Chhatrapati Shivaji Maharaj Photo Collection

Chhatrapati Shivaji Maharaj Photo Collection शिवरायांचे सुंदर फोटो मिळण्याचे फेसबुक वरील एकमेव पेज..
(4337)

शुरता हा माझा आत्मा आहे।
विरता आणि विवेक ही माझी ओळखआहे।
क्षञिय हा माझा धर्म आहे।
छञपति शिवराय हे माझे दैवत आहे।
होय मी मराठी आहे।
"जय जिजाऊ
जय शिवराय !

 #बहिर्जी_नाईक_एक_अज्ञात_थोरपण१०-१० दिवसअन्नपाण्या शिवाय राहतो,तर महिना महिना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो…!धावायला लागल...
12/08/2026

#बहिर्जी_नाईक_एक_अज्ञात_थोरपण

१०-१० दिवसअन्नपाण्या शिवाय राहतो,तर महिना महिना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो…!
धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो,पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो..!

तलवार,भाला,फरीगगदा,पट्टा, विटटा,धनुष्य,असे काही चालवतो की समोर महासागर येऊदे शत्रूचा…!
शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो,तर खुद्द औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकवून बक्षीस घेऊन येऊ शकतो…!

माणूस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही,जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा..!
मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय,सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड…!खरं सांगतो गड्यांनो…हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता..!

आणि शिवराय त्याला इतके मानत की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक…!
गड्यांनो,महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास की हा माणूस चुकून सुद्धा चूक करु शकणार नाही इतका दृढ विश्वास…!

पाची पातशाहिना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते इतकी गुप्तता पाळत होते नाईक….!

महाराजांचा अभिषेक सुरु होता,महाराज मुक्त हस्ताने गरीब फकिराना ओंजळ भरभरून द्रव्य दान करत होते आणि एक म्हातारा फकीर त्या रांगेत उभा होता…!
जक्ख म्हातारा हुंदके देऊन रडत होता आणि डोळे भरून महाराजांना पाहत होता…..महाराजांनी जेव्हा त्या फकिराला पाहिले तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला…!
ओठावर मिशा नव्हत्या तेव्हा पासून ह्या बहिर्जीने आणि मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले….आणि आज मराठेशाही स्थापन होत आहे,राज्य आनंदात आहे,आणि ज्याने आजवर सारी संकटे आपल्या छातीवर झेलली तो बहिर्जी फकीर होऊन याचकांच्या रांगेत उभा आहे…!
काय बोलावे या प्रकाराला….कसली वेडी माणसं असतील ती…!
एका मंदिराला फरशी दान दिली की साऱ्या घराण्याची नावे टाकणारे तुम्ही आम्ही त्या बहिर्जी नाईकांच्या काळजाला कधी समजू शकू का ?
स्वतःच्या बायकोला सुद्धा अगदी शेवटपर्यंत माहिती नव्हते की ज्याच्या सोबत मी सात जन्माचे बंधन बांधले आहे….तो खुद्द स्वराज्याचा गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक आहे….इतकी कमालीची गुप्तता…!
आणि एवढा विलक्षण त्याग करुन राजे त्यांना देत तर काय होते हो …?
काहीच नाही….उलट प्रत्येक मोहिमेत जीवाचा प्रश्न…माघारी येईल का नाही शाश्वती नव्हती…!
ही वेडी खुळी माणसे अशी का जगली असतील ??
बस्स…एवढ्या एका प्रश्नाचे उत्तर ज्याला समजून येईल त्याच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही….!

अश्या या स्वराज्य वेड्या माणसांना मानाचा मुजरा !
जय जिजाऊ जय शिवराय....🙏🙏🚩🚩

नरवीर बहिर्जी नाईक जाधव समाधी - बानुर गड🙏

एकदा नक्की भेट दया

लेखक अज्ञात

12/08/2026

जय शिवराय 🙏🚩

प्रत्येकाच्या हातात तलवार असली, तरी इच्छाशक्तीच राज्य स्थापन करते.".. ⛳केवळ हातात शस्त्र किंवा साधन असण्या पेक्षा मनात अ...
11/08/2026

प्रत्येकाच्या हातात तलवार असली, तरी इच्छाशक्तीच राज्य स्थापन करते.".. ⛳

केवळ हातात शस्त्र किंवा साधन असण्या पेक्षा मनात असलेली दृढ जिद्द, ध्येय आणि कार्य करण्याची इच्छाशक्ती हीच मोठी साम्राज्ये किंवा स्वराज्य स्थापन करू शकते... ⛳

जय भवानी.. 🚩
जय शिवाजी... 🚩

साधनांपेक्षा मनगटातील ताकद: केवळ हत्यार किंवा तलवार बाळगल्याने कोणीही राजा किंवा पराक्रमी होत नाही... ⛳

मानसिक खंबीरपणा: कोणतेही मोठे परिवर्तन घडवण्यासाठी मनाची तयारी आणि स्पष्ट ध्येय असावे लागते... ⛳

स्वराज्य निर्मिती: रयतेच्या कल्याणासाठी आणि स्वतंत्र राज कठीण परिस्थितीशी लढण्याची जिद्द इच्छाशक्तीमुळे येते.. 🚩

छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
10/08/2026

छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩

राजे 🚩
09/08/2026

राजे 🚩

जय शिवराय 🚩
08/08/2026

जय शिवराय 🚩

02/08/2026

Chhatrapati Shivaji Maharaj Photo Collection 🚩

01/08/2026

Address

Mangalwedha
413305

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chhatrapati Shivaji Maharaj Photo Collection posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share