प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू फौंडेशन

  • Home
  • India
  • Mahabaleshwar
  • प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू फौंडेशन

प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू फौंडेशन Emergency search and rescue & Recovery

03/06/2026
11/07/2025

आनंद वार्ता🇮🇳🇮🇳🚩🚩

महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तामिळनाडू मधील १ किल्ला असे एकूण १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. यापुढे हे समाविष्ट झालेले किल्ले साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी हे आता जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाणार आहेत. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या कामात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघानेही खारीचा वाटा उचलला आहे. या बाराही किल्ल्यांचे To The Scale Models महासंघाच्या गिर्यारोहक स्वयंसेवकांनी अत्यंत विक्रमी वेळेत पूर्ण करून दिल्ली येथे पार पडलेल्या युनेस्कोच्या प्रतिनिधींनी भेट दिलेल्या प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र बनले होते.

सर्व भारतीयांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.

जय भवानी जय शिवाजी.🇮🇳🇮🇳🚩🚩

उमेश झिरपे
अध्यक्ष

ऋषिकेश यादव
कार्यकारी अध्यक्ष
*अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ*

02/09/2024

दिनांक १ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ५.३० च्या दरम्यान देगांव सातारा येथे मंगेश गोविंद साळुंखे हा युवक तलावामध्ये पोहण्यासाठी गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला, आज दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी सातारा ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर साहेब यांचा महाबळेश्वर ट्रेकर्स चे संस्थापक सुनील बाबा भाटिया यांना कॉल आला की तुम्ही देगांव ला शोधमोहिमेसाठी या लगेच च सुनील बाबा यांनी टीम च्या ग्रुप वर मेसेज केला व सर्व सदस्य सकाळी ११.३० वाजता शोध मोहिमेसाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन सातारा देगांव च्या दिशेने रवाना झाले १.१५ वाजता महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली तलावा मध्ये राफ्ट ला obm इंजिन लावून सोबत anchor, water camera अशी equipment वापरून शोध मोहिमेला सुरवात झाली लगेचच अर्ध्या तासातच मृतदेह शोधण्यात महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम ला यश आले या शोधमोहिमेत महाबळेश्वर ट्रेकर्स चे सुनील बाबा भाटिया, सूर्यकांत शिंदे, दीपक ओंबळे व प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम चे अनिकेत वागदरे सहभागी होते.

🚩 सन्मान कर्तृत्वाचा ... 🚩       समाजाशी  अनोखे बंधन जोपासणाऱ्या व्यक्तीचा आणि संस्थांचा..ऐतिहासिक राजधानी सातारा जिल्ह्...
31/08/2024

🚩 सन्मान कर्तृत्वाचा ... 🚩
समाजाशी अनोखे बंधन जोपासणाऱ्या व्यक्तीचा आणि संस्थांचा..
ऐतिहासिक राजधानी सातारा जिल्ह्यात सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या समाजामधील शिलेदरांचा पालकमंत्री श्री शंभूराज शिवाजीराव देसाई तसेच कलेक्टर जितेंद्र डुडी आणि समीर शेख साहेब पोलीस अधीक्षक सातारा(SP) तसेच सातारा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री देवीदास ताम्हाणे साहेब तसेच अनके मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान प्रदान करण्यात आला. सातारा जिल्हा येथे वारंवार होणाऱ्या रेस्क्यू आणि रिकव्हरी तसेच अन्य ठिकणी आपत्कालीन परिस्थितीमधेय प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता स्व:खर्चाने प्रशासनाला मदत करण्याकरिता खांद्याला खांदा लावून झटणाऱ्या ऊन, वारा ,पाऊस याची तमा न बाळगता आपत्कालीन परीस्थिती हाताळत जिल्ह्यातील शिरवळ सह परिसरातील नीरा कृष्णा, वेणा, कोयना माईच्या कुशीत गेलेल्या व्यक्तींचे तसेच दरी खोऱ्यातून मृत देह अहोरात्र शोधत झटणाऱ्या प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्स टीमच्या शिलेदारांचा सन्मान करण्यात आला 🙏🙏

Address

Pratapgad Road
Mahabaleshwar
412806

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू फौंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share