Latur City Municipal Corporation

Latur City Municipal Corporation Latur Municipal Corporation is dedicated to improving the quality of life for every citizen.

Our focus areas include cleanliness, sustainable development, water management, waste reduction, and making Latur a model smart city.

लातूर शहर महानगरपालिका मुख्यालय येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण...
07/09/2026

लातूर शहर महानगरपालिका मुख्यालय येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. 💐

त्यांच्या शौर्य, त्याग आणि देशभक्तीला मानाचा मुजरा! 🙏

#राजेउमाजीनाईक #जयंती #लातूरमहानगरपालिका #अभिवादन

ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या प्रत्येक गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📚✨शिक्षक हे केवळ ज्ञान देत नाहीत, तर...
05/09/2026

ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या प्रत्येक गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📚✨
शिक्षक हे केवळ ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देतात.

भारताचे माजी राष्ट्रपती व महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

#शिक्षकदिन #लातूर #शिक्षकदिन

लातूर शहराच्या विकासकामांचा आढावा बैठकविधान परिषदेचे आमदार मा. श्री. बसवराज पाटील मुरूमकर साहेब यांनी लातूर महानगरपालिके...
04/09/2026

लातूर शहराच्या विकासकामांचा आढावा बैठक

विधान परिषदेचे आमदार मा. श्री. बसवराज पाटील मुरूमकर साहेब यांनी लातूर महानगरपालिकेला सदिच्छा भेट देऊन शहरातील विविध विकासकामे व नागरी सुविधांचा आढावा घेतला.

यावेळी महानगरपालिका आयुक्त श्री. राहुल कुलकर्णी (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त श्री. देविदास जाधव, शहर जिल्हाध्यक्ष श्री. अजितजी पाटील कव्हेकर, गटनेते श्री. दीपकजी मठपठी, सर्व नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, उपायुक्त श्रीमती वसुधा फड, उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये लातूर शहरातील विविध नागरी समस्या, नागरिकांच्या अपेक्षा तसेच सुरू असलेल्या विकासकामांबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवरही यावेळी विचारविनिमय करण्यात आला.

लातूर शहराच्या विकासासाठी समन्वय, सकारात्मक चर्चा आणि प्रभावी अंमलबजावणीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल!

महानगरपालिका लातूरशहर विकासकामे

🦚 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🦚भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाच्या या मंगलमय पर्वानिमित्त सर्व लातूरकरां...
04/09/2026

🦚 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🦚

भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाच्या या मंगलमय पर्वानिमित्त सर्व लातूरकरांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद लाभो, हीच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना! 🙏✨

“कृष्णमय होऊ दे जीवन, प्रेम-शांतीने भरू दे मन!” 💙

#श्रीकृष्णजन्माष्टमी #जन्माष्टमी #लातूरमहानगरपालिका #लातूर Janmashtami LaturCityMunicipalCorporation

03/09/2026

झोन ‘B’ आढावा बैठक

मा. महापौर सौ. जयश्री सोनकांबळे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली झोन ‘B’ अंतर्गत विविध विकासकामे, नागरिकांच्या समस्या, स्वच्छता व्यवस्था व प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली.

बैठकीत नागरिकांना दर्जेदार व वेळेत सेवा मिळाव्यात, तसेच प्रलंबित कामांना गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

नागरिकांच्या सुविधा आणि शहराच्या विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न!

#झोनB #आढावाबैठक #महापौर #जयश्रीसोनकांबळे #विकासकामे नागरिकसेवा महानगरपालिका

🌳 झाडे आहेत म्हणूनच शहर श्वास घेते! 🌿झाड म्हणजे केवळ हिरवाई नाही, तर पक्षी, फुलपाखरे, मधमाशा आणि असंख्य जीवांचे घर आहे.आ...
02/09/2026

🌳 झाडे आहेत म्हणूनच शहर श्वास घेते! 🌿

झाड म्हणजे केवळ हिरवाई नाही, तर पक्षी, फुलपाखरे, मधमाशा आणि असंख्य जीवांचे घर आहे.
आपल्या शहरातील प्रत्येक झाड जपा, वाढवा आणि पुढच्या पिढीसाठी हिरवेगार भविष्य घडवा. 💚

“एक झाड वाचवा… अनेक जीवांचे जीवन वाचवा!” 🌱

EnvironmentalAwareness झाडेवाचवा हिरवाई पर्यावरण

🧹 लातूर शहर महानगरपालिकेअंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम! 🧹लातूर शहरातील स्वच्छता अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी विशेष स्वच्छता...
01/09/2026

🧹 लातूर शहर महानगरपालिकेअंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम! 🧹

लातूर शहरातील स्वच्छता अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता, कचरा संकलन व परिसर सुशोभीकरणावर विशेष भर देण्यात येत आहे.

या मोहिमेस मा. महापौर सौ. जयश्रीताई भालचंद्र सोनकांबळे मॅडम, उपायुक्त श्रीमती वसुधा फड मॅडम, सभागृह नेते श्री. विजयकुमार साबदे साहेब, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. कलीम शेख सर, स्वच्छता अधिकारी श्री. रमाकांत पिडगे सर, नगरसेवक श्री. मनोज थोरात, श्रीमती तब्बसुम आरिफ शेख, श्रीमती मदने, श्रीमती शेख, माजी नगरसेवक श्री. बसपुरे तसेच महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

🌿 स्वच्छ लातूर – सुंदर लातूर!
🤝 स्वच्छ शहरासाठी प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

🌱 आजचं रोपण, उद्याचं हिरवं लातूर! 🌳आज लावलेलं प्रत्येक झाड म्हणजे पुढच्या पिढीसाठी दिलेली हिरवी भेट.चला, वृक्षारोपणातून ...
01/09/2026

🌱 आजचं रोपण, उद्याचं हिरवं लातूर! 🌳

आज लावलेलं प्रत्येक झाड म्हणजे पुढच्या पिढीसाठी दिलेली हिरवी भेट.
चला, वृक्षारोपणातून लातूरला अधिक हरित, स्वच्छ आणि निरोगी बनवूया. 💚

एक झाड लावा… पर्यावरण वाचवा! 🌿

#आजचंरोपणउद्याचंहिरवंलातूर

31/08/2026

वॉर्ड क्रमांक १ | नांदगाव वेस

वॉर्ड क्रमांक १ मधील नांदगाव वेस येथील नाल्याची पाहणी मा. महापौर सौ. जयश्रीताई भालचंद्र सोनकांबळे मॅडम यांनी केली.

यावेळी स्थायी समिती सभापती श्री. सचिन बंडापल्ले साहेब, सभागृहनेते श्री. विजयकुमार साबदे साहेब, सिटी इंजिनियर श्रीमती उषा शिंदे मॅडम तसेच नगरसेवक श्रीमती चंद्रकला मदने, श्रीमती तब्बसूम आरिफ शेख, श्री. थोरात मनोज अरुण व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली.

#लातूर #लातूरमहानगरपालिका नांदगाववेस महापौर जयश्रीताईसोनकांबळे नागरिकसेवा विकासकामे स्वच्छलातूर नागरिकांच्यासमस्या

Address

Latur City Municipal Corporation, Latur MG Road , Main Road, Latur
Latur
413512

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Latur City Municipal Corporation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share