Shoumika Amal Mahadik

Shoumika Amal Mahadik Vice President, BJP Mahila Morcha Maharashtra
Director, Gokul Milk Kolhapur
Ex-President, ZP Kolhapur

सामाजिक कार्य करण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ते मन निसर्गतःच आम्हा स्त्रियांना लाभलेलं आहे. मात्र आजवर चौकटीच्या आत बंदिस्त करून ठेवल्या गेलेल्या व सामाजिक क्षेत्रात स्वयंभू व्हायला संधी नाकारलेल्या स्त्रियांना याच चौकटीला धडका देवून आपल्यासह समाजाच्या प्रगतीची दारे किलकिली करण्याचे सामर्थ्य निर्माण व्हावे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. कारण स्त्रियांना संधी मिळाली तर त्या त्याचे सोने करून त्याच

ा उपयोग इतरांच्या फायद्यासाठी करतात. हे आजवर आपण पाहिले आहे. महाराणी ताराबाईंचा इतिहास लाभलेल्या या माझ्या कोल्हापूर जिल्ह्याने स्त्रियांच्या सक्षमीकरणातून समाजहित साधण्याचा जो आदर्श घालून दिला आहे, त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत.

आजही समाजाकडे पाहत असताना कितीतरी उणिवा असल्याच्या जाणवतात. हाच समाज अधिक सक्षम, सजग, समृद्ध आणि स्वयंपुर्ण व्हावा, यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेची अध्यक्षा म्हणून कार्यरत असताना संपुर्ण जिल्ह्यात विकासाचा नवा पॅटर्न राबविण्यासाठी मी वेगवेगळे प्रयोग केले. याहीपुढे लोकप्रतिनिधी म्हणून सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांच्या विकासासाठी अविरत प्रयत्न करणे, हाच माझा उद्देश आहे.

अनेक महिला सध्या चार भिंतींचा उंबरठा ओलांडून "आत्मनिर्भर' बनण्यासाठी बाहेर पडल्या आहेत. काही जणी नोकरी करतात तर काहीजणी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भरतेकडे पाऊले टाकताहेत. त्यांना आर्थिक, मानसिक, शारिरीकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या पाठिशी मी नेहमी उभी राहीन. त्यासोबतच अजूनही ज्या महिलांना "आत्मनिर्भरते'कडे वाटचाल करायची आहे, त्यांच्यासाठीही विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे.

महिलांना स्वतःची ओळख निर्माण करता यावी व त्यासाठी विविध संधी देण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी, त्यावर शासनस्तरावर उपाययोजना करण्यासाठी हवे ते प्रयत्न करण्याची माझी तयारी आहे.

युवती, मुलीही सध्या शिक्षणासोबत स्वतःची ओळख करून घेण्यासाठी जग धुंडाळत आहेत. त्यांनाही समाजातील काही अनिष्ट प्रवृत्तींकडून त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. हे थांबविण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. त्यांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या ऐकून घेण्यासाठी माझे दरवाजे नेहमी खुले असतील.

येणाऱ्या काळातील कोल्हापूरचा सर्वांगीण विकास व्हावा, मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, पायाभूत सुविधांना प्राधान्य मिळावे, यासाठी मी नेहमीच तत्पर आहे. हे ध्येय पूर्ण करण्यात आपल्या सर्वांचीच साथ माझ्यासाठी मोलाची आहे.

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम ।धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकु...
04/09/2026

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम ।
धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥
सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
#जन्माष्टमी

संयुक्त महाराष्ट्राचा बुलंद आवाज कृष्णराव गणपतराव तथा शाहीर साबळे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
03/09/2026

संयुक्त महाराष्ट्राचा बुलंद आवाज कृष्णराव गणपतराव तथा शाहीर साबळे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

मराठी साहित्याचा मानबिंदू, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वि. स. खांडेकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
02/09/2026

मराठी साहित्याचा मानबिंदू, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वि. स. खांडेकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

30/08/2026
हॉकीचे जादूगार, पद्मविभूषण मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! क्रीडा क्षेत्रात देशाचा तिरंगा अभिमानाने फडक...
29/08/2026

हॉकीचे जादूगार, पद्मविभूषण मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
क्रीडा क्षेत्रात देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवणाऱ्या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🏒

#ध्यानचंद

बहिण भावाच्या नात्यातील पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन! मायेचा, प्रेमाचा, आपुलकीचा धागा घट्ट करणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त सर्व...
28/08/2026

बहिण भावाच्या नात्यातील पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन!
मायेचा, प्रेमाचा, आपुलकीचा धागा घट्ट करणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#रक्षाबंधन

महान क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #शिवराम_हरी_राजगुरू
24/08/2026

महान क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#शिवराम_हरी_राजगुरू

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवी, विंदा करंदीकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #विंदा_करंदीकर
23/08/2026

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवी, विंदा करंदीकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

#विंदा_करंदीकर

'कालनिर्णय'चे संस्थापक, मराठी ज्योतिषतज्ञ आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व जयंत  साळगांवकर यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवाद...
20/08/2026

'कालनिर्णय'चे संस्थापक, मराठी ज्योतिषतज्ञ आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व जयंत साळगांवकर यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#जयंत_साळगावकर

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shoumika Amal Mahadik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shoumika Amal Mahadik:

Shortcuts

Share