28/08/2026
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमातून #जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्ष श्वेताली ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची भूमिका, #पाणी हक्कदारी, जलप्रशुल्क, जलगुणवत्ता, पाणी वापर संस्थांचा सहभाग तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून #जलव्यवस्थापन अधिक सक्षम करण्याबाबत प्राधिकरणाच्या अध्यक्ष श्रीमती ठाकरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
या विशेष मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार, १ सप्टेंबर रोजी तसेच दुसरा भाग मंगळवार ८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या #सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. याचबरोबर महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत पाहता येणार आहे.
#जयमहाराष्ट्र
MahaDGIPR