28/03/2026
आज पी. एस. खुब्बा सीबीएसई स्कूल येथे महिला दिनानिमित्त आयोजित “सन्मान कर्तृत्वाचा, गौरव स्त्रीशक्तीचा” या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी लाभली.
या प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरवपूर्वक सन्मान करण्यात आला. आजची स्त्री केवळ घरापुरती मर्यादित न राहता शिक्षण, उद्योग, प्रशासन, क्रीडा तसेच विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाची ठळक छाप उमटवत आहे. आत्मविश्वास, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ती नवनवीन शिखरे सर करत असून समाजाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलत आहे, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास श्री. पुष्पराज खुब्बा सर, डॉ .सौ.वर्षा राजेश दरडे ,सौ. संगीता शिंदे तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.