सचिनभैया दाने फँन्स क्लब Sachin Dane FC

  • Home
  • India
  • Latur
  • सचिनभैया दाने फँन्स क्लब Sachin Dane FC

सचिनभैया दाने फँन्स क्लब Sachin Dane FC 80% समाजकारण 20%राजकारण

22/08/2026
11/08/2026

वसतिगृह प्रवेशासाठी ऑफलाईन अर्जाची संधी

लातूर, दि. 10:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणीमुळे अर्ज न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी स्थानिक वसतिगृहाचे गृहप्रमुख किंवा गृहपाल यांच्याकडे संपर्क साधून अर्ज भरावेत, असे आवाहन सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
जिल्ह्यात मुलांचे १४ व मुलींचे १२ अशी एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. लातूर शहरात मुलांचे ६ व मुलींचे ४ वसतिगृह आहेत. औसा, निलंगा, उदगीर, देवणी, चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे एक व मुलींचे एक वसतिगृह आहे. अहमदपूर येथे मुलांचे दोन व मुलींचे दोन, रेणापूर येथे मुलांचे एक आणि जळकोट येथे मुलींचे एक वसतिगृह कार्यरत आहे.

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी कनिष्ठ महाविद्यालय व बिगर व्यावसायिक वरिष्ठ महाविद्यालय वर्गाची प्रवेश निवड यादी प्रसिद्ध झाली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू असून अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे.

मागील वर्षी अंतिम वर्षात शिकणारे व स्वाधार योजनेसाठी अर्ज केलेले काही विद्यार्थी तांत्रिक कारणांमुळे चालू वर्षी वसतिगृह प्रवेश अर्ज करू शकले नाहीत. तसेच महाविद्यालयीन प्रवेश उशिरा झाल्याने किंवा अन्य तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन अर्ज न भरू शकलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना जागेअभावी वसतिगृह प्रवेश न मिळाल्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. मात्र, वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी स्वतंत्र अर्जाची सुविधा उपलब्ध राहणार नाही, असेही त्यांनी कळवले आहे.

06/08/2026
29/07/2026

#स्वराज्य #न्यायव्यवस्था #छत्रपती #जाणताराजा #भगवा

शेतकरी मित्रांनो, लक्ष द्या! कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेताना 'Agristack ID Error' येत आहे का? 🤔जर तुम्हाला पुण्यश्लोक अहिल...
29/07/2026

शेतकरी मित्रांनो, लक्ष द्या! कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेताना 'Agristack ID Error' येत आहे का? 🤔
जर तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ साठी KYC करताना "Agristack ID Error" असा मेसेज दिसत असेल, तर काळजी करू नका. ही समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला खालीलप्रमाणे सोपी प्रक्रिया करावी लागेल:

🚫 समस्येचे कारण: जमिनीच्या नोंदी (7/12) किंवा Agristack डेटामध्ये काही तफावत असल्याने ही एरर येत असू शकते.
✅ काय करावे? (उपाय):

१️⃣ तलाठी कार्यालयाशी संपर्क साधा: 🏃‍♂️ सर्वात आधी तुमच्या संबंधित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधा. ही एरर दूर करण्यासाठी तलाठी यांची मदत आवश्यक आहे.

२️⃣ तलाठी यांच्याकडून करावयाची प्रक्रिया: तलाठी त्यांच्या लॉगिन मधून खालील कृती करतील:
🔸 ROR Verify करणे: तुमचे 7/12 किंवा जमिनीच्या नोंदी तपासून Verify करतील.
🔸 ROR Update करणे: जमिनीच्या नोंदीत काही बदल असल्यास तो अद्ययावत (Update) करतील.
🔸 माहिती Save करणे: पडताळणी करताना दिसणाऱ्या दोन्ही पर्यायांमध्ये (Option 1 आणि 2) Yes / Yes निवडून माहिती Save करतील. लक्षात ठेवा, माहिती सेव्ह केल्याशिवाय बदल लागू होणार नाहीत.

३️⃣ KYC पुन्हा करून पहा: 📲 ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, 'Agristack ID' ची त्रुटी दूर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तुम्ही तुमची KYC प्रक्रिया पुन्हा करून पहावी.
💡 महत्त्वाची टीप: योग्य नोंदी आणि अद्ययावत माहितीमुळेच कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत मिळू शकतो. ⏳ म्हणून कृपया तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून आपली समस्या लवकरात लवकर सोडवा.
या उपयुक्त माहितीबद्दल तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की सांगा! ही माहिती शेअर करा. 🤝

#शिवसेना सचिनभैया दाने फँन्स क्लब Sachin Dane FC शेतकरी क्रांती आंदोलन लातूर जिल्हा शेतकरी योद्धा

#शेतकरी #कर्जमुक्तीयोजना #कृषी #शेतकरीपुत्र #712 #तलाठी #महाराष्ट्रशेतकरी

29/07/2026
29/07/2026

आपणांसारिखे करिती तात्काळ | नाही काळवेळ तयालागी ||
लोहपरिसाची न साहे उपमा | सदगुरु महिमा असा हा अगाध ||

वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य #धर्मवीर #आनंद_दिघे साहेब यांच्या चरणी साष्टांग दंडवत...!

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

#गुरुपौर्णिमा

Address

Latur
413527

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सचिनभैया दाने फँन्स क्लब Sachin Dane FC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category