहिलीच्या वर्गात प्रेवश

कणेरीवाडी शाळेत प्रवेशाला प्रतिसाद शंभर विद्यार्थ्यांना पाहिलीसाठी प्रवेश.....
14/04/2021

कणेरीवाडी शाळेत प्रवेशाला प्रतिसाद शंभर विद्यार्थ्यांना पाहिलीसाठी प्रवेश.....

शालेय बोनाफाईड  ग्राह्य मानून  मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती मंजूर करा .. ग्राम विकास मंत...
15/03/2021

शालेय बोनाफाईड ग्राह्य मानून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती मंजूर करा .. ग्राम विकास मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्याकडे शिक्षक संघाची मागणी: जिल्हाध्यक्षा लक्ष्मी पाटील

ऑनलाईन सभेद्वारे सभासदांचा आवाज दाबला -लक्ष्मी पाटील
08/03/2021

ऑनलाईन सभेद्वारे सभासदांचा आवाज दाबला
-लक्ष्मी पाटील

Address

Kolhapur
416012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Laxmi Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Laxmi Patil:

Share

Category