आम्ही भैय्याशेठ सामंत समर्थक

  • Home
  • India
  • Kudal
  • आम्ही भैय्याशेठ सामंत समर्थक

आम्ही भैय्याशेठ सामंत समर्थक मा. भैय्याशेठ सामंत यांच्या कट्टर समर्थकांसाठी हे पेज काढण्यात आले आहे नक्की फोल्लो करा ✌🏻

💥 *सौंदळ येथे शिवसेना–युवासेना संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात संपन्न...*📍*ता.राजापूर*सौंदळ मांजरेवाडी,ता. राजापूर येथे *...
21/08/2026

💥 *सौंदळ येथे शिवसेना–युवासेना संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात संपन्न...*

📍*ता.राजापूर*

सौंदळ मांजरेवाडी,ता. राजापूर येथे *अपूर्वा किरण सामंत* यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थ व शिवसेना–युवासेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात संपन्न झाली.

यावेळी गावातील शिवसेना–युवासेना पक्ष संघटना अधिक सक्षम व बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारीचा आढावा घेत ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला.

तसेच सौंदळ गावाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेली विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न व स्थानिक समस्या यांची माहिती घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन अपूर्वा किरण सामंत यांनी दिले.

याप्रसंगी *शिवसेना जि.प. श्री.प्रकाश कुवळेकर, उपतालुकाप्रमुख श्री.चंद्रकांत जानस्कर, जि.प.सदस्य श्री. प्रतीक मटकर, पं.स.सदस्य श्री.उमेश पराडकर, उप विभागप्रमुख श्री.महादेव गुरव* यांच्यासह शिवसेना–युवासेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

युवासेना संगमेश्वर तालुका कार्यकारिणी बैठकीस *युवासेना कार्यकारिणी सदस्य,महाराष्ट्र राज्य अपूर्वा किरण सामंत* यांच्या प्...
19/08/2026

युवासेना संगमेश्वर तालुका कार्यकारिणी बैठकीस *युवासेना कार्यकारिणी सदस्य,महाराष्ट्र राज्य अपूर्वा किरण सामंत* यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

💥*अपूर्वा किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गोविळ येथे राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेचा उत्साह...* गोविळ ग्रामस्थ मं...
14/08/2026

💥*अपूर्वा किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गोविळ येथे राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेचा उत्साह...*

गोविळ ग्रामस्थ मंडळ, गोविळ,ता.लांजा यांच्या वतीने आयोजित *श्रावण भव्य राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा २०२६* उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेला *अपूर्वा किरण सामंत* यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत स्पर्धेचा आनंद लुटला.

यावेळी त्यांनी उपस्थित सर्व स्पर्धक शेतकरी बांधव व गोविळ ग्रामस्थांना स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल विशेष शुभेच्छा दिल्या. शेतीच्या पारंपरिक पद्धती, ग्रामीण संस्कृती आणि आपल्या मातीशी जोडलेल्या परंपरांचे जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मंडळाच्या माध्यमातून होत आहे,असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

चिखल नांगरणीसारख्या पारंपरिक स्पर्धांमुळे नव्या पिढीला शेती आणि ग्रामीण संस्कृतीची ओळख होते, असे सांगत सर्व स्पर्धकांनी सुरक्षिततेची काळजी घेत खेळाडूवृत्तीने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करत त्यांनी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी *शिवसेना तालुकाप्रमुख श्री.गुरुप्रसाद देसाई, तालुका संघटक श्री. प्रसाद माने, उपतालुकाप्रमुख श्री.सुजित आंबेकर, विभागप्रमुख श्री.दिनेश पवार, उप तालुकासंघटक श्री.चेतन खंदारे, पं.स.सदस्य सौ.साक्षी भिकाजी चव्हाण* यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, स्पर्धक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

12/08/2026

संघटनेचा आढावा, नव्या वाटचालीचा निर्धार! 🚩

▶️*साठवली विभागात शिवसेना संघटनात्मक ताकद वाढविण्याचा निर्धार; अपूर्वा किरण सामंत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक...*📍*रुण,...
11/08/2026

▶️*साठवली विभागात शिवसेना संघटनात्मक ताकद वाढविण्याचा निर्धार; अपूर्वा किरण सामंत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक...*

📍*रुण,ता.लांजा*

साठवली विभागातील ऋण गावात शिवसेना-युवासेना पक्ष संघटनेच्या आढावा बैठकीचे आयोजन *अपूर्वा किरण सामंत* यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासह विविध विकासकामे, स्थानिक समस्या, पूर्ण झालेल्या कामांचा आढावा तसेच नागरिकांच्या आवश्यकतांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन अपूर्वा किरण सामंत यांनी केले. “शिवसेना ही समाजकारण या विचारावर कार्य करणारी संघटना आहे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून शिवसेना-युवासेना हे जनतेच्या मनातील विश्वासाचे प्रभावी माध्यम बनवायचे आहे,” असे त्यांनी सांगितले.

गावागावांत संघटनात्मक बांधणी मजबूत करून आगामी काळात एकजुटीने व समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या.

या बैठकीस *शिवसेना तालुकाप्रमुख श्री.गुरुप्रसाद देसाई, उपतालुकाप्रमुख श्री. सुहास उर्फ बाळू खामकर, जि.प.सदस्य सौ.लीला घडशी, पं.स.उपसभापती श्री. आदेश आंबोळकर, विभागप्रमुख श्री.किरण शरे, उपविभागप्रमुख श्री.संतोष धामणे* यांच्यासह गावातील पदाधिकारी, कार्यकर्त उपस्थित होते.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

▶️*अपूर्वा किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत साठवलीत शिवसेना-युवासेनेची आढावा बैठक...*📍*साठवली,ता.लांजा*लांजा तालुक्या...
11/08/2026

▶️*अपूर्वा किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत साठवलीत शिवसेना-युवासेनेची आढावा बैठक...*

📍*साठवली,ता.लांजा*

लांजा तालुक्यातील साठवली येथे शिवसेना-युवासेना पक्ष संघटनेच्या आढावा बैठकीचे आयोजन *अपूर्वा किरण सामंत* यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक सक्षम व मजबूत करण्याच्या दृष्टीने या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी साठवली गावातील वाडीनिहाय पक्ष संघटनेचा आढावा घेत पदाधिकारी, कार्यकर्ते व विशेष कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जाताना गावातील पक्ष संघटनेची सद्यस्थिती, जनतेचा कल, स्थानिक प्रश्न तसेच विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

लोकसंपर्क वाढवून जनतेशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करा, तसेच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

*शिवसेना-युवासेना पक्ष संघटनेची चळवळ गावागावांत अधिक गतिमान ठेवून संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई* यांनी केले. यावेळी साठवलीतील झालेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत भविष्यातील आवश्यक विकासकामे, विविध समस्या व ग्रामस्थांच्या अडचणी यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी *शिवसेना तालुकाप्रमुख श्री.गुरुप्रसाद देसाई, उपतालुकाप्रमुख श्री. सुहास उर्फ बाळू खामकर, जि.प.सदस्या सौ.लीला घडशी, पं.स.उपसभापती श्री. आदेश आंबोळकर, विभागप्रमुख श्री.किरण शेरे, उपविभागप्रमुख श्री.संतोष धामणे* यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विशेष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

श्री गांगेश्वर स्पोर्ट्स क्लब, तळवडे आयोजित पावसाळी रबरी क्रिकेट स्पर्धेला भेट देत *अपूर्वा किरण सामंत* यांनी आयोजक मंडळ...
09/08/2026

श्री गांगेश्वर स्पोर्ट्स क्लब, तळवडे आयोजित पावसाळी रबरी क्रिकेट स्पर्धेला भेट देत *अपूर्वा किरण सामंत* यांनी आयोजक मंडळ व सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मंडळाच्या पदाधिकारी यांच्याकडून अपूर्व यांना शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख श्री. गुरुप्रसाद देसाई, उप तालुकाप्रमुख श्री.सुजित आंबेकर,उपनगराध्यक्ष श्री. मिलिंद उर्फ बाबा लांजेकर उपस्थित होते.

▶️*अपूर्वा किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव व ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा उत्साहात*📍*धुंदरे,ता.लां...
09/08/2026

▶️*अपूर्वा किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव व ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा उत्साहात*

📍*धुंदरे,ता.लांजा*

श्री कालभैरव योगेश्वरी नगर, धुंदरे यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव तसेच सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा *अपूर्वा किरण सामंत* यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान करून त्यांच्या कार्यकर्तृत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी बोलताना अपूर्वा किरण सामंत यांनी मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाला सन्मान देतानाच नव्या पिढीतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा हा सोहळा निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा देणारे तसेच समाजामध्ये सकारात्मक विचारांची पेरणी करणारे असे उपक्रम सातत्याने राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्री कालभैरव योगेश्वरी नगर हे एकजूट, परस्परांवरील विश्वास आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून, त्यातून समाजासमोर एक सकारात्मक आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण होत असल्याचे यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले.

या कार्यक्रमास *शिवसेना तालुकाप्रमुख श्री.गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्ष सौ.सावली सुनील कुरूप, उपनगराध्यक्ष श्री.मिलिंद उर्फ बाबा लांजेकर, नगरसेविका सौ. निधी निलेश गुरव, नगरसेवक श्री. पंढरी मायशेटे, उपतालुकाप्रमुख श्री.सुजित आंबेकर, मा.उपनगराध्यक्ष श्री.रविंद्र कांबळे, शिवसेना शाखाप्रमुख श्री.रितेश गुरव, मंडळाचे अध्यक्ष श्री.शंकर रणदिवे सर,निलेश गुरव, अमोल शेलार* यांच्यासह कालभैरव नगरमधील ग्रामस्थ, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनुभवाचा आशीर्वाद आणि तरुण नेतृत्वाची नवी उमेद...
07/08/2026

अनुभवाचा आशीर्वाद आणि तरुण नेतृत्वाची नवी उमेद...

आषाढी एकादशीच्या निमित्ताने *अपूर्वा किरण सामंत* यांनी राजापूर बाजारपेठेतील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात मनोभावे दर्शन घेत...
25/07/2026

आषाढी एकादशीच्या निमित्ताने *अपूर्वा किरण सामंत* यांनी राजापूर बाजारपेठेतील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात मनोभावे दर्शन घेत, दिंडीत सहभागी होत राजापूरवासीय व वारकऱ्यांसमवेत हरिनामाच्या गजरात भक्तिमय वातावरण अनुभवले.


Address

Kudal
Kudal

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम्ही भैय्याशेठ सामंत समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share