Sumit Nitinrao Kolhe Patil

Sumit Nitinrao Kolhe Patil A SOCIAL WORKER

आदरणीय साहेब…सर्वोत्तम समाजकारणी, अनुभवी राजकारणी, संवेदनशील व्यक्तिमत्त्व, दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि कुटुंबवत्सल स्व...
16/03/2026

आदरणीय साहेब…

सर्वोत्तम समाजकारणी, अनुभवी राजकारणी, संवेदनशील व्यक्तिमत्त्व, दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि कुटुंबवत्सल स्वभाव — अशी असंख्य विशेषणे ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाला लागू पडतात, ते म्हणजे आदरणीय साहेब....खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचे मार्गदर्शक दीपस्तंभ ....

माणूस आयुष्यात खूप काही शिकतो…पण काही व्यक्ती अशा असतात की त्यांचा सहवासच आयुष्याची शाळा बनतो..आणि साहेब तर विचारांचे विद्यापीठच...

मला मिळालेली माणुसकीची शिकवण, समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा, लोकांप्रती असलेली संवेदनशीलता — हे सर्व बाबांच्या सहवासातूनच मला मिळाले आहे.
एक म्हण आहे —
“मोठ्या झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही.”
पण बाबांसारख्या एका विशाल आधारवडाने मात्र संस्कारांची अशी बीजे पेरली की आज त्या छायेखाली असंख्य रोपे वाढली, फुलली आणि एका विस्तीर्ण बागेत रूपांतरित झाली.
आज त्या बागेची गोड फळे केवळ कुटुंबालाच नाहीत,
तर संपूर्ण तालुक्याला आणि पंचक्रोशीतील जनतेला जनसेवेच्या रूपाने मिळत आहेत.
आज माझ्या हातून जे काही चांगले घडत आहे…
समाजासाठी जे काही काम होत आहे…
ते सर्व फक्त बाबांनी दिलेल्या संस्कारांचे फलित आहे.
त्यांच्या विचारांची आणि संस्कारांची ही शिदोरी आयुष्यभर माझ्या पाठीशी राहील…
आणि माझ्या प्रत्येक पावलाला दिशा देत राहील…
हीच त्यांच्या चरणी माझी भावपूर्ण कृतज्ञता आणि नम्र अभिवादन.

13/03/2026

हॅकॅथॉन — ही केवळ स्पर्धा नसते; ती बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, चिकाटी आणि तंत्रज्ञानाच्या आकलनाची कठीण कसोटी असते. अशा कोड्य...
13/03/2026

हॅकॅथॉन — ही केवळ स्पर्धा नसते; ती बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, चिकाटी आणि तंत्रज्ञानाच्या आकलनाची कठीण कसोटी असते. अशा कोड्यांच्या आणि विचारांच्या रणांगणात आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर यश मिळवून राज्यस्तरावर झेप घेणे हे खरोखरच दैदिप्यमान यश आहे.

आदिवासी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उदात्त हेतूने माननीय कोल्हे साहेबांनी उभारलेली ही शाळा आज त्या दूरदृष्टीचे फलित दाखवत आहे. मा श्री.नितीनदादा यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि श्री.अमितदादा यांचा भक्कम पाठिंबा यामुळे ही संस्था संजीवनीच्या इतर शाखांप्रमाणेच प्रगतीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे.

या यशामागे श्रीमती जोशी मॅडम आणि श्री गायकवाड सर यांचे समर्पित मार्गदर्शन ही मोठी शक्ती आहे. त्यांच्या तळमळीमुळेच त्यांची “आदर्श मार्गदर्शक” म्हणून निवड होणे हे अत्यंत अभिमानास्पद आहे.

एकेकाळी प्रगतीपासून दूर राहिलेला समाज आज आत्मविश्वासाने स्वप्नांना पंख देत आहे — हीच या प्रयत्नांची खरी कमाई आहे.
ही सुरुवात आहे यशाची अनेक शिखरे यानंतर सर होणार आहेत आणि ह्या प्रवासात मी आणि संजीवनी परिवार कायमच सोबत असणार आहोत

25/02/2026

16/02/2026

#बाबा आपल्यावरील श्रद्धेने सुरू झालेला आणि आपल्या शिकवणीप्रमाणे पाळलेल्या सबुरीने झालेला हा प्रवास आणि मिळालेले आशीर्वादरुपी शालेय बँड स्पर्धेचे हे राष्ट्रीय विजेतेपद आपल्या चरणी समर्पित...

Address

Kopargaon
423601

Opening Hours

Monday 8am - 5pm
Tuesday 8am - 5pm
Wednesday 8am - 5pm
Thursday 8am - 5pm
Friday 8am - 5pm
Saturday 8am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sumit Nitinrao Kolhe Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sumit Nitinrao Kolhe Patil:

Share

Category