17/10/2025
भाजपा लातूर शहर जिल्ह्याच्या पाठपुराव्याला यश, अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा !
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने लातूर शहर आणि परिसरात प्रचंड हानी केली होती. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, मालमत्तेचे नुकसान झाले आणि नागरिकांवर संकट कोसळले. या कठीण काळात भारतीय जनता पक्ष, लातूर शहर जिल्हा नागरिकांच्या सोबत ठामपणे उभा राहिला.
राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मा. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांनी परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाला पंचनामे करून मदत देण्याचे आदेश दिले. त्यानंतर पक्षाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नुकसान भरपाई प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली.
आज या प्रयत्नांना यश मिळाले असून 1070 अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांच्या खात्यावर प्रत्येकी ₹10,000 प्रमाणे एकूण ₹1 कोटी 7 लाख रुपयांची नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे.
यापूर्वीच 1176 कुटुंबांना ₹1 कोटी 17 लाख 60 हजार इतकी मदत देण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत 2246 कुटुंबांना प्रत्येकी ₹10,000 प्रमाणे दिलासा मिळाला आहे, तर उर्वरित 408 कुटुंबांना लवकरच मदत मिळणार आहे.
अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या भाजपा लातूर शहर जिल्हा आणि शहर जिल्हाध्यक्ष अजित भैया पाटील कव्हेकर यांच्या पाठपुराव्याचे हे यश आहे.
संकटाच्या काळात लातूरकरांना दिलासा देणाऱ्या या संवेदनशील निर्णयाबद्दल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांचे मनःपूर्वक आभार.
सणासुदीच्या काळात मिळालेली ही मदत लातूरकरांसाठी दिलासा आणि आशेचा किरण ठरली आहे.
Devendra Fadnavis Chh.ShivendraRaje Bhonsle BJP Maharashtra Ravindra Chavan Vikrant Patil Ajeet Patil Kavhekar Sambhaji Patil Nilangekar Abhimanyu Pawar Rameshappa Karad Ajeetparv - अजितपर्व