21/11/2025
सर्वांना जय भिम!🙏🏼
खूप वर्षानंतर मी फेसबुक द्वारे आपल्याशी सपंर्क साधत आहे. मधल्या काही वर्षात मी माझा संपूर्ण वेळ हा पीचडी रिसर्च चे Dissertation / Thesis लिहण्यासाठी आणि लिखाण शिकण्यासाठी घालविला. त्यामुळे मी निदान आपले लिखाण पूर्ण करून माझ्या मा. गाईड कडे संपूर्द केले आहे.
यामधून थोडीशी फुर्सत मिळत नाही. तोच नवीन संघर्षाला सुरुवात झालेली आहे. बाबुलाल वर्मा, ओमकार बिल्डर, SRA आणि जी साऊथ वॉर्ड यांच्या प्रशासनाशी आजीच्या झोपद्याबाबत चुकीच्या पद्धतीने आणि सर्व नियम धाब्यावर बसवून आमची झोपडी बुलडोझर लावून तोडण्याची भाषा करीत आहे.
याबाबत माझी ऍड. पत्नी ही कायदेशीर अभ्यास करून भ्रष्ट आतंकवादी असेलेला बिल्डर आणि प्रशासन यांना कायदेशीर मार्गाने उत्तर देत आहे. हा भाग वरळी मतदारसंघामध्ये मोडत आहे. आणि मराठीचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखा जातो. परंतु येथेच मराठी माणसांना हाकले जात आहे आणि त्यांचा गळा आवळण्याचे काम हे मराठी नेते, प्रशासकीय अधिकारी हे परप्रांतीय बाबुलाल वर्मा यांच्या माध्यमातून करीत आहेत.
माझ्या पत्नी कडून कायदेशीरपणे आणि नियमात असलेली रजिस्टर अग्रीमेंट, बिल्डिंग प्लॅन, मॅप, रेरा मधील नोंदणी आणि प्रशासकीय NOC यांची मागणी केली आहे. परंतु बिल्डर आणि त्यांची माणसे गणेशन केशवन आणि सिंग यांच्याकडून आमची लाईट बंद करणे, नाल्यामध्ये आणि येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यात डेब्रिज टाकून बाथरूम मधील पाणी जाण्याचा मार्ग, येण्याजाण्याचा मार्ग बंद करणे अशा प्रकारे मानसिक त्रास दिला जात आहे.
याबाबत खालील लिंक आणि फोटोस तसेच विडिओ आपल्या माहितीसाठी सोबत जोडत आहे.
https://www.instagram.com/reel/DPoRfsKjBrN/?igsh=M2VncDdrczQ1NnNv
https://www.instagram.com/reel/DPbrUokD9VN/?igsh=MXZreXMzMGJnbWlnYw==
https://www.instagram.com/reel/DPyma6kjGSP/?igsh=ZGRqcG5vdHdva3Bu
https://www.instagram.com/reel/DQ4R-0VDOQB/?igsh=NmJhN2gzeWF2dzBh