Swati Sushant Khade

Swati Sushant Khade District President, BJP Mahila Morcha (Sangli). CEO, MTDK School, Miraj. Committed to women’s empowerment, education, and community development.

Working to build a stronger, progressive future for women and youth.

अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,राम नारायणं जानकी वल्लभम्! श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
04/09/2026

अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,
राम नारायणं जानकी वल्लभम्!

श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! जय श्रीकृष्ण!

03/09/2026

SIR प्रक्रियेअंतर्गत प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. आपले नाव मतदार यादीत आहे का, हे कसे तपासायचे? याची सोपी पद्धत या Reel मधून जाणून घ्या. आपले नाव तपासा आणि इतरांनाही ही Reel जरूर शेअर करा.

#मतदारयादी #मतदारनोंदणी

मिरज तालुक्यातील कांचनपूर गावचे सुपुत्र लेफ्टनंट सचिन पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. वीर जवान लेफ्टनंट सचि...
03/09/2026

मिरज तालुक्यातील कांचनपूर गावचे सुपुत्र लेफ्टनंट सचिन पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. वीर जवान लेफ्टनंट सचिन पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याचे बळ देवो व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.

#भावपूर्ण_श्रद्धांजली

सांगलीतील कुंभार मळा येथे राजनंदिनी नर्सरीच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिले.विविध प्रकारची रोपे, फुलझाडे आणि हिरवाई आ...
02/09/2026

सांगलीतील कुंभार मळा येथे राजनंदिनी नर्सरीच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिले.

विविध प्रकारची रोपे, फुलझाडे आणि हिरवाई आपल्या परिसरात वाढवण्यासाठी अशा नर्सरींची नक्कीच गरज आहे. निसर्गाशी नाते जोडत हरित परिसराच्या निर्मितीसाठी राजनंदिनी नर्सरीच्या माध्यमातून चांगले काम घडावे, यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या!

#नर्सरी

मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूल, मालगाव येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा केला.विद्यार्थ्यांनी विविध क्री...
02/09/2026

मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूल, मालगाव येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा केला.

विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपले कौशल्य आणि खिलाडूवृत्ती दाखवली. विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून विशेष समाधान वाटले. अभ्यासासोबतच खेळालाही तितकेच महत्त्व देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. मैदानावर मिळणारा विजय असो वा पराभव, त्यातून शिकत पुढे जाण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे हीच खरी क्रीडा संस्कृती आहे.

सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि आयोजकांचे यावेळी मनःपूर्वक अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

भारतीय जनता पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश (मामा) ढंग आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम ...
02/09/2026

भारतीय जनता पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश (मामा) ढंग आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! 💐

Prakash Dhang

01/09/2026

📍 पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली

एम.टी.डी.के. स्कूलच्या विद्यार्थ्यांसमवेत सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयास क्षेत्रभेट देत पोलिसांच्या कार्यपद्धती व जबाबदाऱ्यांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती दिली.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगली शाखेचे उमेदवार श्री. लक्ष्मीकांत मोकाशी यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, ...
01/09/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगली शाखेचे उमेदवार श्री. लक्ष्मीकांत मोकाशी यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

विशेष म्हणजे, सिनेटच्या ९ पैकी सर्व ९ जागांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांची निवड झाली आहे. हा विद्यार्थीहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या संघटनेच्या कामाला मिळालेला महत्त्वपूर्ण प्रतिसाद आहे.

नवनिर्वाचित सर्व सिनेट सदस्यांचे हार्दिक अभिनंदन! विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यापीठाच्या विकासासाठी आपल्या माध्यमातून प्रभावीपणे काम घडावे, यासाठी पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

📍 सांगली पोलीस अधीक्षक कार्यालय.दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था, सांगली संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल,...
01/09/2026

📍 सांगली पोलीस अधीक्षक कार्यालय.

दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था, सांगली संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल, मिरज येथील विद्यार्थ्यांसाठी सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयास क्षेत्रभेट आयोजित केली. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता पोलीस विभागाची कार्यपद्धती, जबाबदाऱ्या आणि समाजातील त्यांची भूमिका प्रत्यक्ष समजावी, या उद्देशाने माझ्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापिका सौ. संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही भेट आयोजित करण्यात आली.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पोलिस कंट्रोल रूम, डायल ११२ आणि सायबर विभागाची माहिती घेतली. आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ ची भूमिका, पोलिसांकडून नागरिकांना मिळणारी तातडीची मदत तसेच सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे शिक्षण विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहते. विद्यार्थ्यांमध्ये कायदा, सुरक्षा आणि नागरिक म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी अशा क्षेत्रभेटी निश्चितच महत्वपूर्ण आहेत.

यावेळी पोलीस उपअधीक्षक श्री. सुहासजी देशमुख साहेब यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

📍 पुणे | भाजपा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी बैठकभाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि म...
31/08/2026

📍 पुणे | भाजपा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी बैठक

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या भाजपा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहिले. पक्षसंघटनेची वाटचाल, आगामी कार्यक्रम आणि जनतेपर्यंत पक्षाचे विचार व कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत यावेळी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.

याबैठकीस भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा. आ. चित्राताई वाघ, आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे तसेच इत्तर मान्यवर नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Narendra Modi BJP - Bharatiya Janata Party Nitin Nabin Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra BJP Mahila Morcha Roopkumari Choudhary Chitra Wagh BJP Mahila Morcha Maharashtra Suresh Khade

Address

Miraj
416410

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swati Sushant Khade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category