Abhaysinh Jagtap - अभयसिंह जगताप

Abhaysinh Jagtap - अभयसिंह जगताप निडर, निर्भय, निर्भिड परिवर्तनवादी...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | सदैव साहेबांसोबत

🚨 साखर ₹७० पार! महागाईचा जनतेला फटका!ट्रम्प यांच्या चुकीच्या धोरणांचा जाहीर निषेध! ✊महागाई रोखा, जनतेला न्याय द्या!
31/08/2026

🚨 साखर ₹७० पार! महागाईचा जनतेला फटका!

ट्रम्प यांच्या चुकीच्या धोरणांचा जाहीर निषेध! ✊

महागाई रोखा, जनतेला न्याय द्या!

वडूज दक्षिण मळवीयेथील श्री ज्योतिबा मंदिर येथे श्रावण मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पवित्र ‘भंडारा’ उत्सवाला उपस्थि...
30/08/2026

वडूज दक्षिण मळवीयेथील श्री ज्योतिबा मंदिर येथे श्रावण मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पवित्र ‘भंडारा’ उत्सवाला उपस्थित राहण्याचा आणि या भक्तिमय सोहळ्याचा अनुभव घेण्याचा योग आला.

श्रावण महिन्याच्या पावन पर्वावर श्री ज्योतिबा देवाचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात पार पडलेला भंडारा उत्सव, भाविकांची श्रद्धा आणि परिसरात निर्माण झालेली चैतन्यपूर्ण ऊर्जा मनाला समाधान देणारी होती.

श्री ज्योतिबा देवाच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, शांती, उत्तम आरोग्य आणि भरभराट नांदो, हीच त्यांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना. 🙏🚩

#श्रीज्योतिबा #भंडारा_उत्सव #श्रावणमास

💐 शुभविवाह सोहळा | वडूज 💐आज वडूज येथे डॉ. संतोष गोडसे यांचे ज्येष्ठ चिरंजीव चि. प्रीतम आणि श्री. राजेंद्र चव्हाण यांची स...
30/08/2026

💐 शुभविवाह सोहळा | वडूज 💐

आज वडूज येथे डॉ. संतोष गोडसे यांचे ज्येष्ठ चिरंजीव चि. प्रीतम आणि श्री. राजेंद्र चव्हाण यांची सुकन्या चि. सौ. का. गायत्री यांच्या शुभविवाह प्रसंगी उपस्थित राहून वधू-वरास शुभाशीर्वाद दिले.

या मंगलमय प्रसंगी उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार, नेतेमंडळी तसेच ग्रामस्थांशी मनमोकळ्या गप्पा मारून संवाद साधला.

नवदाम्पत्याच्या आयुष्यात प्रेम, सुख, समृद्धी आणि आनंद सदैव नांदो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा! 💐💍

प्रीतम & गायत्री यांना सुखी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा! 💐❤️

30/08/2026

🚩 श्रद्धेचा सोहळा… भक्तीचा जागर… आणि मंगलमय क्षण! 🚩

खटाव तालुक्यातील पिंपरी येथे गावचे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त उपस्थित राहण्याचा योग आला. यावेळी श्री हनुमानरायांचे मनोभावे दर्शन घेतले व सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. 🙏

या मंगलमय सोहळ्याला भागातील नेतेमंडळी, मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसरात श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

ग्रामदैवत श्री हनुमानरायांच्या कृपाशीर्वादाने पिंपरी गावासह संपूर्ण परिसराची सदैव प्रगती होवो, प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना! 🙏🚩

जय श्री हनुमान! 🚩
जय ग्रामदैवत! 🙏

#पिंपरी #खटाव #श्रीहनुमान #हनुमानमंदिर #कलशारोहण #ग्रामदैवत #भक्ती #महाराष्ट्र #खटावतालुका

राखीच्या धाग्यात गुंफलेलं प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराची साथ… ❤️भाऊ-बहीणीच्या या अतूट नात्याला प्रेम, जिव्हाळा आणि आपुलक...
28/08/2026

राखीच्या धाग्यात गुंफलेलं प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराची साथ… ❤️

भाऊ-बहीणीच्या या अतूट नात्याला प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीच्या असंख्य शुभेच्छा!
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🪢✨

#रक्षाबंधन #भाऊबहिणीचेनाते #प्रेमाचाधागा

आज महाबळेश्वरवाडी येथे श्री. राजाराम शेठ जगताप यांच्या नूतन ‘शोभाराज’ वास्तूच्या वास्तुशांती सोहळ्यानिमित्त उपस्थित राहण...
26/08/2026

आज महाबळेश्वरवाडी येथे श्री. राजाराम शेठ जगताप यांच्या नूतन ‘शोभाराज’ वास्तूच्या वास्तुशांती सोहळ्यानिमित्त उपस्थित राहण्याचा योग आला. 🏡✨

यावेळी पवित्र वास्तुशांती पूजेचे दर्शन घेतले तसेच उपस्थित नागरिक व ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला.

जगताप परिवाराच्या नव्या वास्तूत सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद सदैव नांदो, ही मनःपूर्वक सदिच्छा व्यक्त केली.

नव्या वास्तूत नवी स्वप्ने, नवा आनंद आणि सुख-समृद्धीची अखंड बरसात होवो!
जगताप परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🙏

🌿 गुरव समाजाचा श्रावणी व मौजीबंधन सोहळा | वडूज 🌿खटाव तालुका गुरव समाज संघटनेच्या वतीने वडूज येथे आयोजित करण्यात आलेल्या ...
26/08/2026

🌿 गुरव समाजाचा श्रावणी व मौजीबंधन सोहळा | वडूज 🌿

खटाव तालुका गुरव समाज संघटनेच्या वतीने वडूज येथे आयोजित करण्यात आलेल्या गुरव समाजाचा श्रावणी व मौजीबंधन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा सन्मान मिळाला.

यावेळी समाजबांधवांच्या वतीने माझा सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित समाजबांधवांना संबोधित करताना समाजाची एकजूट, संस्कृती-परंपरांचे जतन आणि पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज याबाबत मनोगत व्यक्त केले.

गुरव समाजाच्या प्रगतीसाठी आणि समाजबांधवांच्या सुख-दुःखात सदैव सोबत राहण्याचा माझा प्रयत्न राहील. 🤝

आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपली एकजूट — हीच समाजाची खरी ताकद! 🚩

#गुरवसमाज #श्रावणीसोहळा #मौजीबंधन #वडूज

आज वडूज येथे ईद-ए-मिलाद निमित्त उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व विविध ठिकाणी भेटी घेतल्या.प्रेषित हजरत...
26/08/2026

आज वडूज येथे ईद-ए-मिलाद निमित्त उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व विविध ठिकाणी भेटी घेतल्या.

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीतील प्रेम, बंधुभाव, शांतता आणि मानवतेचा संदेश समाजात सदैव प्रेरणा देत राहो, हीच मनापासून सदिच्छा.

ईद-ए-मिलादच्या सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🤝🌙

िलाद #वडूज #मानवता

विचारांची देवाणघेवाण… प्रश्नांना व्यासपीठ… आणि महाराष्ट्राच्या भविष्याचा संवाद!शिवसंकल्प फाउंडेशनच्या वतीने आयोजित “महार...
26/08/2026

विचारांची देवाणघेवाण… प्रश्नांना व्यासपीठ… आणि महाराष्ट्राच्या भविष्याचा संवाद!

शिवसंकल्प फाउंडेशनच्या वतीने आयोजित “महाराष्ट्रातील समकालीन प्रश्नांच्या चर्चेसाठी परिसंवाद” हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि विचारांना चालना देणाऱ्या वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या पुरोगामी विचारांना अभिवादन करण्यात आले.

यानंतर महाराष्ट्राच्या वर्तमान आणि भविष्यासमोरील विविध प्रश्नांवर मान्यवर वक्त्यांनी अभ्यासपूर्ण, परखड आणि मार्गदर्शक विचार मांडत उपस्थितांना संबोधित केले.

विशेष म्हणजे, उपस्थित नागरिकांनीही आपल्या मनातील प्रश्न थेट वक्त्यांसमोर मांडत सक्रिय सहभाग नोंदवला. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून झालेला हा थेट संवाद कार्यक्रमाची खरी ताकद ठरला.

मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी संस्कृती, मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा वैचारिक संवादांची गरज आहे, ही भावना या परिसंवादातून प्रकर्षाने जाणवली.

कार्यक्रमाला उपस्थित राहून विचारांची ही चळवळ समृद्ध करणाऱ्या सर्व मान्यवर वक्ते, नागरिक, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार! 🙏

महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेऊन, प्रश्नांवर चर्चा करूया… आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशा ठरवूया!

23/08/2026

🌱 शिक्षणाची वाट सोपी करणारा मदतीचा हात…! 🚲

आज वरकुटे-मलवडी येथे उडान फाऊंडेशनच्या वतीने वरकुटे-मलवडी व पंचक्रोशीतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आयोजित मोफत सायकल वाटप कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजपर्यंत पोहोचण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन उडान फाऊंडेशनने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. 🚲📚
विशेषतः मा. भाग्यश्री ठाकूर (संस्थापिका, उडान फाऊंडेशन) यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्याचे केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे.

समाजाच्या विकासासाठी केवळ आर्थिक मदत नव्हे, तर गरजू विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारे उपक्रम आजच्या काळाची गरज आहेत. उडान फाऊंडेशनच्या या उपक्रमातून अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. 💐

यावेळी मा. डॉ. नितीनजी वाघमोडे साहेब (अतिरिक्त आयकर आयुक्त, पुणे), मा. भाग्यश्री ठाकूर, डॉ. अजय चंदनवाले, मा. जीवन बनसोडे साहेब (तहसीलदार, इंदापूर), पंचायत समितीचे सभापती मा. विक्रमजी शिंगाडे, लोकनियुक्त सरपंच मा. विलास खरात, मा. सरपंच बाळकृष्ण जगताप, उपसरपंच जालिंदर वाघमोडे शेठ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

तसेच वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सुंदर आणि समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करणारे मा. चेअरमन सुनील थोरात यांचेही मनःपूर्वक अभिनंदन! 💐

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे हातच उद्याचा सक्षम समाज घडवतात…! 🚲✨

#उडानफाऊंडेशन #मोफतसायकलवाटप #विद्यार्थीहित #शिक्षण

Address

Mhasavad

Telephone

+919011010344

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhaysinh Jagtap - अभयसिंह जगताप posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category