Girish Bankar

Girish Bankar जनसेवक 24/7🙏
जिल्हा परिषद तरडगाव गट💫
शिवसेना - धनुष्यबाण 🏹⛳

काल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरटीचामळा पाडेगाव या ठिकाणी कुमारी श्रद्धा युवराज अडसूळ या चौथी इयत्तेमध्ये प्रथम क्रमांक...
16/08/2026

काल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरटीचामळा पाडेगाव या ठिकाणी कुमारी श्रद्धा युवराज अडसूळ या चौथी इयत्तेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून पास झालेल्या विद्यार्थिनीच्या व तिच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेंच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये शिक्षणाविषयीची रुची आणि स्पर्धा निर्माण व्हावी या दूरदृष्टीकोनातून यावर्षीपासून आपण तरडगाव जिल्हा परिषद गटातील सर्व शाळांमध्ये गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याच्या सूचना शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीच्या माध्यमातून सर्व मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. ज्याचं बहुतांशी शाळांमध्ये काटेकोर पालन झालेलं दिसलं परंतु ज्या शाळांमध्ये झालं नाही त्याची माहिती घेऊन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

ज्या शाळेत मी घडलो वाढलो त्या शाळेत म्हणजेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरटीचामळा येथे आज ध्वजारोहणासाठी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहत असताना मन भरून आले होते. देशाविषयी असणार प्रेम आणि समाजाच्या सर्वांगीण सार्वभौम विकासासाठी असलेली कटिबद्धता यावेळी माझ्या कडून व्यक्त केली . विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहाराबरोबरच त्यांच्या आरोग्यावरती इथून पुढे जिल्हा परिषद सदस्य व शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीचा अध्यक्ष या नात्याने माझं विशेष लक्ष असणार आहे.

विद्यार्थी व पालकांमध्ये त्याचबरोबर शिक्षकांमध्ये व पालकांमध्ये योग्य समन्वय साधून आपल्या जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी फक्त शासनाच्या स्पर्धा परीक्षा मध्येच नव्हे तर सर्व खाजगी स्पर्धा परीक्षांमध्ये देखील नेत्रदीपक यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून इथून पुढे माझ्याकडून उचित कृतिशील प्रयत्न होणार आहेत.

आजच्या ध्वजारोहण कार्यक्रमांमध्ये मी पालकांना बिस्कीट चॉकलेट एक वेळ कमी दिले तरी चालतील परंतु पौष्टिक आहाराला अनुकूल असणारे पदार्थ जसे की राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाणा चिक्की, गुळाच्या छोट्या वड्या, खारीक अशा गोष्टी विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून देण्याचा आवाहन केलं व याची सुरुवात मी माझ्यापासून केली.

विद्यार्थ्यांचा कला, क्रीडा, योगा व शैक्षणिक विकास होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी विद्यार्थी,शिक्षक व पालकांना देण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीच्या माध्यमातून आपण मागच्या महिन्यात सर्व मुख्याध्यापकांना सुचित केलं होतं की प्रत्ये

कर्तव्य रणरागिणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 💐🙏🏻💐
13/08/2026

कर्तव्य रणरागिणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 💐🙏🏻💐

मा आमदार श्री दीपक रावजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज बार्टी या संस्थेच्या समता दिंडीला मौजे तरडगाव येथे...
16/07/2026

मा आमदार श्री दीपक रावजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज बार्टी या संस्थेच्या समता दिंडीला मौजे तरडगाव येथे भेट देऊन संविधान व बाबासाहेबांच्या विचारांप्रती प्रचार आणि प्रसार करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी बार्टीचे आमचे मित्र राहुलजी गंगावणे सर व त्यांचे सहकारी तसेच आमचे तरडगाव पंचायत समिती गणाचे नेते दीपकराव गायकवाड, उद्योजक दीपक सुतार, युवा नेते किरण शिंदे, विद्रोही विचार प्रसारक अमोल राव गायकवाड, श्रेयश शिंदे व मान्यवर उपस्थित होते.

समता दिंडी
बार्टी

वारी समतेची वारी मानवतेची,भेटाया वारकऱ्यांना ओढ विठू माऊलीची राजधानी सातारा जिल्ह्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली प...
15/07/2026

वारी समतेची वारी मानवतेची,भेटाया वारकऱ्यांना ओढ विठू माऊलीची

राजधानी सातारा जिल्ह्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी शिवसेना राजेगट सज्ज

राम कृष्ण हरि🚩🚩🚩

वारी समतेची वारी मानवतेची,भेटाया वारकऱ्यांना ओढ विठू माऊलीची राजधानी सातारा जिल्ह्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली प...
15/07/2026

वारी समतेची वारी मानवतेची,भेटाया वारकऱ्यांना ओढ विठू माऊलीची

राजधानी सातारा जिल्ह्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी शिवसेना राजेगट सज्ज

फक्त पाडेगावच्याचं नव्हे तर संपूर्ण फलटण तालुका,सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानास्पद बाब म्हणजे आपल्या पा...
13/07/2026

फक्त पाडेगावच्याचं नव्हे तर संपूर्ण फलटण तालुका,सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानास्पद बाब म्हणजे आपल्या पाडेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या #चि_विवेक_विठ्ठल_तेली या अतिशय सर्वसाधारण कुटुंबातून पुढे आलेल्या युवकाची #भारताच्या_आंतरराष्ट्रीय_अंडर_19_कार्फबॉल_संघामध्ये निवड झालेली आहे. विशेष बाब म्हणजे त्याच्या खेळाची गुणवत्ता पाहता कदाचित त्याला या #भारतीय_संघाचे_नेतृत्व करण्याची संधीही मिळण्याची दाट शक्यता आहे.
पाडेगाव सारख्या ग्रामीण भागातून भारतीय संघात निवड होणे ही आमच्यासाठी अतिशय गौरवास्पद बाब आहे म्हणूनच #काल_विवेकचा_सत्कार_व_सन्मान_संपूर्ण_पाडेगाव_ग्रामस्थांच्या_वतीने_माजी_आमदार_श्री_दीपकरावजी_चव्हाण #साहेब,जिल्हाधिकारी_श्री_संतोष_पाटील_साहेब_त्याचबरोबर जिल्हा_पोलीस_प्रमुख_श्री_निखिल_पिंगळे_साहेब, प्रांताधिकारी_प्रियांका_आंबेकर_मॅडम, तहसीलदार_श्रीअभिजीत_जाधव_साहेब_डीवायएसपीफलटण_श्री_गोडसे_साहेब_यांच्या_शुभहस्ते ग्रामपंचायत_कार्यालय_पाडेगाव_येथे_संपन्न_झाला.
घरची परिस्थिती अतिशय खडतर आणि बेताची असूनही विवेकने मिळवलेले हें यश अतिशय दैदीप्यमान आहे म्हणूनच त्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी आम्ही त्याच्या कायम पाठीशी असनार आहोत असे आश्वासन मान्यवरांच्या मार्फत विवेक ला यावेळी देण्यात आले. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा परिषदेचे मा.समाज कल्याण सभापती श्री.अशोकअण्णा खरात, तरडगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य, श्री.गिरीश बनकर,पंचायत समिती पाडेगांव गणाचे सदस्य, श्री.राहुल नरुटे, पाडेगावचे सरपंच श्री.राहुल कोकरे, सर्कल श्री.धायगुडे आण्णा श्री.बाबासाहेब खरात सर,श्री.सुभाष काका गायकवाड, श्री.नितीनभैय्या जगताप,श्री.बिपीनदादा मोहिते,ग्रा.पं.सदस्य श्री.हेमंत सुतार, सोमनाथ खरात, प्रविण ढावरे,अनिकेत जगताप,पोलीस पाटील सुरज खरात,श्री.मुकुंदराव येळे,श्री.किरणजी शिंदे,श्री.चंद्रकांत गोरे, श्री सनी रायकर, श्री प्रभाकर नेवसे,श्री रामकाका गारुळे,श्री सागर नाळे, श्री सागर भोसले, श्री महेश ढावरे, श्री आनंद ढावरे,श्री सागर खरात, श्री विशाल खरात,चि.अवधूत खरात,चि.सुरज वाघमोडे,चि शुभम अडसूळ चि सौरभ खरात व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आणि विशेष म्हणजे ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी ...
01/05/2026

आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आणि विशेष म्हणजे ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी झोकून देताना प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात कायम विद्रोह करून कामगार बंधु भगिनींना न्याय मिळवून दिला त्या आमच्या पिताश्रींचा अर्थात आण्णांचा आज कामगार दिनी वाढदिवस,आज आण्णांच 75 व्या वर्षांत म्हणजेच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. त्यांच्या या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आण्णांना उदंड निरोगी आयुष्य लाभो एवढीच निर्मिका चरणीं प्रार्थना 💐💐💐

न्यायासाठी व्यवस्थेच्या विरोधात कायमच शड्डू ठोकून उभा राहण्याचा विचार संस्कार आण्णांनी आम्हांला दिलाय जो आम्ही जपू आणि समाजाप्रती कायमच कृतज्ञता ठेवून वाढवू याचं आजच्या दिनी आण्णांना सदिच्छा आणि शुभेच्छा आण्णा शतायुषी व्हा, औक्षवंत व्हा 💐🎂❤️

फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर यांच्यावतीने काल पुण्याचे उपमहापौर सन्माननीय श्री परशुरामजी वाडेकर यांच्या शुभह...
29/04/2026

फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर यांच्यावतीने काल पुण्याचे उपमहापौर सन्माननीय श्री परशुरामजी वाडेकर यांच्या शुभहस्ते माझा जिल्हा परिषद सातारा नवनिर्वाचित सदस्य म्हणून संविधान आणि पंचशील देऊन सन्मान करण्यात आला यावेळी प्रसिद्ध वक्ते राहुलजी गिरी, श्री कश्यप दादा साळुंखे, सन्माननीय रोहिदासजी जाधव, मा. योगेश कांबळे, डॉक्टर इमरान खान मार्गदर्शक श्री खराते सर, अमोलजी गायकवाड, पत्रकार सुशील जी गायकवाड यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला मी फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर यांनी केलेल्या सन्मानाबद्दल शतशः ऋणी राहील आणि फुले शाहू आंबेडकर ही पुरोगामी विचारधारा पुढे नेण्यासाठी कायम कटिबद्ध राहील.

जय हिंद
जय भीम 🇮🇳

यावर्षीचा जयंती महोत्सव खूप महत्वपूर्ण वर्ष म्हणुन ओळखला जाणार आहे याचं कारण पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांचे त्रीशताब...
10/04/2026

यावर्षीचा जयंती महोत्सव खूप महत्वपूर्ण वर्ष म्हणुन ओळखला जाणार आहे याचं कारण पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांचे त्रीशताब्दी जयंती वर्ष समारोप तर क्रांतिसूर्य महात्मा फूले यांचं द्विशताब्दी जयंती वर्ष सुरु होतं आहे त्यामुळे या वर्षीच्या जयंती महोत्सवाची थीम हीं अहिल्या-ज्योती जन्मोत्सव हीं पाडेगाव सामाजिक विकास फाऊंडेशनच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे तेंव्हा दरवर्षी प्रमाणे याहीं वर्षी विचारांची मेजवानी घ्यायला अवघे अवघे या आणि महापुरुषांच्या, महामातांच्या विचार आदर्षाचा वसा वारसा पुढे नेण्यासाठी कटीबद्ध व्हा ✌🏻✌🏻✌🏻

समतेची व सामाजिक ऐक्याची कास धरून जात पात धर्म भेदाची जळमटे झटकून टाकूया चला समाज घडवूया.......

हातात तलवार घेऊन छातीची ढाल करून आपल्या अतुलनीय शौर्य आणि पराक्रमाने स्वराज्य उभा करणारे आमचे राजें सह्याद्रीच्या कुशीती...
19/02/2026

हातात तलवार घेऊन छातीची ढाल करून आपल्या अतुलनीय शौर्य आणि पराक्रमाने स्वराज्य उभा करणारे आमचे राजें सह्याद्रीच्या कुशीतील गडकिल्ल्यावर आणि आमच्या हृदय सिंहासनावर शोभून दिसतात ना कीं चमत्काररुपी मंदिरात...

हें रयतेचं हिंदवी स्वराज्य लाखों हजारो मावळ्यांच्या त्याग आणि बलिदानातून आणि छत्रपती शिवरायांच्या अतुलनीय शौर्य व पराक्रमातून उभं राहिलं आहे. या देशाच्या कानकोपऱ्यातील मातीत रक्त सांडलंय माझ्या राजाचं आणि त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या मावळ्यांचं त्यामुळे आपल्या राजाला मंदिरात बसवून धूप आरत्या करून त्यांच्या पराक्रमाला चमत्कारात रूपांतरित करु नका याचं खऱ्या अर्थाने शिवजयंतीच्या शाश्वत चिरंतन शुभेच्छा राहतील.

जय जिजाऊ 🚩
जय शिवराय 🚩

श्री गिरीश सुदाम बनकर
सदस्य, जिल्हा परिषद सातारा

Address

Lonand
415521

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Girish Bankar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share