Office Of Dhiraj Vilasrao Deshmukh

Office Of Dhiraj Vilasrao Deshmukh Office Of MLA - Latur Gramin (Rural) Maharashtra - Indian National Congress

23/07/2026
17/07/2026

री-नीट (NEET) 2026 परीक्षेत लातूरच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत 'लातूर पॅटर्न'चा लौकिक कायम राखला आहे. एकट्या राजर्षी शाहू महाविद्यालयातील 450 हून अधिक विद्यार्थ्यांना MBBS प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता असून, संपूर्ण लातूर जिल्ह्यातील 1200 हून अधिक विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे यश विद्यार्थ्यांची अथक मेहनत, पालकांचा विश्वास आणि शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन याचे फलित आहे. लातूरने पुन्हा एकदा महाराष्ट्रासह देशभरात आपल्या शैक्षणिक परंपरेची ताकद सिद्ध केली आहे.
नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या वादामुळे लातूरच्या शैक्षणिक प्रतिमेबाबत काही शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. मात्र, विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट निकालातून त्या सर्व शंकांना आणि आरोपांना आपल्या गुणवत्तेच्या बळावर उत्तर दिले आहे.

या उल्लेखनीय यशासाठी सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षण संस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन! लातूरच्या शैक्षणिक परंपरेचा हा अभिमान असाच कायम राहो, हीच शुभेच्छा.

पंचनामे करून शेतक-यांना आर्थिक मदत द्या : माजी आमदार धिरज देशमुख यांची सरकारकडे मागणी            Dhiraj Vilasrao Deshmuk...
13/07/2026

पंचनामे करून शेतक-यांना आर्थिक मदत द्या : माजी आमदार धिरज देशमुख यांची सरकारकडे मागणी

Dhiraj Vilasrao Deshmukh Indian National Congress - Maharashtra

13/07/2026

निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीच्या नावाखाली राज्यातील तब्बल ९२ लाख माता-भगिनींची नावे अचानक यादीतून वगळण्यात आली आहेत, ही अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बाब आहे. एकूण लाभार्थ्यांपैकी तब्बल ३८% महिलांना एका झटक्यात अपात्र ठरवण्यात आले आहे.

केवळ E-KYC आणि तांत्रिक त्रुटींचे कारण देऊन ६२ लाख महिलांचे अर्ज रद्द केले गेले. उत्पन्न मर्यादेचे जाचक निकष लावून १२ लाख महिलांना नाकारले गेले. इतर छोट्या योजनांचा लाभ घेतात म्हणून ३.६ लाख महिलांचे हक्क हिरावले गेले.

बँकांच्या चकरा मारून आणि सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही जर तांत्रिक त्रुटी सुटत नसतील, तर त्यात माझ्या गरीब भगिनींचा काय दोष? आधीच महागाईने कंबरडे मोडलेले असताना, निवडणुकीपुरते दिलेले आश्वासन आता निकषांच्या कात्रीत अडकवले जात आहे का? सरकारने तातडीने या जाचक अटी शिथिल करून या ९२ लाख महिलांना पुन्हा न्याय दिला पाहिजे.
#महिलांचा_अधिकार #लातूर
CMOMaharashtra Devendra Fadnavis Sunetra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Indian National Congress - Maharashtra

10/07/2026
03/07/2026

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते आदरणीय मल्लिकार्जुन खर्गे जी यांची राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून पुन्हा एकदा निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक #अभिनंदन!

संसदीय लोकशाहीची मूल्ये जपत, जनतेच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे त्यांचे नेतृत्व देशासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष संसदेत जनसामान्यांच्या हक्कांसाठी आणि लोकहिताच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे आवाज उठवत राहील, असा विश्वास आहे.

आदरणीय खर्गे साहेबांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
ji
Rahul Gandhi Priyank Kharge Priyanka Gandhi Vadra Indian National Congress Indian National Congress - Maharashtra

Address

Ekmat Bhavan, MIDC B-44
Latur
413512

Telephone

+919023599999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Office Of Dhiraj Vilasrao Deshmukh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category