Mahesh Shobhabai Lahu Mhetre offical

Mahesh Shobhabai Lahu Mhetre offical General Secretary (GS) Maharashtra Pradesh Youth Congress

Mobile Number: 8275055525

06/06/2026

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अपमान करणाऱ्या उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विद्यापीठाचा पीएच.डी. संशोधक विद्यार्थी म्हणून आणि युवक काँग्रेसकडून तीव्र निषेध

महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने समाजासाठी काय भरीव संशोधन केले?" असा सवाल उपस्थित करून महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेचा आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भावनांचा अवमान केला आहे. मी युवक काँग्रेस काँग्रेसच्या आणि पीएचडी संशोधक विद्यार्थी म्हणून त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करते.

देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये गणना होणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे केवळ शैक्षणिक संस्था नसून महाराष्ट्राच्या वैचारिक, वैज्ञानिक आणि सामाजिक प्रगतीचे केंद्र राहिले आहे. या विद्यापीठाने हजारो संशोधक, वैज्ञानिक, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक आणि सामाजिक नेतृत्व घडवले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त संशोधन या विद्यापीठातून सातत्याने होत आहे.

विशेष बाब म्हणजे, राज्य सरकारच्या अखत्यारीतील विद्यापीठाबाबत अशी अवमानकारक भाषा वापरण्याचे धाडस राज्याच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी एका खाजगी विद्यापीठाच्या व्यासपीठावरून केले. हे सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला कमकुवत करून खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्याचे संकेत आहेत का, असा प्रश्न आता राज्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक विचारत आहेत.

आज राज्यातील विद्यापीठांना निधीची कमतरता, रिक्त शिक्षक पदे, संशोधनासाठी अपुरा आर्थिक पाठिंबा आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्या भेडसावत आहेत. या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी स्वतःच्या अखत्यारीतील विद्यापीठांची बदनामी करणे हे मंत्रीपदाच्या जबाबदारीला न शोभणारे आहे.

युवक काँग्रेसची मागणी आहे की, चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याबद्दल तात्काळ स्पष्टीकरण द्यावे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि माजी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी. सार्वजनिक शिक्षण संस्थांचा अपमान सहन केला जाणार नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गौरव हा महाराष्ट्राचा गौरव आहे.

कोकरोज जनता पार्टी आली म्हणून काही लोक उत्साहित आहेत...पण २०१४ पूर्वी अण्णा हजारे, केजरीवाल आणि त्यांच्या टीमच्या माध्यम...
21/05/2026

कोकरोज जनता पार्टी आली म्हणून काही लोक उत्साहित आहेत...
पण २०१४ पूर्वी अण्णा हजारे, केजरीवाल आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून जे वातावरण तयार करण्यात आलं होतं, त्याचीच आठवण आता पुन्हा होत आहे.
जेन झीच्या भावना, त्यांचा असंतोष आणि व्यवस्थेविरोधातील राग यांना दिशा देण्याऐवजी तो विभागण्याचा हा नवीन प्रयोग आहे. कारण आजच्या तरुणांची ताकद भाजपला चांगलीच दिसत आहे. त्यामुळे मागच्या दरवाजाने नवीन चेहरे, नवीन पक्ष, नवीन नैरेटिव्ह उभं करणं त्यांच्यासाठी अवघड नाही.
पैसा, सत्ता आणि मीडिया यांची ताकद वापरून जनतेचं लक्ष मूळ प्रश्नांपासून हटवणं हा जुना फॉर्म्युला आहे. पण जर लोक अजूनही अशा प्रयोगांना बळी पडत असतील, तर खऱ्या परिवर्तनाचा लढा आणखी कठीण होणार आहे.

प्रश्न पक्षाचा नाही…
प्रश्न आहे कोणाच्या फायद्यासाठी जनतेचा असंतोष वापरला जातोय?

17/05/2026

शेती हा आपला मूळ उद्योग आहे…
मातीशी नातं कधीच विसरायचं नसतं.
ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्तित्वाची ओळख आहे.
आज आम्ही उच्च शिक्षित आहोत, विविध क्षेत्रात काम करतो, राजकारण करतो, समाजकारण करतो… पण याचा अर्थ असा नाही की आम्ही शेतीपासून दूर गेलो आहोत.
उलट शिक्षण आणि आधुनिक विचारांच्या जोरावर शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रगत करण्याची ताकद आमच्यात आहे.
मातीत घाम गाळणारा शेतकरी कधीच कमी नसतो…
कारण जगाचा पोशिंदा असण्याचा अभिमान प्रत्येकाला मिळत नाही!

09/05/2026

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून आपल्याला काहीच होणार नाही, या माजातून आणि राजकीय संरक्षणाच्या आत्मविश्वासातून झालेला हा दहशतवादी गुंडांचा हल्ला आहे!

विकास लवांडे यांच्यावर झालेली ही फक्त शाईफेक नाही, तर लोकशाहीवर आणि विरोधी विचारांवर केलेला संघटित हल्ला आहे. बंदुका घेऊन फिरणारे तथाकथित “गोरक्षक” आणि संग्राम भंडारेसारखे गुंड प्रवृत्तीचे लोक अध्यात्माच्या नावाखाली महाराष्ट्रात दहशत निर्माण करत आहेत. हेच का त्यांचे अध्यात्म?

तुषार भोसलेसह या घटनेमागे जे जे कुणी असतील, त्यांना तात्काळ अटक करून UAPA अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्रात कायदा आहे की गुंडांची सत्ता, हा प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर आणि संतांच्या विचारांचा आहे. येथे विचार मांडणाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या गुंडांना आणि द्वेष पसरवणाऱ्यांना कधीही माफी मिळणार नाही.

#महाराष्ट्र #लोकशाही #विकासलवांडे #पुरोगामीमहाराष्ट्र

📍युवक काँग्रेस | टिळक भवन, दादर | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची कार्यकारिणी बैठक प्रदेशाध्यक्ष श्री. शिवराज दादा मोर...
04/05/2026

📍युवक काँग्रेस | टिळक भवन, दादर |

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची कार्यकारिणी बैठक प्रदेशाध्यक्ष श्री. शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली व भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव, महाराष्ट्र प्रभारी श्री अजय जी छिकारा व भारतीय युवक काँग्रेस सहसचिव, महाराष्ट्र सहप्रभारी शाम्भवी शुक्ला जी यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन, मुंबई येथे उत्साहात पार पडली. धाराशिव जिल्हा प्रभारी या नात्याने जिल्ह्यातील आढावा धाराशिव जिल्हाध्यक्ष गणेश पवार यांच्या समवेत कमिटी समोर मांडला, त्या त्यासोबतच येणाऱ्या काळात धाराशिव जिल्ह्यातील युवक काँग्रेस नवीन नियुक्ती करण्याचे नियोजन कमिटी समोर मांडले.
याप्रसंगी महाराष्ट्र भरातून आलेले सर्व नवनियुक्त प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष व तसेच युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Mahesh Shobhabai Lahurao Mhetre
Shivraj More Fc

धन्यवाद!
25/04/2026

धन्यवाद!

विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबलीच पाहिजे! ✊सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी न...
23/04/2026

विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबलीच पाहिजे! ✊

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया तर्फे दि. 22 एप्रिल पासून बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू आहे.

👉 उपोषणकर्ते:
सिद्धांत जांभुळकर (उपाध्यक्ष, पुणे जिल्हा)
विकास अवचार (महासचिव, पुणे जिल्हा)
राहुल गुरधे (सचिव, पुणे जिल्हा)

📢 मुख्य मागण्या:
✔️ प्रवेश परीक्षा शुल्क ₹600 वरून ₹1000 पर्यंत वाढवण्यात आलेली फी तात्काळ मागे घ्या
✔️ प्रवेश परीक्षा शुल्क ₹300 करा
✔️ एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सेस ऐच्छिक करा
✔️ “कमवा व शिका” योजनेचे मानधन ₹80 करा

एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सच्या नावाखाली दरवर्षी ₹1510 आकारणी, पण क्रेडिट्स गुणपत्रिकेत नाहीत — हा सरळ अन्याय!

⚠️ दिवसभर विद्यार्थी उपोषणावर बसलेले असताना देखी विद्यापीठ bप्रशासनातील एकही अधिकारी संवाद साधायला किंवा भेटायला आलेला नाही. यावरून प्रशासनाची विद्यार्थ्यांप्रती असलेली उदासीन व असंवेदनशील भूमिका स्पष्ट होते.

✊ जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील!

Maharashtra Pradesh Youth Congress

Address

Latur
413522

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahesh Shobhabai Lahu Mhetre offical posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category