03/08/2026
वृत्त क्रमांक १३९ दिनांक ०३ ऑगस्ट, २०२६.
सामान्य प्रशासन विभाग
*मालेगाव शहर महानगरपालिकेत क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन संपन्न.
मनपा वृत्त सेवा:- आज दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी मौलाना अबुल कलाम आझाद भवन मालेगाव मुख्य मालेगाव महानगरपालिकेचे मुख्यालय येथे माननीय आयुक्त रवींद्र जाधव यांचे मुख्य उपस्थितीत सकाळी 11 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील यांचे प्रतिमेस आयुक्त महोदय आणि उपायुक्त सुनीता कुमावत यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांनी देखील माननीय क्रांतिसिंह नाना पाटील यांचे प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली याप्रसंगी उपायुक्त डॉ सुनीता कुमावत, नगर रचनाकार गणेश माळी, सहाय्यक आयुक्त बाळू धोंडगे, शेख मोहम्मद तौसिफ दिनेश मोरे, मुख्य अग्निशमन अधिकारी डॉक्टर संजय पवार संगणक विभाग प्रमुख सचिन महाले, लेखापरीक्षक गणेश हळदे, लेखाधिकारी हरीश डिंबर, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, अधिक्षक संतोष अहिरे, भरत सावकार, मोहम्मद इरफान, जनगणना विभाग प्रमुख सचिन भामरे, प्रमुख स्वच्छता निरीक्षक आनंद सिंग पाटील, आस्थापना पर्यवेक्षक निलेश जाधव, स्वच्छता निरीक्षक उमेश सोनवणे, वरिष्ठ लिपिक मनीष ढिलोर अनिल सांगळे, लिपिक भूषण गुरव, अविनाश वाघ,अनिता ढिलोर, निकिता देशमुख, मनिषा पाडवी, उदय अहिरे कर्मचारी उषा खैरनार, अनिल काळे छायाचित्रकार गौरव पवार इत्यादी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.