Chandrakant N Patil

Chandrakant N Patil MLA Chandrakant Nimbaji Patil- Member Of Legislative Assembly 20 Muktainagar - Bodwad Constituency

०१ जून २०२६ | जळगावआज  #जळगाव येथे स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघातून भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी  #महायुतीचे...
01/06/2026

०१ जून २०२६ | जळगाव

आज #जळगाव येथे स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघातून भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी #महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री.नंदकिशोर महाजन यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला.याप्रसंगी माझा मुलगा हर्षराज पाटील उपस्थित राहून नंदकिशोर महाजन यांना शुभेच्छा दिल्या.

'याप्रसंगी मंत्री महोदय मा.ना.गिरीशभाऊ महाजन,खासदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार श्री.राजु मामा भोळे, आमदार श्री.मंगेश चव्हाण, आमदार श्री.अमोल पाटील,माजी मंत्री श्री.गुलाबराव देवकर, सुमित किशोरअप्पा पाटील यांच्यासह शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

MaharashtraMLCElections

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन!'आज  #मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौक तसेच एस.टी. बस डेपो येथे र...
31/05/2026

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन!
'आज #मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौक तसेच एस.टी. बस डेपो येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३२१ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमास माझा मुलगा हर्षराज चंद्रकांत पाटील उपस्थित राहिला.यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले तसेच त्यांच्या कार्यास व स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतीय इतिहासातील एक आदर्श, न्यायप्रिय व लोककल्याणकारी शासक म्हणून ओळखल्या जातात. आपल्या राज्यकारभारातून त्यांनी जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. देशभरातील अनेक मंदिरांचे जिर्णोद्धार, घाट, विहिरी, धर्मशाळा तसेच विविध लोकहिताची कामे करून त्यांनी समाजसेवा व सुशासनाचा आदर्श निर्माण केला.

याप्रसंगी समाजबांधव तसेच शिवसेना-युवासेना परिवारातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

“राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी-कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन! 🙏”

#लोकमाता_अहिल्यादेवी_होळकर #अहिल्यादेवीहोळकर_जयंती #मुक्ताईनगर

'दानशूर,कर्तृत्ववान,धर्मपरायण आणि देशभरातील देवस्थानांचा जीर्णोद्धार करणाऱ्या आदर्श राज्यकर्त्या,न्यायमूर्ती पुण्यश्लोक ...
31/05/2026

'दानशूर,कर्तृत्ववान,धर्मपरायण आणि देशभरातील देवस्थानांचा जीर्णोद्धार करणाऱ्या आदर्श राज्यकर्त्या,न्यायमूर्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना ३०१ व्या जयंतीनिमित्त कोटी-कोटी प्रणाम! 🚩🙏

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर

२९ मे २०२६ | एणगाव ता.बोदवड'मतदारसंघातील  #एणगाव,ता.बोदवड येथे हिंदूसूर्य, वीर शिरोमणी  #महाराणा_प्रताप यांच्या जयंतीनिम...
30/05/2026

२९ मे २०२६ | एणगाव ता.बोदवड
'मतदारसंघातील #एणगाव,ता.बोदवड येथे हिंदूसूर्य, वीर शिरोमणी #महाराणा_प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य शोभायात्रा व जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.

'या प्रसंगी माझा मुलगा हर्षराज पाटील उपस्थित राहून हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.स्वाभिमान,शौर्य,पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांचे विचार आजही युवकांना प्रेरणा देणारे आहेत.

'एणगाव ग्रामस्थांच्या व समाज बांधवांच्या सहभागातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महाराणा प्रताप यांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करत त्यांच्या आदर्शांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी समाज बांधव, गावकरी मंडळी, मित्रपरिवार तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी अखंड संघर्ष करणारे शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचे प्रेरणास्थान हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! 🙏🚩

#हिंदूसूर्यमहाराणाप्रताप #शौर्य #स्वाभिमान #बोदवड

कर्तव्यपूर्तीचा गौरव,सेवाभावाला सलाम!💐'आज  #मुक्ताईनगर एस.टी.बस आगार(डेपो) येथे आयोजित सेवानिवृत्ती सत्कार समारंभास उपस्...
30/05/2026

कर्तव्यपूर्तीचा गौरव,सेवाभावाला सलाम!💐
'आज #मुक्ताईनगर एस.टी.बस आगार(डेपो) येथे आयोजित सेवानिवृत्ती सत्कार समारंभास उपस्थित राहून एस.टी. महामंडळाच्या सेवेत अनेक वर्षे प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

'प्रवाशांची सुरक्षितता,वेळेचे भान आणि जनसेवेची भावना जपत आपल्या कर्तव्याचे उत्कृष्टपणे पालन करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवाकाळात एस.टी.महामंडळाच्या कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या समर्पित सेवेला मनःपूर्वक सलाम!

सेवानिवृत्त कर्मचारी : श्री.सुरेश पांडुरंग नायसे (टी.सी.),श्री.बाबुराव विष्णू महाले (चालक),श्री.असलम खान बिस्मिल्ला खान (चालक),श्री.सुनील पंडित राणे (चालक),श्री.तुकाराम बुधा सपकाळे (वाहक)

त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाने भरलेले जावो, हीच सदिच्छा!

MuktainagarVidhansabha जनसेवा एसटीमहामंडळ सेवानिवृत्ती_सत्कार

‘आज मतदारसंघातील  #मुक्ताईनगर येथे श्री.विनोद लक्ष्मण बोदडे यांची सुकन्या चि.सौं.का.पुनम यांच्या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी...
29/05/2026

‘आज मतदारसंघातील #मुक्ताईनगर येथे श्री.विनोद लक्ष्मण बोदडे यांची सुकन्या चि.सौं.का.पुनम यांच्या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी माझा मुलगा हर्षराज पाटील व सहकारी उपस्थित राहून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

'त्यांचे वैवाहिक जीवन सुख,समाधान आणि समृद्धीने नांदो,हीच मंगलकामना! 💫💐

#विवाह #मुक्ताईनगर_मतदारसंघ

'महान क्रांतिकारक, #स्वातंत्र्यवीर_सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!
28/05/2026

'महान क्रांतिकारक, #स्वातंत्र्यवीर_सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!

 #बकरी_ईद(ईद-उल-अजहा) निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #ईदमुबारक
28/05/2026

#बकरी_ईद(ईद-उल-अजहा) निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा !

#ईदमुबारक

महामानवाची सावली,त्यागमुर्ती...!'माता रमाई यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...! #रमाई  #रमाबाई_आंबेडकर
27/05/2026

महामानवाची सावली,त्यागमुर्ती...!
'माता रमाई यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!

#रमाई #रमाबाई_आंबेडकर

Address

Near ICICI Bank, Bhusawal Road,
Jalgaon
425306

Telephone

+919970811555

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandrakant N Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chandrakant N Patil:

Share