BJP 4 Malegaon

BJP 4 Malegaon Website : maharashtra.bjp.org
Twitter : twitter.com/bjp4maharashtra
Youtube : https://www.youtube.com/channel/UCpXLIiYqqdgf-ith_gQ7SUQ

Official page of Bharatiya Janata Party – Malegaon Sanghatan District. Working towards public service, development, and organizational unity under the vision of Nation First, Party Next, Self Last.

07/08/2026

राष्ट्रीय हँडलूम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

7 ऑगस्ट 1905 रोजी सुरू झालेल्या स्वदेशी आंदोलनाची आठवण करून देणारा हा दिवस.

देशातील लाखो विणकर कुटुंबे आजही स्वदेशी परंपरा जपत आहेत. त्यांच्या कष्टाचे, कौशल्याचे आणि सामर्थ्याचे मोल जगाला समजू द्या , असे आवाहन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाला केले.

आत्मनिर्भर भारत घडवायचा असेल, तर आपल्या विणकरांना प्रोत्साहन द्या, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करा आणि हँडलूमला प्राधान्य द्या.

या हँडलूम डेच्या निमित्ताने हँडलूम वस्तू खरेदी करा, त्याचा व्हिडिओ पोस्ट करा आणि आपल्या विणकर बांधवांना पाठिंबा द्या.

२०१४ नंतर काश्मीर बदलला आहे… आणि त्यामुळेच या बदलाबरोबरच इतिहास जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.नवीन पिढीने फक्त हेडल...
06/08/2026

२०१४ नंतर काश्मीर बदलला आहे… आणि त्यामुळेच या बदलाबरोबरच इतिहास जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

नवीन पिढीने फक्त हेडलाईन्स नाही, तर इतिहास, संविधान, विकास आणि सामाजिक बदल यांची माहितीही समजून घेतली पाहिजे. माहितीपूर्ण चर्चा हीच मजबूत लोकशाहीची ओळख आहे.

05/08/2026

एक देश, एक संविधान... आणि जम्मू-काश्मीरच्या सर्वांगीण विकासाचे नवे पर्व!

ज्या कलम ३७० ला हटवणे अशक्य मानले जात होते, ते मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दृढ नेतृत्वामुळे शक्य झाले. आज याच निर्णयामुळे जम्मू-काश्मीर देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन शांतता, पर्यटन आणि प्रगतीच्या नव्या शिखरावर पोहोचत आहे.

05/08/2026

कलम ३७० हटवून 'एक देश, एक संविधान' हे ध्येय पूर्ण करण्यापासून ते भारताला डिजिटल महासत्तेच्या शिखरावर नेण्यापर्यंत... भारतीय जनता पक्षाच्या कार्यसंस्कृतीतून साकारलेल्या नव्या भारताचा हा प्रवास.

04/08/2026

शिक्षण विश्वातील एक दूरदर्शी आधारवड हरपला

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन ही अत्यंत दु:खद घटना आहे. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे.

शिक्षण हीच समाज परिवर्तनाची खरी गुरुकिल्ली आहे, या भावनेतून त्यांनी महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत दर्जेदार शैक्षणिक संस्थांची उभारणी केली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शिक्षणाची ज्ञानगंगा लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. शिक्षण क्षेत्रात त्यांनी उभारलेला हा वारसा आगामी अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि लाखो विद्यार्थ्यांच्या दुःखात भाजपा महाराष्ट्र परिवार सामील आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

भावपूर्ण श्रद्धांजली
ॐ शांती

04/08/2026

गाडीचे मायलेज फक्त इंधनावर ठरत नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
मायलेजवर अनेक गोष्टींचा परिणाम होतो: गाडी चालवण्याची पद्धत, ट्रॅफिकमधील वेळ, टायरमधील हवेचा योग्य दाब, AC चा वापर, इंजिनचे मेंटेनन्स, वाहनाची स्थिती आणि ड्रायव्हिंग कंडिशन्स.
म्हणूनच मायलेजमध्ये बदल दिसला तर त्यासाठी केवळ E20 ला जबाबदार धरणे योग्य नाही. कोणत्याही निष्कर्षापूर्वी सर्व घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. तांत्रिक माहिती, प्रत्यक्ष अनुभव आणि फॅक्ट्सवर विश्वास ठेवा, अफवांवर नाही..

03/08/2026

ARAI ने E20 ला विरोध केला नाही; उलट उच्च इथेनॉल मिश्रणासाठी आवश्यक तांत्रिक बाबी, वाहन सुसंगतता, इंजिन कार्यक्षमता आणि इतर महत्त्वाच्या कसोट्यांचा अभ्यास करून एक तांत्रिक रोडमॅप मांडला आहे
या प्रक्रियेचा उद्देश E20 सुरक्षित आणि टप्प्याटप्प्याने लागू करण्यासाठी आवश्यक तयारी करणे हा होता.
म्हणूनच ARAI रिपोर्टचा संदर्भ पूर्णपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. अपूर्ण माहिती किंवा चुकीच्या अर्थावर आधारित निष्कर्ष काढू नका.
अफवांना बळी पडू नका. फॅक्ट्स, तांत्रिक अहवाल आणि तज्ज्ञांच्या अभ्यासावर विश्वास ठेवा.
फॅक्ट्सवर विश्वास ठेवा, अफवांवर नाही

03/08/2026

E20 बद्दल अफवा का पसरवल्या जात आहेत?

कारण E20 हा फक्त इंधनाचा विषय नाही; तो भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेशी, विदेशी मुद्रा बचतीशी आणि क्रूड ऑइल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याशी जोडलेला आहे.

भारताने इथेनॉल मिश्रण वाढवले, तर कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होऊ शकते. अशा बदलांचा परिणाम ऊर्जा बाजारातील विविध आर्थिक हितसंबंधांवर होऊ शकतो.

म्हणूनच E20 संदर्भात अनेक दिशाभूल करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरताना दिसतात.

त्यामुळे फॅक्ट्स तपासा, विज्ञानावर विश्वास ठेवा आणि अफवांपासून सावध राहा.

Address

Malegaon
423203

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP 4 Malegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share