पानी फाऊंडेशन मोताळा

  • Home
  • India
  • Motala
  • पानी फाऊंडेशन मोताळा

पानी फाऊंडेशन मोताळा जल है तो कल है

26/11/2025
11/05/2025

*✨📱 १२ मे पासून पुन्हा सुरू होतेय पानी फाउंडेशनची डिजिटल शेतीशाळा!* महाराष्ट्र कृषी विभाग, उमेद, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० आणि कृषि विद्यापीठाच्या साथीने आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी ही मोलाची संधी खुली! 🌾

*🙅‍♂मग चतुररावांसारखे तुम्ही फसू नका* – वेळापत्रकानुसार उपस्थित राहा! तुमचे प्रश्न थेट शास्त्रज्ञांना विचारा अन् शेतीची तंत्रशुद्ध पद्धत शिका! 🧑‍🏫

ही शेतीशाळा *Zoom आणि पानी फाउंडेशनच्या YouTube Live* वरही पाहता येईल, तर नक्की सहभागी व्हा!🙏🌿

ही मैत्री घडवेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन...कृषी विभाग 🤝पानी फाऊंडेशन
11/05/2025

ही मैत्री घडवेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन...

कृषी विभाग 🤝पानी फाऊंडेशन

सुरु होतेय ज्ञानाची शेतीशाळा जी उत्पादन वाढवून खर्च कमी करण्यासाठी मदत करते..
06/05/2025

सुरु होतेय ज्ञानाची शेतीशाळा जी उत्पादन वाढवून खर्च कमी करण्यासाठी मदत करते..

*आजचा दिवस पानी फाउंडेशनच्या फार्मर कप २०२४ मोताळा तालुक्यातील विजेत्या शेतकरी गटांसाठी नक्कीच संस्मरणीय राहील! तालुक्या...
04/04/2025

*आजचा दिवस पानी फाउंडेशनच्या फार्मर कप २०२४ मोताळा तालुक्यातील विजेत्या शेतकरी गटांसाठी नक्कीच संस्मरणीय राहील! तालुक्याचे कृषी अधिकारी रामदास सिरसाट, मंडळ अधिकारी सचिन मोरे, अनुप लोहकरे, कृषी पर्यवेक्षक शिवशंकर बंडे, आत्मा विभाग प्रमुख दिनेश चित्रांग यांनी या गटांशी मनमोकळा संवाद साधला.🌱* यामध्ये लिहा येथील महात्मा फुले शेतकरी गट, भूमिपुत्र शेतकरी गट, खरबडी येथील परिवर्तन शेतकरी गट, कोथळी येथील निसर्गराजा महिला शेतकरी गट व युवकांचा शिव समर्थ शेतकरी गट यांचा समावेश होता.

शेतकरी गटांनी फार्मर कप प्रवासात घेतलेली मेहनत, गटशेतीतील धाडसी निर्णय, आलेल्या अडचणी, अनुभवलेले यश-अपयश आणि शेतीत केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग, सर्व काही अधिकारी यांना सांगितले. हे सर्व त्यांनीही अत्यंत तन्मयतेने आणि प्रेमाने ऐकून घेतले. अनेक शेतकऱ्यांनी शेतीत आणि उद्योग उभारणीत येत असलेल्या समस्याही सांगितल्या.
या सर्व मुद्द्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले तसेच त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासनही दिले. 🛠️✅

तालुका कृषी अधिकारी गटांविषयी बोलताना म्हणाले कि, "एकत्र येऊन गटशेती करणाऱ्या या शेतकऱ्यांची तळमळ, काम, एकमेकांना केलेले सहकार्य, त्यांच्यातील प्रगल्भता वाखाणण्याजोगी आहे. सध्यस्थितीत गटशेतीला प्राधान्य देणे खूप गरजेचे आहे आणि या गट पुढे जाऊन आदर्श बनावेत."

या शेतकरी गटांना आपला मौल्यवान वेळ देवून त्यांच्याशी केलेल्या अतिशय सुंदर हितगुजासाठी, आम्ही मन:पूर्वक आभारी आहोत.🙏✨

25/03/2025

*🚨 महत्त्वाची घोषणा! 🚨*

2026 पासून, पानी फाउंडेशन आपले कार्य महाराष्ट्राच्या *46 तालुक्यांवरून थेट 350 तालुक्यांपर्यंत* विस्तारित करणार आहे! 🌾 *सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा आता मोठ्या जोशाने संपूर्ण महाराष्ट्रभर* होणार आहे. या व्यापक उपक्रमाची तयारी जोरात सुरू झाली आहे.

या प्रयत्नांसाठी पाठिंबा दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी, मा. कृषीमंत्री श्री माणिकराव कोकाटेजी आणि राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार. *पुढील प्रवास आव्हानात्मक असला तरी, महाराष्ट्रातील शेतकरीच या वाटचालीचे नेतृत्व करत असल्याने दुष्काळमुक्त आणि समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न आता अधिक जवळ वाटत आहे! 💪*

24/03/2025

फार्मर कप स्पर्धा 2024
बक्षीस वितरण सोहळा
प्रथम विजेता :-भूमिपुत्र शेतकरी गट लिहा बु
उपविजेते :-
निसर्गराजा महिला शेतकरी गट, कोथळी
परिवर्तन शेतकरी गट,खरबडी

राज्यस्तरीय विजेते:-महात्मा फुले शेतकरी गट लिहा बु

अनंत आव्हाने झेलूनही त्यांना नव्या उमेदीने, हुरुपाने सामोरे जाणाऱ्या शेतीतून हिमतीने उद्योजकतेचीवाट चोखाळणाऱ्या शिवाराती...
08/03/2025

अनंत आव्हाने झेलूनही
त्यांना नव्या उमेदीने, हुरुपाने
सामोरे जाणाऱ्या
शेतीतून हिमतीने उद्योजकतेची
वाट चोखाळणाऱ्या
शिवारातील कृषी सौदामिनींना
टीम पानी चा कृतज्ञ सलाम!

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!



📝🌿आम्ही सावित्रीच्या लेकी, बघा करुन दाखवू शेती!शतश: वंदन!🙏🌸 भारताच्या सुधारणावादी इतिहासातील एक भव्य वक्तिमत्त्व, समाजसु...
03/01/2025

📝🌿आम्ही सावित्रीच्या लेकी, बघा करुन दाखवू शेती!

शतश: वंदन!🙏🌸 भारताच्या सुधारणावादी इतिहासातील एक भव्य वक्तिमत्त्व, समाजसुधारक, लेखिका व स्त्री-शिक्षणाच्या जनक ‘सावित्रीबाई फुले’ यांची आज १९५ वी जयंती! त्यांच्या कार्याने व शिकवणीने फार्मर कपच्या अनेक महिला शेतकरी प्रभावित आहेत. त्यांच्या नावे महिलांनी शेतकरी गटसुद्धा स्थापन केलेत. त्या सावित्रीबाईंचा ज्ञानाचा व धाडसाचा वसा पुढे चालू ठेवत आहेत!🌿

या दिनानिमित्त सुधारित व शास्त्रशुद्ध गटशेतीची चळवळ मोठी करणाऱ्या फार्मर कपच्या या हजारो महिला शेतकऱ्यांना खूप अभिनंदन!👩‍🌾☘

Address

Motala
443103

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पानी फाऊंडेशन मोताळा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category