12/07/2025
🔶 *सर्व पन्हाळावासीय आणि शिवप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण...!* 🔶
*पन्हाळ्याचा सुवर्ण इतिहास जगाच्या नकाशावर उमटला...!*
*अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट ...*
*संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले १२ किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत.यामध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ले - रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे...*
*अभिमानाची बाब म्हणजे आपल्या पन्हाळा तालुक्यातील "पन्हाळा" किल्लादेखील यामध्ये समाविष्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला "पन्हाळा किल्ला" युनेस्को वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित झाल्याबद्दल माझ्यासारख्या शिवप्रेमीसाठी यापेक्षा आनंदाची व अभिमानाची दुसरी गोष्ट होऊ शकत नाही.या अतिशय आनंददायी निर्णयाबद्दल सर्व पन्हाळावासीय नागरिकांचे, शिवप्रेमींचे अभिनंदन. तसेच यासाठी मेहनत घेणाऱ्या महायुती सरकार,सांस्कृतिक मंत्रालय व युनेस्को संस्थेचे मनःपूर्वक आभार...*