16/12/2025
यशवंतराव चव्हाण (के एम सी) कॉलेज, कोल्हापूर येथील हिंदी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ.किरण भोसले यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठातून ,हिंदी तथा मराठी मे लिखित भगवान बुद्धकी जीवनीयोंका तुलनात्मक अध्ययन, या विषयावर Ph.D संपादन केल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 16 /12/ 2025 रोजी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. बी. एन. उलपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रा.डॉ. नागावकर, प्रा पि.डी .तोरस्कर, विनायक मेस्त्री, प्रा. एच.टी. कांबळे, डॉ. छाया माळी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. आर आर मांगले केले, तर आभार प्रा.डॉ.बी.एम. पाटील यांनी मानले कार्यक्रमाला प्रा.डॉ. ए.व्हि. पौडमल,प्रा. अनिल मुडे, प्रा. एस .एम.शेख इत्यादी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.