Talashil Tondavali Beach

Talashil Tondavali Beach Talashil Beach (Divine Island)

पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे कोकण आहे. जगापुढे न आलेले सौंदर्य आहे. खरे पाहता पर्यटनासाठी कोकण अगदी बाराही महिने आपल्या स्वागतासाठी तत्पर आहे. आता सुरु असलेला उन्हाळा हा महिना आपणास कोकणातला रानमेवा देतो. आंबे, काजू, फणस, करवंदे, जांभळे, जाम हि ताजी फळे आपणास एप्रिल आणि मे महिन्यातच मिळणार. त्याशिवाय चमचमीत मासे आणि मालवणी वडे-सागुती आहेच....


तळाशील-तोंडवळी - मालवण मधील सुप्रसिद्ध ठिकाण

देवबाग कर

्ली नदीइतकाच सुंदर किनारा आहे तळाशील गड नदीचा. गड नदी समुद्राला भेटायला येते ती तोंडवलीपासून. तळाशीलपर्यंत समुद्राला समांतर वाहते. मालवण, हडी, तोंडवली, तळाशील असा गाडीरस्ता उपलब्ध आहे. नदीच्या एका बाजूला तोंडवली, तळाशील, तर दुसऱ्या बाजूला ओझर, रेवंडी, कोळंब आहे. ओझरची ब्रह्मानंद स्वामींची असणारी गुहा व पाण्याचा झरा बघण्यासारखा आहे. ओझरजवळ आहे रेवंडी. मालवणचा सुपुत्र "वस्त्रहरण'कार मच्छिंद्र कांबळींचं गाव. गावात भद्रकालीचं मंदिर आहे. रेवंडीतल्या तरीवरून तळाशीलला बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तळाशीलची मच्छिमारांची वस्ती संपली, की बांद्याच्या पुढे ओसाड बेट आहे. त्यावरून गड नदीच्या मुखाचं सुंदर दर्शन होतं. रेवंडीतूनसुद्धा गड नदी समुद्राला मिळते ती जागा बघण्यासारखी आहे. तोंडवळीचा सुरूचा किनारा, तळाशीलचा माडांच्या चिंचोळ्या पट्टीचा किनारा खास बघण्यासारखा.

एकेबाजुला नदी आणि एकेबाजुला अरबी समुद्र . आणि या दोघांचा संगम असा आमचा गाव
एक छोटास आणि सुंदर अस निसर्गरम्य बेट. निसर्गरम्य सागर किनारा सूर्योदय आणि सूर्यास्त दर्शन.

आमच्या गावातील प्रेक्षणीय स्थळ श्री देव गोपालकृष्ण मंदिर
समुद्राच्या लाटांच्या सहवासात झुळूझुळू वाहणारी हवा, डॉल्फिन चे साक्षात दर्शन, समुद्र सफारी,स्कूबा डायविंग,
आणि राहण्याची तसेच मालवणी जेवणाची मेजवानी खाडीच्या दुतर्फा असलेली नारळाची झाडे. किनाऱ्यावरील मच्छीमाऱ्याची घरे, तरंगनाऱ्या होड्याहे सर्व अवर्णीय. तेथेच जावून अनुभवण्याचे. चला मग हे सर्व पाहण्यासाठी ''तळाशील तोंडवळी '' या दिव्य बेटावर....

1 बोट दिवसातून 18 ब्रास वाळु उत्खनन करते.1 ट्रिप ला 6 ब्रास. 20,000 ला 2 डम्पर. 1 = 18 ब्रास 10 = ?10 बोटी दिवसाला 180 ब...
07/04/2026

1 बोट दिवसातून 18 ब्रास वाळु उत्खनन करते.
1 ट्रिप ला 6 ब्रास. 20,000 ला 2 डम्पर.

1 = 18 ब्रास
10 = ?

10 बोटी दिवसाला 180 ब्रास वाळु काढतात.
3 ब्रास वाळु म्हणजे 1 डम्पर हा 10,000/- जातो तर 180 ब्रास वाळु चे किती रूपये?

3 ब्रास = 10,000/-
180 ब्रास = ?

600,000/- रूपयांची वाळु रेवंडी माफिया रोज विकताता.
6,00,000 × 30 दिवस = 1.80 लाख रूपये महिन्याची ऊलाढाल करतात.
6 महिन्याला = 1.80 × 6 महीने = 10 कोटी 80 लाख रूपये फक्त 6 महीन्यात.

वाळु ऊपशामुळे तळाशिल ग्रामस्थ याची अंदाजे 100 गुंठे जमीन पाण्याखाली गेली.

1 गुंठे जमीन चा रेट कीती आहे?

अंदाजे कमीतकमी 3 लाख धरा कीती झाले 100 गुंठे जमिनीचे.
अंदाजे 3 कोटी रुपये ची तळाशिल ग्रामस्थ याचीच जमीन पाण्याखाली गेली.

शासनाला काय भेटतय? तळाशिल गावाला काय भेटतय? रेवंडी गावाला काय भेटतय? सामान्य माणसाला काय भेटत?
वाळु माफिया आणी त्याचे सगे सोयरे सोडुन बाकीच्यांना ट्रक खाली जीव गमवावा लागतोय?
कोण देणार नुकसानभरपाई? मा. तहसीलदार कि जिल्हाधिकारी?1 बोट दिवसातून 18 ब्रास वाळु उत्खनन करते.
1 ट्रिप ला 6 ब्रास. 20,000 ला 2 डम्पर.

1 = 18 ब्रास
10 = ?

10 बोटी दिवसाला 180 ब्रास वाळु काढतात.
3 ब्रास वाळु म्हणजे 1 डम्पर हा 10,000/- जातो तर 180 ब्रास वाळु चे किती रूपये?

3 ब्रास = 10,000/-
180 ब्रास = ?

600,000/- रूपयांची वाळु रेवंडी माफिया रोज विकताता.
6,00,000 × 30 दिवस = 1.80 लाख रूपये महिन्याची ऊलाढाल करतात.
6 महिन्याला = 1.80 × 6 महीने = 10 कोटी 80 लाख रूपये फक्त 6 महीन्यात.

वाळु ऊपशामुळे तळाशिल ग्रामस्थ याची अंदाजे 100 गुंठे जमीन पाण्याखाली गेली.

1 गुंठे जमीन चा रेट कीती आहे?

अंदाजे कमीतकमी 3 लाख धरा कीती झाले 100 गुंठे जमिनीचे.
अंदाजे 3 कोटी रुपये ची तळाशिल ग्रामस्थ याचीच जमीन पाण्याखाली गेली.

शासनाला काय भेटतय? तळाशिल गावाला काय भेटतय? रेवंडी गावाला काय भेटतय? सामान्य माणसाला काय भेटत?
वाळु माफिया आणी त्याचे सगे सोयरे सोडुन बाकीच्यांना ट्रक खाली जीव गमवावा लागतोय?
कोण देणार नुकसानभरपाई? मा. तहसीलदार कि जिल्हाधिकारी?

ही केवळ एक तक्रार नसून, प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालणारा एक आरसा आहे.तळाशिल ग्रामस्था महिला वाळू माफिया विरुद्ध बोटीत ...
04/04/2026

ही केवळ एक तक्रार नसून, प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालणारा एक आरसा आहे.

तळाशिल ग्रामस्था महिला वाळू माफिया विरुद्ध बोटीत बसून आंदोलन करत आहे. शासन फ़क्त बघ्याची भूमिका घेताना....

लोकशाहीच्या तीन स्तंभांचे (विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका) संतुलन बिघडले की वाळू माफियांसारखे 'सिंडिकेट' कसे फोफावतात, याचे 'तळाशिल' हे जिवंत उदाहरण आहे.

*डोळे उघडा! तळाशिलचा आक्रोश: प्रशासकीय उदासीनता की व्यवस्थेचे अपयश?*

'लोकशाही' म्हणजे केवळ निवडणुका आणि भाषणे नव्हे, तर शेवटच्या माणसाच्या जगण्याच्या अधिकाराचे रक्षण. परंतु, जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळाशिल-तोंडवळी सारखे गाव अरबी समुद्र आणि गड नदीच्या विळख्यात सापडलेले असताना, तिथे वाळू माफियांचा हैदोस सुरू असतो, तेव्हा प्रश्न पडतो—शासन नक्की कुणाचे आहे?

*'पब्लिक ट्रस्ट' सिद्धांताचा विसर?*

सर्वोच्च न्यायालयाने वारंवार 'Public Trust Doctrine' (सार्वजनिक विश्वस्त सिद्धांत) अधोरेखित केला आहे. याचा अर्थ असा की, नैसर्गिक संसाधने (वाळू, पाणी, जमीन) ही शासनाची खासगी मालमत्ता नसून, ती जनतेची आहे आणि शासन त्याचा 'रक्षक' (Trustee) आहे. जेव्हा तळाशिलमध्ये NGT (राष्ट्रीय हरित लवाद) चे आदेश धाब्यावर बसवून दिवस-रात्र अवैध वाळू उपसा होतो, तेव्हा जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन या कर्तव्यात कसूर करत असल्याचे स्पष्ट होते.

*वाळू माफियांचे 'सिंडिकेट' आणि प्रशासकीय मौन*

तळाशिल हे गाव नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील पट्ट्यात आहे. एकीकडे समुद्राच्या पाण्याची भीती आणि दुसरीकडे मानवनिर्मित 'वाळू चोरी'ची आपत्ती. जेव्हा स्थानिक लोक या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात, तेव्हा त्यांना धमक्या दिल्या जातात.

प्रश्न हा आहे की जर सामान्य जनतेलाच स्वतःचे गाव वाचवण्यासाठी माफियांशी लढावे लागणार असेल, तर मग खाकी वर्दी आणि लाल दिवा कशासाठी?

* प्रश्न हा आहे: जर सामान्य जनतेलाच स्वतःचे गाव वाचवण्यासाठी माफियांशी लढावे लागणार असेल, तर मग खाकी वर्दी आणि लाल दिवा कशासाठी?
* सेटलमेंटचे राजकारण: अपघात होतात, जीव जातात, पण काही तासांतच 'सेटलमेंट' होऊन पुन्हा ट्रकांचे चाक फिरू लागते. ही साखळी तोडण्याची हिंमत प्रशासनात का नाही?
३. साहेब, एसी ऑफिसच्या बाहेर आमचा जिल्हा मोठा आहे!
जिल्हाधिकारी आणि एस.पी. साहेब, योग दिनाचे फोटो, उद्घाटन सोहळे आणि क्रिकेट मॅचेस नक्कीच महत्त्वाच्य

07/02/2025
तळाशिल वाडीतील हरिनाम सप्ताह घट विसर्जन करताना खेळाला जाणारा गोपाळकाला.धन्यवाद Lucky Kambli या अप्रतिम VIDEO LOG साठी.
07/07/2023

तळाशिल वाडीतील हरिनाम सप्ताह घट विसर्जन करताना खेळाला जाणारा गोपाळकाला.

धन्यवाद Lucky Kambli या अप्रतिम VIDEO LOG साठी.

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्याम...

22/04/2023

कोकणात जन्म घेण्याचं आपल्या हातात नसतं पण त्या नंत्तर ही कोंकणी होण्याचं सौभाग्य मात्र नक्की मिळू शकतं.
*पश्चिम महाराष्ट्रातील एका सरकारी कर्मचारी महिलेची पोस्ट ।।*

माझं जन्म गाव, शिक्षण सगळं सांगली जिल्ह्यातील आहे. पण माझी कर्मभूमी कोकण आहे.. जन्मभूमी म्हणून ओढ आहे, पण मी कोकण शिवाय जगू शकत नाही... मी कोकणा शिवाय राहू शकत नाही... कारण, कारणं तर खूप आहेत..

कोकणात सगळ्या चालीरीती आहेत ना त्या सगळ्या मानवाला आनंदी ठेवणाऱ्या आहेत, जगण्याचा सोहळा करणाऱ्या आहेत...
इथला बाप कधी हुंडा देत नाही, अन हुंडा घेत नाही... त्यामुळे मुलीला जन्म देण्यापूर्वी तपासणी करत नाही.. जन्माला येईल ते अपत्य तेवढ्याच प्रेमाने वाढवतो...

इथं मुलींना सासुरवास नसतो, सून नोकरी करणारी असेल तर, सासू तिच्या हातात डबा तयार करून देते, किंवा सासरे डबा पोचवायला ऑफिस मध्ये येतात हे मी स्वतः पाहिले आहे...

इथली लोकं खूप कष्टाळू आहेत, एक ग्लास तांदुळाच्या पिठीची 20 भर आंबोळ्या टाकून घर जेवू घालते इथली बाई..

फणसाच्या अठीळा शिजवून प्रोटीन देते सगळ्या घराला..
इथला शेतकरी, रस्त्यावर दूध ओतणार नाही, निषेध म्हणून ते दूध गावभर फुकट पोहचवून येईल!
आंब्याचं नुकसान झालं तर रस्त्यावर आंबे नाही फेकणार.. त्याला अन्न म्हणजे पूर्णब्रह्म आहे हे माहीत आहे!

पुरात, वादळात नष्ट झालीत झाडं.. वीजेच्या तारा तुटल्याने महिना महिनाभर वीज नव्हती... पण, आरडाओरडा न करता, एकमेकांना श्रमदानातून नवीन झाडांची लागवड केली...

एकदा पीक गेलं की शेतकऱ्यांचं एक वर्षाचं नुकसान होतं.. पण, इथं वादळात, 60-70 वर्षांची झाडं उन्मळून पडली, तरीही चिकाटीने नवीन बाग रोवली...

मागच्या वादळातली बाब.. कोरोनामुळे वाहतुकीवर निर्बंध होते, वादळामुळे सगळं ठप्प... मनात विचार केला, की याच जनतेने दिलेल्या महसूल करामधून दरमहा पगार मिळतो, त्यातला थोडा भाग त्यांच्यासाठी देऊ! मग आम्ही ZP तल्या कर्मचाऱ्यांनी/अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एका रात्रीत 2.50 लाख रुपये वर्गणी जमा केली, अन त्या लोकांपर्यंत पोचलो अन त्यावेळी त्यांच्या मनातलं जाणलं, हृदय जाणलं!
त्यांचं म्हणणं एकच,"माझ्या पणजोबाची बाग, त्यांनी लावली म्हणून मी खाल्ली, आता मी लावली तर माझे वारस खातील..."

इथं मुलगा मुलगी भेदच नाही, पोरापोरींना समान न्याय आहे... मुलीने प्रेम प्रकरण केले तर खानदान की इज्जत जाते वगैरे असे प्रकार इथे फारसे दिसत नाहीत! पोराने परजातीतील मुलीशी लग्न केलं म्हणून त्याचं तोंड आयुष्यभर बघणार नाही, असली फालतू कट्टरता इथं नाही...आपलीच पोरं म्हणून आईवडील पोसतात...

बारीकसारीक भांडणावरून कोर्टात जातील पण, खून पडणार नाहीत...
कायद्यावर, प्रशासनावर खूप विश्वास आहे इथल्या लोकांचा... नियमात वागतील अन नियमात काम करून घेतील...

जीव लावणे, घासातला घास देणे हे कोकणात शिकावे..
इथं मी कामानिमित्त रात्री 3 वाजता सुध्दा एकटी फिरले आहे, अजिबात भीती वाटत नाही.. इथं स्त्रीचा खूप सन्मान राखला जातो..

मी स्वतः पाहिलंय, एका माणसाचे दुकानातून घेतलेले गहू, रस्त्यावर सांडले.. तर लोकांनी त्यावर गाड्या न घालता, 3-4 जण गाडी थांबवून उतरून गहू जमा करून भरून दिले!
आम्ही सरकारी कर्मचारी सुध्दा, आपण या जनते साठी आहोत याची जाण ठेवून लोकाभिमुख काम करतो!
सरकारी कर्मचाऱ्यांना किलोभर तांदूळ, 4 आंबे, 2 नारळ, कुळीथ.. ही प्रेमाने दिलेली भेट इथं मिळते... त्यात गरिबांचे प्रेम असते..
भाऊंनो, बाईंनो अशी प्रेमाने हाक असते..

मी 18 वर्षे कोकणात एकटी, माझं लहान मूल घेऊन राहिले, मूलगा आता 21 वर्षाचा आहे... पण, मला कधी इथं असुरक्षित वाटलं नाही...

माझे शेजारी अन माझे कार्यालयातले सहकारी यांनी माझी कधीही अडचण निर्माण होऊ दिली नाही...
मी आजारी असताना औषधे आणून देणे, मी बाहेर असेल तर माझ्या घरात दूध भाजी पोचवणे, गाडी बंद पडली तरी ती त्या स्पॉट वरून नेऊन परत घरापर्यंत आणून देणे... सगळं घरपोच सेवा देणे हे सगळं आपुलकीने करतात...
इथल्या माणसांच्यात निसर्गतःच प्रेम आहे..
खळाळत्या झऱ्यासारखं जगणं..
धो धो पावसासारखे प्रेम बरसणार..
हिरव्यागार डोंगर दऱ्या प्रमाणे काळीज हिरवंगार...
अथांग समुद्राप्रमाणे विशाल काळजाची माणसं...
फणसाचे गोड गरे, तशी गोड माणसं..
रातांबे जसे लाल, तशी रंगीत माणसं..
करवंद, जांभळे, तुरट गोड...
गणेशोत्सव, शिमग्याची गोष्टच न्यारी... माणसाला वर्षातून बेधुंद होऊन नाचणं हवं, त्यासाठी हे उत्सव..
एकमेकांना मदत करून जीवन जगतात इथली माणसं...

अन मग... मी पण इथलीच झाले आहे... माहेराहून येताना, साखरप्याच्या हद्दीत गाडी आली की माझा श्वास मोकळा होतो..
हातखंबाच्या तिठ्यावरून रत्नागिरीत शिरलं की माझ्या कानात आपुलकीचं वारं भरतं
या मातीत मिसळून जायची तयारी आहे...

मी रिटायर्ड झाले तरी, जग फिरत राहीन पण जग फिरून पुन्हा कोकणातच येईन...
माझं घर आहे इथं...
प्रोमोशन झाले तरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्ये घेईन... पण कोकण नाही सोडणार.

(तळटीप: चांगलं वाईट सगळीकडे असतं, अपवादात्मक बाबी सगळीकडे असतात, पण कोकणात मी खूप सुखी आहे)

*©️प्रतिभा देशमुख, रत्नागिरी*
🌴 #राजापूर #कोकण #राजापूरकर #गावं_वाचवा िद्द_रिफायनरी_रद्द #एकचजिद्दरिफायनरीरद्द

24/10/2021

कोकण Diaries with रान माणूस ह्या सिरीज मधून सह्याद्री च्या माथ्यावर उगम पावून समुद्राशी नाते जोडणाऱ्या नद्यांच्या खोऱ्.....

03/09/2021

सुप्रसिद्ध Vloger Jeevan Kadam यांनी आपल्या Youtube Channel वर पर्यटन करताना केल्या जाणार्‍या कचरा संबंधित मत मांडले. ही खूप मोठी समस्या आहे. मला असे वाटते प्रत्येक पर्यटन व्यवसायिकाने आपल्याकडे येणार्‍या पर्यटकांना जबाबदारी ची जाणीव करून दिल्यास परिस्थिती सुधारण्यासाठी हातभार लागेल.

_*पृथ्वीवरचा स्वर्ग झगडतोय स्वतःच्या अस्तित्वासाठी...*_          _*वाचकहो, पृथ्वीवरचा स्वर्ग अस संबोधल जाणार आमचं तळाशिल...
15/08/2021

_*पृथ्वीवरचा स्वर्ग झगडतोय स्वतःच्या अस्तित्वासाठी...*_

_*वाचकहो, पृथ्वीवरचा स्वर्ग अस संबोधल जाणार आमचं तळाशिल गाव इतरवेळी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशविदेशातल्या पर्यटकांनी हे गाव नटलेलं असत. परंतु सध्या ह्या गावातील प्रत्येक व्यक्ती भीतीच्या छायेखाली जगतं आहे. कारण पाऊस सुरू झाल्यावर येणारी वादळं, समुद्राच्या तुफानी लाटा, सोसाट्याचे वारे या व अशा अनेक परिस्थितीमुळे तळाशिलवासीयांना जीव मुठीत धरून राहावं लागत आहे इतरवेळी सौंदर्याच्या कितीही उपमा देऊन संपणार नाही असा हा समुद्र पावसाची चाहूल लागताच आपल आक्राळविक्राळ रौद्ररूप दाखवायला चालू करतो. गावाच्या एकाबाजूला खाडीपात्र असून दुसऱ्या बाजूला महाकाय असा समुद्र आहे इथली लोक अनेकवर्ष मच्छीमारी हा पारंपरिक व्यवसाय चालवतात.*_
_*आज हा शब्दप्रपंच करण्याचं कारण हेच आहे की हा आमचा पृथ्वीवरचा स्वर्ग स्वतःच्या अस्तित्वासाठी अक्षरशः झगडतोय कारण सद्यपरिस्थिती पाहता या गावाच्या भविष्यातील अस्तित्वावर शंका येऊ लागली आहे मी अस का म्हणतोय तर त्याला कारणही तसच आहे...समुद्रकिनाऱ्याची मोठ्या प्रमाणावर धूप होत चालली आहे, समुद्राच्या तुफानी लाटा गावाच्या किनाऱ्यावर वारंवार आदळत आहेत त्यामुळे आतापर्यंत साधारणपणे किनाऱ्याचा सुमारे 15 ते 20 मीटर भूभाग हा समुद्राने गिळंकृत केलेला आहे तसेच समुद्राला येणारी मोठी उधाणं, वारंवार येणारी वादळं आणि यामुळेच समुद्राचे तसेच नदीचे पाणी लोकवस्तीत घुसायची भीती अजूनच वाढली आहे यामुळे तळाशिल गावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बदलणार ऋतुचक्र आपण थांबवू शकत नाही परंतु येणाऱ्या धोक्याची चाहूल लक्षात घेऊन आपण उपाययोजना नक्कीच करू शकतो आणि हीच गोष्ट गावातल्या लोकांनी तळाशिलवासियांनी आधीच ओळखली होती आणि 2005 पासूनच गावाच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी उत्तम दर्जाच्या दगडी बंधाऱ्याची मागणी करण्यात आली होती त्यावर तेव्हाच्या प्रशासनाने काम तर सुरू केलं परंतु थोड काम सुरू होऊन काही टप्पा पूर्ण झाल्यावर काम बंद झालं आणि गावातल्या लोकांच्या पदरी निराशाच पडली त्यानंतर प्रशासन बदलत राहिली लोक मागणी करत राहिले आणि लोकांना मात्र फक्त आणि फक्त शासनदरबाराचे उंबरे झिजवावे लागले त्यातही प्रशासनाची माणसं येतात परिस्थिती बघतात आश्वासनांचा पाऊस पाडून जातात हीच स्थिती आता अनेक वर्ष चालू आहे आणि लोकांचा विषय शासनदरबारी धूळ खात पडलेला आहे त्यामुळे तळाशिलमधील प्रचंड मोठ्या लोकवस्तीच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. आपण लोकशाही लोकशाही म्हणतो अरे कुठे आहे लोकशाही इकडे जर लोकांनी निवडून दिलेले प्रशासन लोकांच्या मागण्या पूर्ण करत नसेल तर कशाला हव अस प्रशासन आणि कशाला हव्या निवडणुका...?*_
_*आता आमच्या ह्या पृथ्वीवरच्या स्वर्गाला न्याय हवाय आणि तोही कायमस्वरूपी, फक्त कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्षात त्यावर अंमबजावणी व्हायला हवी अन्यथा लोकांचा रोष हा वाढलेला आहेच त्यात जर प्रशासनाने अजून हलगर्जीपणा केला तर मात्र लोकांचा आक्रोश आणि रोष शासनाला परवडणारा नाहीय. एकाबाजूला पर्यटन गाव म्हणून गौरव करायचं आणि दुसऱ्या बाजूला या गावाच्या समस्यांवर कानाडोळा करायचा ही स्थिती बदलली पाहिजे.*_
_*शासनाला आमची हीच मागणी आहे की गावात येऊन इथल्या स्थानिक ग्रामस्थांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तात्काळ मार्ग काढावा अन्यथा हे गाव आपल अस्तित्व गमवून बसेल. प्रशासन कुठेतरी हे विसरतय की मोठमोठे प्रकल्प नवनवीन गोष्टी आणण्याच्या नादात गावाला विसरून नाही चालणार हे सर्व आणले पाहिजेच खरतर त्यावर देशाचा विकास आणि पर्यायाने आपला विकास अवलंबून असतो पण त्यासोबतच खरोखरच आपल्या देशाचा जो श्वास आहे अश्या गावांना आपण विसरता कामा नये आमच्यासारख्याच इतर अनेक गावांच्या व्यथा आहेत त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावं कारण गाव टिकली तरच देश टिकेल बरोबर ना...?*_
_*गावाच्या बंधाऱ्यासाठी तात्काळ प्रयत्न व्हावे यासाठी आणि आमच्या न्याय्य मागण्यांसाठी आम्ही तळाशिलवासीय 15 ऑगस्ट 2021 पासून बेमुदत उपोषण करत आहोत शासनाला या उपोषणाची दखल घ्यावीच लागेल अन्यथा शासनाला गावच्या जनआक्रोशाला सामोर जावं लागेल. गावाला वाचवण्यासाठी गावाचं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी गावातील प्रत्येक लोक प्रयत्न करत आहेत त्यांच्या या प्रयत्नांना एक जोड मिळावी म्हणून मी माझा हा शब्दप्रपंच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे वाचकांना माझ हेच मागणं आहे की तुम्हालाही जर आमच्या या गावाची तळमळ जाणवत असेल तर आम्हाला तुमची साथ हवीय तळाशिल गावातील हे भीषण वास्तव्य सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी मला तुमची मदत हवीय म्हणून तुम्हां सर्व वाचकांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्हीसुद्धा ही माहिती आणि माझा हा प्रयत्न सर्वांपर्यंत पोचवा, शासनापर्यंत पोचवा जेणेकरून झोपलेल्या प्रशासनाला जाग येईल.*_

_*...धन्यवाद...*_

_*सुमित चोडणेकर*_
_*तळाशिल, मालवण*_

Address

Talashil Tondavali Beach
Malvan
416626

Alerts

Be the first to know and let us send you an email when Talashil Tondavali Beach posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share