05/05/2023
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे माणगाव येथे संयुक्त स्मारक उभारणे करिता मा. जिल्हाधिकारी महोदय यांचे अध्यक्षतेखाली विविध शासकीय विभाग व ग्रामस्थांची संयुक्त बैठक आज रोजी पार पडली. सदर बैठकीमध्ये 182 गुंठे जागेमध्ये कंपाऊंड त्याचबरोबर त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या व शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित घटना फायबर इमेज मध्ये तयार करणे, त्याचबरोबर 3000 स्क्वेअर फुट इतक्या आकाराचे लायब्ररीसह बौद्ध विहार, दहा भन्तेजींसाठी निवासस्थान इमारत, शाहू महाराज व बाबासाहेबांचे भव्य पुतळे व प्रवेशद्वारा जवळ आप्पासाहेब पाटील यांचा पुतळा उभारणे, सदर जागेच्या आजूबाजूचे सुशोभीकरण करणे, तसेच माणगाव परिषदेच्या 15 ठरावांची माहिती असणारी प्रतिकृती बनवणे, माणगाव परिषदेचा माहितीपट, अशोक स्तंभ व संविधानाची प्रतिकृती, 100 सीटर क्षमतेचे छोटे थेटर ज्यामध्ये डॉक्युमेंटरी व्हिडिओज व माहितीपटाचा समावेश असेल तसेच सदर ठिकाणी भव्य स्टेज तसेच 200 विद्यार्थ्यांसाठी संगणकासह ग्रंथालय निर्मिती इ. कामे करण्याचे ठरले. त्याचबरोबर लंडन हाऊस या वास्तूमध्ये नवीन फर्निचर व बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू त्या ठिकाणी निर्माण करणे तसेच तक्क्या इमारती जवळ शाहू महाराजांचा अर्ध पुतळा बसविणे तसेच माणगाव परिषदेची तत्कालीन परिस्थिती पुतळ्यांच्या माध्यमातून उभी करणे व सदर ठिकाणी होलीग्रफिक शो व सभागृह निर्माण करणे, लंडन हाऊसच्या पाठीमागे असणाऱ्या बारा गुंठे एरियात पर्यटकांना खुले सभागृह तसेच अतिग्रे येथे दिशादर्शक फलक व तलावाचा पर्यटन दृष्ट्या विकास करणे, बाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या शाळेची इमारत पुन्हा तयार करून त्या ठिकाणी सर्व सुविधा निर्माण करण्यात येतील. 28 गुंठे जमिनीला चारी बाजूने कंपाऊंड करणे व जमीन लेव्हलिंग करणे. ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालय इत्यादी अनुषंगिक बाबींची पूर्तता करणे. इत्यादी बाबींचे अंदाजपत्रक तयार करून सदरचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे ठरले. सदर बैठकीसाठी मा. राहुल रेखावार जिल्हाधिकारी, कोल्हापूर. श्री. शरद पाटील अपर तहसीलदार, इचलकरंजी. श्री. विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर. श्रीमती. शबाना मोकाशी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, हातकणंगले. श्री. एस. आर. पाटील कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर. श्रीमती. अमरजा निंबाळकर वास्तु विशारद तज्ञ, कोल्हापूर. श्री.राठोड ग्रामसेवक, माणगाव ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दि. ०४.०५.२०२३