वंचित बहुजन आघाडी - लातूर शहर

  • Home
  • India
  • Latur
  • वंचित बहुजन आघाडी - लातूर शहर

वंचित बहुजन आघाडी - लातूर शहर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from वंचित बहुजन आघाडी - लातूर शहर, Political Party, Latur.

हे लातूर शहरातील “वंचित बहुजन आघाडी”चे अधिकृत फेसबुक पेज आहे.
आमचे ध्येय – संविधानाच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय, समानता आणि लोकशाही मूल्यांसाठी संघर्ष करणे.

👉 आमच्या परिवारात सामील व्हा आणि “वंचित बहुजन आघाडी”चा आवाज लातूर शहरात बुलंद करा!

03/09/2026
03/09/2026

आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका काय, याची कोणालाच स्पष्टता नाही. आठ खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत जाऊन नरेंद्र मोदींना का भेटले, याच्याबद्दल कोणालाही माहीत नाही. सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नावरून कळाले आहे की, जरी युती राजकीय नसली झाली तरी कुटुंब सर्व आतमधून एकच आहे, हे सर्वांना दिसले आहे.

: सुजात आंबेडकर
राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी

जनतेने संधी दिली, वंचित जनतेच्या विश्वासाला जगत आहे!लातूर: नगरसेवक सचिन गायकवाड यांच्या सूचनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेसा...
03/09/2026

जनतेने संधी दिली, वंचित जनतेच्या विश्वासाला जगत आहे!

लातूर: नगरसेवक सचिन गायकवाड यांच्या सूचनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोकाट कुत्र्यांना पकडण्याची विशेष मोहीम राबवली

लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे लहान मुले, महिला व जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. नागरिकांची ही समस्या गांभीर्याने घेत आणि लोकांच्या सततच्या मागणी व विनंतीची तात्काळ दखल घेत, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक सचिन अर्जुन गायकवाड यांच्या पुढाकाराने विशेष मोहीम राबवण्यात आली.

'डॉग स्कॉड' (Dog Squad) टीमच्या माध्यमातून प्रभागातील खालील परिसरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा यशस्वीरित्या बंदोबस्त करण्यात आला आहे.

सुफिया मस्जिद परिसर, तथागत चौक, मदनी चौक, इस्लामपुरा, तानाजी चौक परिसर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रभागात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.

#लातूर

02/09/2026

आम्हाला तळागाळातून कार्यकर्त्याला नेतेपदी बसवायचे आहे. ज्या समाजापर्यंत सत्ता पोहोचली नव्हती, ज्या लोकांना लोकशाही म्हणजे काँग्रेस, भाजपला मतदान करणे, एवढेच कळाले होते. त्या लोकांना तिकीट देऊन बळ देऊन सत्तेच्या केंद्रस्थानी पोहचवायचे आहे.

: सुजात आंबेडकर
राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी

‎जश्न-ए-ईद मिलादुन्नबी ﷺ की दिली मुबारकबाद‎पैग़ंबर हज़रत मुहम्मद ﷺ ने इंसाफ, बराबरी, भाईचारे और इंसानियत का पैग़ाम दिया‎...
26/08/2026

‎जश्न-ए-ईद मिलादुन्नबी ﷺ की दिली मुबारकबाद

‎पैग़ंबर हज़रत मुहम्मद ﷺ ने इंसाफ, बराबरी, भाईचारे और इंसानियत का पैग़ाम दिया
‎आज उनके विचार हमें हर इंसान के सम्मान और समान अधिकारों के लिए खड़े होने की प्रेरणा देते हैं।

‎आइए, नफ़रत और भेदभाव के खिलाफ़ खड़े होकर इंसाफ, बराबरी और भाईचारे का समाज बनाएँ।

‎⁦‪ ‬⁩

24/08/2026

आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे BMC कामगारांच्या महत्त्वपूर्ण समस्या सोडवण्यासाठी, तसेच कामगारांच्या महत्त्वपूर्ण मागण्या संदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेणार होते.

कामगारांच्या प्रश्नांच्या संदर्भातील ही भेट कुठलेही कारण न देता, कामगारांच्या समस्यांवर पळ काढणाऱ्या मुंबई मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट नाकारली.

नेते बाळासाहेब आंबेडकर हे बीएमसीमधील सर्वात पहिली कामगार संघटना जिची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे त्या मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे अध्यक्ष आहेत.

भेट नाकारल्यामुळे कामगारांच्या समस्या एकजुटीने मांडणाऱ्या कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बीएमसी आयुक्तांच्या बेजबाबदारपणाचा निषेध करत मुंबई महानगरपालिका आयुक्तालयासमोर कामगारांनी, मुंबई म्युनिसिपल कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला.

#मुंबई

Address

Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंचित बहुजन आघाडी - लातूर शहर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share