16/08/2024
"एक राज्य एक गणवेश" योजना प्रभावीपणे राबवा - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचीची मागणी
विद्यार्थांच्या गणवेशात मापात - पाप, करणाऱ्यांवर कारवाईची मागणी.
एक राज्य एक गणवेश ही योजना राज्यात लागू करण्यात आली असून यानुसार प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना एकाच गणवेशाची सक्ती आणि वाटप करण्यात येतं आहे. मात्र देशाचा स्वातंत्र्य दिन अवघ्या दोन दिवसावर आला असतांना अद्याप हि जिल्हयातील अनेक शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही किंवा आकारानुसार न मिळाल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. या सर्व प्रकाराची दखल घेऊन ही समस्या दूर करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वीच विद्यार्थ्यांकडे गणवेश नसल्यानें ठराविक गणवेश व्यतिरिक्त अन्य अनवशात स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागेल अशी नामुष्कीची वेळ यवतमाळ जिल्हयावर येवुन ठेपलेली आहे. हि अतिशय गंभीर बाब असुन शाळेचे सत्र सुरु होवुन साधारणतः दोन महिने उलटुन गेलेले आहे. परंतु, गणवेशाचे गांभीर्य अजुन सुध्दा जाणवत नाही. परिस्थिती अशी सुध्दा आहे की, अनेक विद्यार्थ्यांना एकाच मापाचे गणवेश देण्यात आले. वास्तविक पाहता प्रत्येकाच्या शरीरयष्टी पाहुन व योग्य ते मोजमाप करुन गणवेश शिवणे अपेक्षित होते. आता परिस्थिती अशी झाली आहे की, शिवलेले गणवेश कोणाला लहान तर कोणाला मोठे होत असल्याने सर्वत्र तारांबळ उडालेली आहे. त्यामुळे या संपुर्ण प्रकाराला आळा घालण्यासाठी शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करावा व कामात हलगर्जी करण्या-या लोकांवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आज दिलेल्या निवेदनातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी केली आहे.
या प्रसंगी मनसे जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार , मनसे शहर अध्यक्ष अमित बदनोरे , यश शिंगारे, अंजनेश कालंकार , दर्शन साईराम कवडे , अमितेश आडे , साहिल जतकर, हेमंत दुर्गे, दर्शन जांभूरे यांच्या सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.