Ashutosh Kale for Kopargaon

Ashutosh Kale for Kopargaon Office of Ashutosh Kale आमदार आशुतोषदादा काळे unofficial

कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना विविध कागदपत्र काढण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे जाण्यासाठी आमदार मा...
05/08/2026

कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना विविध कागदपत्र काढण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे जाण्यासाठी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या सहकार्यातून दर महिन्याप्रमाणे देण्यात आलेल्या वाहनांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक रमेशजी गवळी, फकीरमामु कुरेशी, दिनकरजी खरे आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.
#दिव्यांग_बांधव #मोफत_वाहन_व्यवस्था

♿ दिव्यांग बांधवांसाठी मोफत वाहन व्यवस्था!आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदारसंघातील दिव्या...
03/08/2026

♿ दिव्यांग बांधवांसाठी मोफत वाहन व्यवस्था!

आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे नवीन दिव्यांग प्रमाणपत्र व युनिक आयडी (UDID) कार्ड प्रक्रियेसाठी जाण्या-येण्यासाठी *मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

📅 बुधवार, दि. ०५ ऑगस्ट २०२६
⏰ सकाळी ६:०० वाजता
📍 श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कोपरगाव

दिव्यांग बांधवांनी आवश्यक कागदपत्रांसह पूर्वनोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा.

दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध..
#दिव्यांग_बांधव #मोफत_वाहन_व्यवस्था

कोपरगाव मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचे ✨ अभिष्टचिंतन ✨📅 मंगळवार, दि. ०४ ऑगस्ट २०२६⏰ सकाळी ...
02/08/2026

कोपरगाव मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचे

✨ अभिष्टचिंतन ✨

📅 मंगळवार, दि. ०४ ऑगस्ट २०२६
⏰ सकाळी १०.०० ते दुपारी २.००
📍 कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव

आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे साध्या पद्धतीने आपले आशिर्वाद व शुभेच्छा स्विकारण्यासाठी उपस्थित राहतील.

01/08/2026

रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सुरेगाव (कोळपेवाडी) येथे कर्मवीर भाऊराव पाटील अकॅडमीच्या वतीने आयोजित ‘कर्मवीर शंकरराव काळे स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचा‘ उद्घाटन सोहळा !

आपल्या लेखणीतून शोषितांचा आवाज मांडणारे, स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व लोकशाहिर अण...
01/08/2026

आपल्या लेखणीतून शोषितांचा आवाज मांडणारे, स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी कोपरगाव येथे त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

तसेच कोपरगाव शहरात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी भेट दिली व लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.

यावेळी नितीनजी साबळे, अर्जुनजी मरसाळे, राजेंद्रजी खैरनार, दिलीपजी तुपसुंदर, संतोषजी मरसाळे, सुनिलजी वैरागळ, राजेंद्रजी वैरागळ, संजयजी साळवे, भागवत साहेब, रवीजी धिवर,भारतजी सदर, राजेंद्रजी कांबळे, समाधानजी शिंदे, बुधाजी भालेराव, सचिनजी आहिरे, अनिलजी आवारे, सचिनजी पाटोळे, पवनजी निर्मळ, शुभमजी आहिरे, अरुणजी मरसाळे, अजयजी जगधने, नितीनजी ताकवणे, विजयजी मरसाळे, राहुलजी सौदागर, दिपकजी मरसाळे, आकाशजी मरसाळे, अमोलजी सौदागर, दिनेशजी गायकवाड, मयूरजी रीळ, ज्ञानेश्वरजी घोडेस्वार, सनीजी रिळ, रंगनाथजी मरसाळे, रवींद्रजी मरसाळे, नामदेवजी पगारे, मंगेशजी मरसाळे, रणवीरजी आहिरे, किशोरजी आहिरे, फकीराजी चंदनशिव, संदिपजी निरभवणे आदी समाजबांधवांसह सुनिलजी गंगुले, नगरसेवक मंदारजी पहाडे, राजेंद्रजी वाकचौरे, शैलेशजी साबळे, विजयजी त्रिभुवन, संदिपजी कपिले, राहुलजी शिरसाठ, इम्तियाजभाई अत्तार, सोमनाथजी आढाव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनारजी कुदळे, माजी नगरसेवक कृष्णाजी आढाव, बाळासाहेबजी आढाव, शिवाजीराव खांडेकर, रमेशजी गवळी, फकीरमामु कुरेशी, दिनकरजी खरे, अरुणजी त्रिभुवन, सचिनजी परदेशी, जावेदभाई शेख, राहुलजी सोनवणे, राजेंद्रजी जोशी, मुकुंदजी भूतडा, प्रशांतजी वाबळे, सागरजी आहेर, संदिपजी सावतडकर, विशालजी निकम, अनिलजी जाधव, प्रसादजी रुईकर, प्रदीपजी कुऱ्हाडे, योगेशजी वाणी, गणेशजी गोसावी, नितीनजी शेलार, मयूरजी राऊत, भाऊसाहेबजी भाबड, संजयजी दुशिंग, राजेंद्रजी उशिरे, दिनेशजी गाडेकर, ओमजी आढाव, हर्षलजी जैस्वाल, हारुणभाई शेख, अजयजी शेळके आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
#लोकशाहिर_अण्णाभाऊ_साठे

कोपरगाव येथे आयोजित दैनिक सार्वमतच्या कोपरगाव विभागीय कार्यलयाच्या वर्धापन दिन सोहळ्यास आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उ...
31/07/2026

कोपरगाव येथे आयोजित दैनिक सार्वमतच्या कोपरगाव विभागीय कार्यलयाच्या वर्धापन दिन सोहळ्यास आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले.

यावेळी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि समाजमनाचा आवाज बनलेले दैनिक सार्वमत पुढील काळातही निष्ठेने पत्रकारितेची परंपरा जपत यशस्वी वाटचाल करत राहो, अशा शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी परमपूज्य श्री राघवेश्वरानंदगिरीजी महाराज, दैनिक सार्वमतचे संपादक अनंतजी पाटील, जाहिरात व्यवस्थापक आश्विनजी मुथा, उपसंपादक नानासाहेबजी शेळके, कोपरगाव प्रतिनिधी राहुलजी देवरे, सुनिलजी गंगुले, नगरसेवक मंदारजी पहाडे, हाजी मेहमूदभाई सय्यद, जनार्दनजी कदम, सोमनाथजी आढाव, विजयजी त्रिभुवन, माजी नगरसेवक रमेशजी गवळी, बाळासाहेबजी आढाव, राजेंद्रजी उशिरे, मनोजजी कडू आदी मान्यवर उपस्थित होते.
#सार्वमत

महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट, कोपरगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान ...
31/07/2026

महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट, कोपरगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली.

याप्रसंगी लाभार्थी नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शासनाच्या विविध महसुली सेवा, दाखले, प्रलंबित प्रकरणे आणि नागरिकांच्या अडचणींचे त्वरित निराकरण करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला. नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी महाराजस्व अभियान उपयुक्त ठरत आहे.

यावेळी अपर पोलीस अधिक्षक सोमनाथजी वाकचौरे, तहसीलदार महेशजी सावंत, कोपरगाव शहरचे पोलीस निरीक्षक उद्धवजी डमाळे, गटविकास अधिकारी स्वप्निलजी वाळुंज, सहाय्यक गटविकास अधिकारी संदीपजी दळवी, नगरपरिषद मुख्याधिकारी अजितजी निकत, तालुका कृषी अधिकारी मनोजजी सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी महेबूबजी शेख, नायब तहसीलदार सौ. प्रफुल्लिताताई सातपुते, चंद्रशेखरजी कुलथे, गटशिक्षणाधिकारी शबानाताई शेख, सहकारी संस्था सहाय्यक निबंधक संदीपकुमार रुद्राक्ष, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक राजेंद्रजी खरोटे, बालविकास प्रकल्प अधिकारी रुपालीताई धुमाळ आदींसह सर्व विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रवीणजी शिंदे, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, आजी - माजी नगरसेवक, पत्रकार, लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.
#छत्रपती_शिवाजी_महाराज #महाराजस्व_अभियान

31/07/2026

गुरुपौर्णिमा महोत्सव - आत्मा मालिक ध्यानपीठ
#गुरुपौर्णिमा #आत्मा_मालिक

नगर - मनमाड हायवे कोपरगाव येथे रमेशजी कोष्टी व प्रकाशजी गोंदकर यांनी सुरू केलेल्या साईमाया रेस्टॉरंट व बँक्वेट हॉलच्या श...
30/07/2026

नगर - मनमाड हायवे कोपरगाव येथे रमेशजी कोष्टी व प्रकाशजी गोंदकर यांनी सुरू केलेल्या साईमाया रेस्टॉरंट व बँक्वेट हॉलच्या शाखेला आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी सदिच्छा भेट दिली व त्यांना या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वरजी गोंदकर, गौतम सहकारी बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेबजी कोते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकरराव रोहोम, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे संचालक महेशजी लोंढे आदींसह कोष्टी व गोंदकर परिवार, आप्तेष्ट आदी उपस्थित होते.

Address

Kopargaon
423601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashutosh Kale for Kopargaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ashutosh Kale for Kopargaon:

Shortcuts

Share