03/09/2026
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी आज खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते फित कापून आपल्या महापालिकेतील अधिकृत कार्यालयात औपचारिक प्रवेश केला.
या महत्त्वपूर्ण आणि दिमाखदार सोहळ्यास मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान, उपसभापती सौ.दीपा ठाणेकर, प्रभाग समिती सभापती वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण, आरोग्य विशेष समिती सभापती सौ.सुरेखा ओटवकर, उपसभापती वैभव माने, पाणीपुरवठा विशेष समिती सभापती सौ.संगीता सावंत, उपसभापती सौ.दीपा काटकर, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ.शिला सोनुले, उपसभापती सौ.पूजा पोवार, क्रीडा समिती सभापती विजयसिंह खाडे-पाटील, उपसभापती रोहित कवाळे, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, सभागृह नेता मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते शारगंधर देशमुख, आदिल फरास, इंद्रजित बोंद्रे, सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, भाजपचे राहुल चिकोडे, संग्रामसिंह निकम यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, सन्माननीय पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या हिताच्या उज्ज्वल उज्ज्वल भविष्यासाठी महापालिकेची ही नवी टीम नव्या उत्साहाने सज्ज झाली आहे. महापौर महोदयांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना कोल्हापूरकरांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा!