16/11/2022
कै. व्यंकटराव पाटील संचलित चाणक्य इग्लिश स्कुल येथे बालदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मुखेड दि.14(वार्ताहर) -
मुखेड कै. व्यंकटराव पाटील संचलित चाणक्य इग्लिश स्कुल येथे बालदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अस्पतवाड साहेब उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अँड मदनेश्वर कदम , अँड. संजय भारदे . अँड. गजानन हिवराळे . माधव जुन्ने , मॅडम अनुराधा हिवराळे , कुलकर्णी मॅडम आदि मान्यवर उपस्थितीत होते अध्यक्षीय समारोप करताना ॲड अस्पतवाड साहेब बाल दिनाचे महत्व पटवुन सागितले तसेच हे बालक उद्याचे भविष्य आहेत असे सागितले व तसेच भारदे साहेब यांनी मुलांना मनोरंजन म्हणुन मुलांना आवडेल अशी ऐक बोधक कथा सांगितले. व शाळेतील विद्यार्थी यांनी आर्णावी कुलकर्णी , नीचालकर फैजल , मेहेकर श्रेया , मेहकर आरुषी , स्वतिका हावरगे , वेदिका बिल्लाळे, हिंदवी शेळके , वाघमारे नताशा रुद्र घाटे , वडजे मंगेश , स्वतीका साखरे , स्वरा साखरे , ऋतिका शिंदे , श्रीविद्या शिंदे, संध्यारणी शिंदे, चद्रकात हाक्के मारोती इंगोले, साईराज शिंदे या सर्व विद्यार्थी यांनी बाल दिनानिमित्त भाषणे केली.या कार्यक्रमास शालेय विद्यार्थी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर पाटील तसेच शिक्षक कुचेवाड मॅडम, शेळके मॅडम, राणी मॅडम, शिल्पा मॅडम, गिरी मॅडम , सचिन जुन्ने यांनी पुढाकार घेतला आहे.