06/08/2026
🌟 स्वप्नांना आधार मिळाला… आणि मेहनतीने यशाला गवसणी घातली! 🌟
हार्दिक अभिनंदन तंनजिल निजामोद्दीन आत्तार! 💐👏
आर्थिक परिस्थिती सामान्य असली तरी मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस ज्यांच्यात असते, त्यांना योग्य वेळी मिळालेली साथ त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकते. तंनजिल निजामोद्दीन आत्तार हिची यशोगाथा ही अशाच जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाची प्रेरणादायी कहाणी आहे.
तंनजिलच्या पालकांनी तिच्या शिक्षणासाठी मदतीची विनंती केली होती. तिच्या डोळ्यांतील डॉक्टर होण्याचे स्वप्न, अभ्यासातील सातत्य आणि प्रामाणिक मेहनत पाहून मला Stark Classes चा Chairman म्हणून तिच्या शिक्षणासाठी शक्य ते आर्थिक सहकार्य, मार्गदर्शन आणि सातत्याने प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली. आज त्या छोट्याशा मदतीचे मोठ्या यशात रूपांतर झाले, याचा मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो.
तंनजिलने आपल्या अथक परिश्रमाच्या बळावर NEET परीक्षेत ५७७ गुण मिळवत MBBS मध्ये प्रवेश निश्चित केला आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे अल्पसंख्यांक समाजातील ही गुणवंत विद्यार्थिनी आता डॉक्टर बनून समाजसेवा करणार असून, पुढे PG (Post Graduation) करून वैद्यकीय क्षेत्रात आणखी मोठे यश संपादन करण्याचा तिचा निर्धार आहे.
तिचे शिक्षण येथेच थांबणार नाही. तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठीही दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शक्य ते सर्व सहकार्य करण्याचा आमचा प्रयत्न राहील. कारण एका विद्यार्थिनीला दिलेला आधार म्हणजे संपूर्ण समाजाच्या उज्ज्वल भविष्यात केलेली गुंतवणूक असते.
तंनजिलने इयत्ता ११ वी व १२ वीचे शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे पूर्ण केले. त्यानंतर Repeater म्हणून स्टार्क क्लासेस लातूर येथे पूर्ण केले.
तिच्या मते, Stark Classes मधील नियमित Test Series, उत्कृष्ट Management, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सराव यामुळे NEET परीक्षेची प्रभावी तयारी होऊन हे यश मिळवणे शक्य झाले.
या यशानिमित्त तंनजिलचा सत्कार तिच्या भावी वैद्यकीय प्रवासाला प्रेरणा मिळावी या उद्देशाने मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. डॉ. असद पठाण, आमचे मार्गदर्शक मशायक साहेब तसेच राष्ट्रपती पदकाने सन्मानित पोलिस अधिकारी गल्लेकाटु साहेब यांच्या हस्ते तिचा सत्कार करून तिला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा आणि मोलाचे मार्गदर्शन देण्यात आले.
प्रिय तंनजिल, तुझी ही जिद्द, मेहनत आणि यश असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. खुदा तुझ्या आयुष्यात अधिक यश, उत्तम आरोग्य आणि समाजसेवेची ताकद देवो, हीच मनःपूर्वक दुआ.
💐 तंनजिल आणि तिच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन! उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 🌹