30/11/2022
*सोलंकरवाडी माढा* पानी फाऊंडेशन फार्मर कप मधे सहभागी जय हणुमान कृषी विकास गट सोलंकरवाडी या मका गटाचे मका सँम्पल पाठविण्यात आले तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत शाश्वत कृषी आराखडा योजने अंतर्गत गांडूळ खत युनिट,कांदा चाळ, कामाचा शुभारंभ गणेश शंकर माळी या शेतकऱ्याच्या शेतात करण्यात आला यावेळी *मा.रविंद्र कांबळे साहेब उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डुवाडी, मा.कवठे साहेब मंडल कृषी अधिकारी मोडनिंब, मा.पवार साहेब पर्यवेक्षक कृषी मोडनिंब,श्री.संतोष सुर्वे कृषि साह्यक, ग्रामसेवक दत्तात्रय टोणपे,श्री.शिंदे आत्मा कृषी चे मा. आनंद झिने साहेब, मोहोळ केव्हीके चे वैरागकर साहेब,मा.सत्यवान देशमुख पानी फाऊंडेशन* यांच्या उपस्थितीमधे TUV NORD PUNE या ठीकाणी विषमुक्त तपासणी साठी पाठवण्यात आले. सोलंकरवाडी गटाने भविष्यातील गुंतवणूक आजच केली असून विषमुक्त अन्न निर्माण करण्यासाठी बांधिलकी जोपासण्यासाठी पहीले पाऊल टाकुन,फार्मर कप स्पर्धेत विषमुक्त चाचणीसाठी असलेल्या20 गुणापैकी 10 गुण मिळवले असुन बाकीचे10 गुण सँम्पल विषमुक्त आले तर गटाला मिळणार आहेत
राजाभाऊ भांगीरे या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्न व मागण्या मांडल्या भविष्यात शेती चा विकास होणे साठी शेतकरी सहल ,गावात सर्व शेतकऱ्यांना शेततळे,कृषि निविष्ठा,कृषि च्या माध्यमातून विविध योजना शेतकऱ्यास मिळाव्यात यासाठी शेतकरी समृध्द करण्या बाबत चे उपाय योजना करण्याच्या मागण्या मांडल्या यावेळी सरपंच अनंता गलांडे,उपसरपंच माणिक शेंडगे,दिगंबर खरात,बाबसाहेब पांढरे,विठ्ठल झाडकर,विशाल राजगे,भिमराव मोरे,जय हनुमान कृषी विकास गटाचे अध्यक्ष गणेश माळी,संतोष गलांडे,संजय मोरे,अण्णासाहेब भांगीरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वामन यादव,बळीराम भांगीरे, सुरेश पांढरे,ग्रामीण विकास संस्थेचे सचिव गोपाळ माळी,मच्छिंद्र राजगे,संदिप गलांडे,सोमनाथ शेंडगे यांचे सह परिसरातील शेतकरी व जय हनुमान कृषी विकास गटाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते