28/09/2024
* #सिनेट #निवडणूकीचा #निकाल #सांगतो #शिवसेना #ही #ठाकरेंचीच!!*
सिनेटचा निकाल आज लागला आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेनी एकतर्फी विजय मिळवत भाजपचा दारूण पराभव मुंबईत केला. स्वताला बाळासाहेबांचे वारसदार सांगणारे राज ठाकरे आणि शिंदे गटाने भाजप साठी निवडणूकीच्या मैदानातून आधीच माघार घेतली होती. सिनेट सारख्या निवडणूका या सोप्या नसतात यात त्या त्या पक्षाची संघटनेची पाळमूळ किती खोल रूजली आहेत. संघटनेच्या कार्यकर्त्यांच कौशल्य पणाला लागत. शिवसेनेत भविष्य असलेल्या आदित्य ठाकरेंनी गेली अनेक वर्ष सिनेट वर आपल एकतर्फी वर्चस्व कायम ठेवल आहे अगदी त्यांचे आजोबांनी मुंबईवर ठेवलेल तसच. शिवसेनेतून राज, राणे आणि आता शिंदे सह अनेक आमदार खासदार सोडून गेले पण मुंबईवर मातोश्रीतील ठाकरेंच वर्चस्व अबाधित आहे हेच या निकालाने दाखवून दिल.!! येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना याचा नक्कीच फायदा होईल अस राजकीय विश्लेषक सांगतात.