Latur Police Department

Latur Police Department This is Latur District Official Page

५४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत लातूर पोलिसांचा संदेश 👮‍♂️📚‘पोलीस–विद्यार्थी संवाद’ उपक्रमात २२ दिवसांत १७४ भेटी; ...
23/08/2026

५४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत लातूर पोलिसांचा संदेश 👮‍♂️📚

‘पोलीस–विद्यार्थी संवाद’ उपक्रमात २२ दिवसांत १७४ भेटी; ५४,५४७ विद्यार्थ्यांशी संवाद

दि. १ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत दि. २२ ऑगस्ट २०२६ पर्यंत जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १७४ शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसना भेटी देण्यात आल्या.
🔹 तब्बल ५४,५४७ विद्यार्थ्यांना कायदा, सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती, वाहतूक नियम, महिला व बालकांचे संरक्षण आणि सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शन.
👮 पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी स्वतः ४ ठिकाणी भेट देऊन ८,७०० विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
📍 दि. २२ ऑगस्ट रोजी मुरूड, जळकोट, रेणापूर, लातूर ग्रामीण, औराद व देवणी येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
🔹 पोउपनि. श्री नाडे, सपोनि. श्री माचेवाड, सपोनि. श्री शिंदे, पोनि. श्री सूर्यवंशी, सपोनि. श्री बांगर व सपोनि. श्री खोडेवाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

🛡️ ‘सुरक्षित विद्यार्थी–सुरक्षित समाज’ या उद्देशाने लातूर पोलिसांची जनजागृती मोहीम सातत्याने सुरू राहणार.
#लातूरपोलीस #पोलीसविद्यार्थीसंवाद #सुरक्षितविद्यार्थी #सुरक्षितसमाज

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी लातूर पोलिसांची जनजागृती मोहीम सातत्याने सुरू 👮‍♂️📚‘पोलीस–विद्यार्थी संवाद’ उपक्र...
23/08/2026

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी लातूर पोलिसांची जनजागृती मोहीम सातत्याने सुरू 👮‍♂️📚

‘पोलीस–विद्यार्थी संवाद’ उपक्रमात २१ दिवसांत १६७ भेटी; ५२,५८७ विद्यार्थ्यांशी संवाद
दि. १ ऑगस्टपासून सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत दि. २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १६७ शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसना भेटी देण्यात आल्या.

🔹 तब्बल ५२,५८७ विद्यार्थ्यांना कायदा, सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती, वाहतूक नियम, महिला व बालकांचे संरक्षण आणि सोशल मीडिया सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन.

👮 पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी स्वतः ४ ठिकाणी भेट देऊन ८,७०० विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

📍 दि. २१ ऑगस्ट रोजी अहमदपूर, शिरूर अनंतपाळ, एमआयडीसी, शिवाजीनगर, रेणापूर, देवणी, वाढवणा, मुरूड, उदगीर शहर, उदगीर ग्रामीण व लातूर ग्रामीण येथे मार्गदर्शन करण्यात आले.

🔹 उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रायबोले, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक श्री. जाधव, पोलीस निरीक्षक श्री. चावरे, श्री. पाटील, श्री. देडे यांच्यासह विविध अधिकारी सहभागी झाले.

‘सुरक्षित विद्यार्थी–सुरक्षित समाज’ या उद्देशाने लातूर पोलिसांची जनजागृती मोहीम पुढेही सुरू राहणार.
#लातूरपोलीस #पोलीसविद्यार्थीसंवाद #सुरक्षितविद्यार्थी #सुरक्षितसमाज

प्रतिबंधित गुटख्याच्या वाहतुकीवर लातूर पोलिसांचा घणाघाती प्रहार! 🚔वाढवणा हद्दीत ₹५.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटकदि...
23/08/2026

प्रतिबंधित गुटख्याच्या वाहतुकीवर लातूर पोलिसांचा घणाघाती प्रहार! 🚔

वाढवणा हद्दीत ₹५.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक

दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाळी ते शिरूर ताजबंद मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली.

🔹 मुबीन सिद्दिख सय्यद, वय २९ वर्षे, रा. दर्गापूर, अहमदपूर यास ताब्यात घेण्यात आले.
🔹 कारवाईत ₹१.८७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.
🚗 वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सुमारे ₹४ लाखांची मारुती सुझुकी बलेनो कारही जप्त.
एकूण ₹५,८७,२०० किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, मनोज खोसे, आनंद हल्लाळे व प्रविण कोळसुरे यांनी केली.

🚫 प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध लातूर पोलिसांची कारवाई सुरूच राहणार.
#लातूरपोलीस #गुटखाबंदी #अवैधधंद्यांवरकारवाई #स्थानिकगुन्हेशाखा

शिक्षण, स्वसंरक्षण आणि डिजिटल सुरक्षिततेची नवी दिशा! 👩‍🎓🛡️लातूर पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांचे ८५० विद्यार्थिनींना...
22/08/2026

शिक्षण, स्वसंरक्षण आणि डिजिटल सुरक्षिततेची नवी दिशा! 👩‍🎓🛡️

लातूर पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांचे ८५० विद्यार्थिनींना मार्गदर्शन.
लातूरच्या शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

👮‍♂️ पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी विद्यार्थिनींशी तब्बल दोन तास संवाद साधला.
📚 शिक्षण पूर्ण करूनच स्पर्धा परीक्षेची दिशा निवडावी, सातत्य व नियोजनातून ध्येय गाठावे, असा सल्ला दिला.
🥋 कराटे व स्वसंरक्षणासोबत मानसिक आणि डिजिटल सुरक्षिततेचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.
📱 सोशल मीडिया, अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट, वैयक्तिक माहिती शेअर करणे आणि ऑनलाइन व्यवहारांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले.
💡 आई-वडिलांचा विश्वास जपत शिक्षण, करिअर आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशस्वी होण्याचा संदेश दिला.
#लातूरपोलीस #पोलीसविद्यार्थीसंवाद #महिलासुरक्षा #सायबरसुरक्षा

🐐 शेळीचोरीच्या टोळीचा पर्दाफाश; २१ गुन्हे उघडकीसलातूर जिल्ह्यात शेतकरी व पशुपालकांना त्रास देणाऱ्या शेळी चोरीच्या टोळीवर...
22/08/2026

🐐 शेळीचोरीच्या टोळीचा पर्दाफाश; २१ गुन्हे उघडकीस

लातूर जिल्ह्यात शेतकरी व पशुपालकांना त्रास देणाऱ्या शेळी चोरीच्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.
🚨 दोन आरोपींना अटक; चोरीच्या शेळ्यांच्या विक्रीतून मिळालेली ११.७५ लाखांची रोकड हस्तगत.

📍 चापोली, शिरूर ताजबंद ते चाकूर रोडवरील पांडुरंग हॉटेलसमोर सापळा रचून कारवाई.

▪️ कैलास राम वळींग्रे व बालाजी खंडु माने यांना ताब्यात घेण्यात आले.
💰 रोख रक्कम, छोटा टेम्पो व मोटारसायकल असा तब्बल १७.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

🐐 अहमदपूर, चाकूर, औसा, लातूर ग्रामीण, वाढवणा, रेणापूर, देवणी, निलंगा, किनगाव व भादा येथील एकूण २१ शेळी चोरीचे गुन्हे उघडकीस.

🔎 अमोल गिरधारी गुंजरगे व आत्माराम उर्फ पप्पू माधवराव जाधव हे आरोपी साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
👮 ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस निरीक्षक विनोद म्हेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
शेतकरी व पशुपालकांनी रात्रीच्या वेळी पशुधनाच्या सुरक्षेबाबत विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे.
#लातूरपोलीस #शेळीचोरी #गुन्हेउघडकीस #स्थानिकगुन्हेशाखा

२० दिवसांत ४७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत लातूर पोलिसांचा संदेश📚👮विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी लातूर पोल...
21/08/2026

२० दिवसांत ४७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत लातूर पोलिसांचा संदेश
📚👮

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी लातूर पोलिसांचा ‘पोलीस–विद्यार्थी संवाद’ उपक्रम प्रभावीपणे सुरू आहे.

📅 दि. १ ते २० ऑगस्ट २०२६ दरम्यान २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १५० शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसना भेटी.

👥 तब्बल ४७,०८९ विद्यार्थ्यांना कायदे, सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती, वाहतूक नियम आणि महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन.

▪️ पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी स्वतः ३ ठिकाणी ७,८५० विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
📱 सोशल मीडियाचा सुरक्षित वापर व सायबर फसवणुकीपासून बचावाबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
🛡️ दि. २० ऑगस्ट रोजी उदगीर, कासारशिर्शी, चाकूर, औसा, मुरूड, रेणापूर, किल्लारी, अहमदपूर, गांधी चौक व विवेकानंद चौक परिसरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.

👮 या मार्गदर्शनात सपोनि श्री. करवीर, सपोनि श्री. गर्जे, पोनि श्री. ढमाळे, पोनि श्री. देढे, सपोनि श्री. अंधारे, सपोनि श्री. जाधव, सपोनि श्री. उजगरे यांच्यासह पोलीस अधिकारी सहभागी झाले.
पोउपनि श्री. केंद्रे, श्री. चामले, श्रीमती जाधव व श्रीमती रायपल्ले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सुरक्षित विद्यार्थी–सुरक्षित समाज या उद्देशाने हा उपक्रम यापुढेही सातत्याने सुरू राहणार.
#लातूरपोलीस #पोलीसविद्यार्थीसंवाद #विद्यार्थीसुरक्षा #सायबरसुरक्षा

चार वर्षीय आरोहीची चार तासांत पालकांशी सुखरूप भेट👧 देवणीच्या आठवडी बाजारात आईपासून दुरावलेल्या चार वर्षीय आरोहीला देवणी ...
21/08/2026

चार वर्षीय आरोहीची चार तासांत पालकांशी सुखरूप भेट

👧 देवणीच्या आठवडी बाजारात आईपासून दुरावलेल्या चार वर्षीय आरोहीला देवणी पोलिसांनी तत्परतेने शोधून पालकांच्या ताब्यात दिल्याबद्दल अभिनंदन!

📅 दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायं. ४ वाजता देवणी आठवडी बाजार परिसरात ही मुलगी पालकांपासून दुरावलेल्या अवस्थेत आढळली.

📱 मुलीची ओळख पटवण्यासाठी तिचे छायाचित्र व माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली.
🔎 सायं. ८ वाजता तिचे वडील अजय चव्हाण देवणी पोलीस ठाण्यात दाखल झाले.

👨‍👧 आवश्यक पडताळणीनंतर आरोहीला सुखरूप तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

🤝 देवणी पोलिसांच्या संवेदनशील व तत्पर कार्यवाहीमुळे अवघ्या चार तासांत कुटुंबाची मुलीशी भेट झाली.

पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी देवणी पोलीस पथकाचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

पालकांनी गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे.

📞 मूल हरवल्यास तात्काळ डायल ११२, चाइल्ड हेल्पलाइन १०९८ किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा.
#लातूरपोलीस #देवणीपोलीस #बालसुरक्षा #पालकांची_जबाबदारी

शेतकऱ्याची चोरीस गेलेली म्हैस हस्तगत; आरोपी कासारशिर्शी पोलिसांच्या ताब्यात📅 दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजता नदी हत...
20/08/2026

शेतकऱ्याची चोरीस गेलेली म्हैस हस्तगत; आरोपी कासारशिर्शी पोलिसांच्या ताब्यात

📅 दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजता नदी हत्तरगा येथील शेतातून म्हैस चोरीस गेली होती.

📍 तपासादरम्यान चोरीच्या म्हशीचा फोटो मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली.

▪️ सुनील उर्फ मल्लीनाथ नागनाथ काटे, (रा. नांदगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव यास ताब्यात घेण्यात आले.)

🐃 आरोपीकडून शेतकऱ्याची अंदाजे १ लाख रुपये किमतीची म्हैस हस्तगत करण्यात आली.

▪️ तपासात नळदुर्ग पोलीस ठाण्यातील जनावर चोरीच्या तीन गुन्ह्यांशी आरोपीचा संबंध निष्पन्न झाला. 🐄 या तीन गुन्ह्यांतील चोरीस गेलेली जनावरेही पोलिसांनी हस्तगत केली.

👮 ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपासणी व कारवाईत कासारशिर्शी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच हेड कॉन्स्टेबल किशोर मोहन तपसे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
#लातूरपोलीस #कासारशिर्शीपोलीस #गुन्हेउघडकीस #शेतकरीसुरक्षा

🚔 ३९,५०९ विद्यार्थ्यांपर्यंत लातूर पोलिसांचा सुरक्षिततेचा संदेश‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ उपक्रमांतर्गत दि. १ ते १८ ऑगस्ट ...
20/08/2026

🚔 ३९,५०९ विद्यार्थ्यांपर्यंत लातूर पोलिसांचा सुरक्षिततेचा संदेश

‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ उपक्रमांतर्गत दि. १ ते १८ ऑगस्ट २०२६ दरम्यान जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १२५ शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसना भेटी देण्यात आल्या. 📚

या माध्यमातून ३९,५०९ विद्यार्थ्यांना कायदा, सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती, वाहतूक नियम व सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 👮‍♂️

पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी स्वतः ३ ठिकाणी भेट देत ७,८५० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

📍 दि. १८ ऑगस्ट रोजी अहमदपूर येथील विशेष मेळाव्यातही त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

• श्री. रायबोले, श्री. मायने, श्री. जाधव, श्री. गर्जे, श्री. चामले, श्री. ढमाळे, श्री. गढवे, श्री. देढे व श्री. वीरपक्ष यांनी विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 🤝

‘पोलीस तुमचे मित्र आहेत’ हा विश्वास दृढ करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी हा उपक्रम सातत्याने सुरू राहणार आहे. लातूर पोलिसांकडून प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक शाळा आणि प्रत्येक शैक्षणिक संस्थेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. 🇮🇳

🚨 गर्दीत चोरलेले दागिने पोलिसांनी शोधलेबसवेश्वर कॉलेज परिसरातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणत गांधी चौक पोलिसांनी ₹१.०३ लाखां...
19/08/2026

🚨 गर्दीत चोरलेले दागिने पोलिसांनी शोधले

बसवेश्वर कॉलेज परिसरातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणत गांधी चौक पोलिसांनी ₹१.०३ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

📅 दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता चोरीची घटना घडली होती.
📍 बसवेश्वर कॉलेज परिसर, लातूर.
• ५.६५० ग्रॅम सोन्याचे लॉकेट व ०.२५० ग्रॅम सोन्याची बुगडी हस्तगत. 💍
• महिला आरोपी सारिका दगडू काळे, वय ३६ वर्षे, रा. विलास नगर, लातूर हिला ताब्यात घेण्यात आले. 👮‍♂️

उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वात कारवाई. या पथकात पोउपनि. प्रमोद देशमुख, सफौ राजेंद्र टेकाळे, पोलीस अंमलदार राम गवारे, संतोष गिरी, सचिन चंद्रपाटले, शिवा भादुळे, गोविंद राठोड, महादेव फुले व महिला पोलीस अंमलदार ज्योती चौधरी यांनी परिश्रम घेतले. 👏

तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा लावण्यात आला. 🚔

Address

S P Office Ambajogai Road
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when Latur Police Department posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Latur Police Department:

Shortcuts

Share