महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना - Maharashtra Rajya Shikshak Sena

  • Home
  • India
  • Mumbai
  • महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना - Maharashtra Rajya Shikshak Sena

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना - Maharashtra Rajya Shikshak Sena Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना - Maharashtra Rajya Shikshak Sena, Political Party, Adarsh Vidyalaya (Balwadi), Siddharth Nagar, Besides Prabodhan Sports Complex, Goregaon West, Mumbai.

Official Page of महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ✅
A dedicated organization working for the welfare, rights, and professional development of teachers across Maharashtra.

16/06/2026
*कर्तव्यनिष्ठेचा 'शतप्रतिशत' पॅटर्न: आमदार ज. मो. अभ्यंकर यांचे आदर्श कार्य*महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेने नुकतीच ...
02/06/2026

*कर्तव्यनिष्ठेचा 'शतप्रतिशत' पॅटर्न: आमदार ज. मो. अभ्यंकर यांचे आदर्श कार्य*

महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेने नुकतीच सभागृहातील १०० टक्के उपस्थिती असलेल्या आमदारांची यादी जाहीर केली असून, यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष तथा शिक्षक आमदार मा. ज. मो. अभ्यंकर यांचे नाव अत्यंत अभिमानाने समोर आले आहे. मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक आणि विद्यार्थियोंसाठी ही नक्कीच सर्वोच्च गौरवाची बाब आहे.
आमदार अभ्यंकर सरांसोबत काम करणाऱ्या व्यक्तींना मात्र त्यांच्या या कामगिरीचे विशेष आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण प्रशासकीय सेवेत कार्यरत असतानापासूनच त्यांनी नेहमीच कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. दिवाळी, दसरा किंवा इतर कोणताही सण असो, कार्यालयातील त्यांची उपस्थिती कायम जाणवत असे.
सुट्टीच्या दिवशीसुद्धा घरी न थांबता महत्त्वाच्या फाईल्सचा सखोल अभ्यास करणे, त्यावर तातडीने निर्णय घेणे आणि सर्वसामान्य लोकांची कामे मार्गी लावणे ही त्यांची मूळ कार्यपद्धती राहिली आहे. यामुळेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर नेहमीच गाढा विश्वास आणि विशेष स्नेह राहिला आहे.
आज आमदार म्हणून लोकप्रतिनिधीत्वाची जबाबदारी अंगावर आल्यानंतरही त्यांच्या या कार्यपद्धतीत किंचितही बदल झालेला नाही. विधान परिषदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अनेक महिने आधीपासूनच ते सभागृहातील प्रश्नांची पूर्वतयारी करत असतात.
आवश्यक कागदपत्रांचा अभ्यास, माहितीचे संकलन आणि विषयाचा सूक्ष्म विचार करूनच ते सभागृहात प्रश्न मांडतात. त्यांच्या भाषणात नेहमीच अभ्यासपूर्ण मांडणी, नेमकेपणा आणि विषयाची सखोल जाण दिसून येते. अनाठायी गदारोळ करणे किंवा केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी अवास्तव विधाने करणे हे त्यांच्या स्वभावात कधीच बसत नाही.
त्यामुळेच संपूर्ण शासकीय प्रशासनामध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदराची भावना आहे. विधान परिषदेत शिक्षक आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आजपर्यंत एकही दिवस सभागृहातून अनुपस्थित राहणे पसंत केले नाही. "हा माझा विषय नाही" असे म्हणून सभागृहाबाहेर जाण्याची वृत्ती त्यांच्यात कधीच दिसली नाही. शिक्षक, शिक्षण आणि समाजहिताशी संबंधित प्रत्येक विषयात ते तितक्याच जबाबदारीने आणि ताकदीने सहभागी होताना दिसतात.
त्यांच्या याच अभ्यासू वृत्तीचा आदर करून शासनाने विविध महत्त्वाच्या समित्यांवर त्यांची नियुक्ती केली आहे. सध्या ते अल्पसंख्याक कल्याण समिती, अनुसूचित जाती कल्याण समिती, मराठी भाषा समिती, उपविधी समिती आणि धर्मादाय रुग्णालय चौकशी समिती अशा अनेक महत्त्वाच्या समित्यांवर सक्रियपणे कार्यरत आहेत.
विशेष म्हणजे, केवळ मुख्य सभागृहातच नव्हे, तर या सर्व समित्यांच्या बैठकींनाही त्यांची शंभर टक्के उपस्थिती असते. प्रत्येक बैठकीसाठी सखोल तयारी करूनच ते उपस्थित राहतात आणि आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा उपयोग समाजहितासाठी प्रभावीपणे करतात.
आमदार अभ्यंकर यांची कार्यनिष्ठा केवळ विधान परिषद किंवा समित्यांच्या बैठकांपुरतीच मर्यादित नाही, तर त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमात शाळा भेटी, शिक्षकांच्या सातत्याने होणाऱ्या बैठका, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा आणि शिक्षकांच्या समस्यांचे जागीच निराकरण यांचा समावेश असतो.
वेळेचे काटेकोर पालन, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आणि कामाचा अंतिम टप्प्यापर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा हीच त्यांची मुख्य ओळख बनली आहे. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत त्यांची संवेदनशीलता विशेष उल्लेखनीय आहे.
एखादा शिक्षक आपली समस्या घेऊन आल्यावर संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधणे, आवश्यक ते मार्गदर्शन करणे आणि प्रश्न सुटेपर्यंत त्याचा पिच्छा न सोडणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. दर महिन्याला शिक्षणाधिकारी कार्यालय आणि उपसंचालक कार्यालय येथे स्वतः जाऊन शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचा त्यांनी जणू दिनक्रमच बनवला आहे.
त्यांच्या याच आक्रमक व अभ्यासू नेतृत्वाखाली आजवर अनेक शिक्षकांना न्याय मिळाला आहे. हजारो शिक्षकांचे प्रलंबित शालार्थ आयडी मिळवून देणे, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन मुंबईतच व्हावे यासाठी शासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडणे, तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवडश्रेणी शिक्षकांना वेळेत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे अशी अनेक उल्लेखनीय कामे त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत.
आज विधान परिषदेमध्ये त्यांनी दाखविलेली १०० टक्के उपस्थिती ही केवळ एक आकडेवारी नाही; तर ती त्यांच्या प्रामाणिकपणाची, कर्तव्यनिष्ठेची आणि शिक्षकांप्रती असलेल्या बांधिलकीची जिवंत साक्ष आहे. अशा अभ्यासू, तत्त्वनिष्ठ, कार्यक्षम आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळे आज मुंबईतील तमाम शिक्षक वर्गाला त्यांचा सार्थ अभिमान वाटत आहे.
मुंबईतील शिक्षकांनी निवडणुकीच्या वेळी त्यांच्यावर दाखविलेला विश्वास आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरताना दिसत आहे. शिक्षक, संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांना न्याय देणारे, शिक्षण क्षेत्राच्या प्रश्नांवर सातत्याने रस्त्यावर आणि सभागृहात लढणारे आणि कामालाच ईश्वर मानणारे असे लोकप्रतिनिधी समाजात विरळाच असतात.
आमदार मा. ज. मो. अभ्यंकर यांनी सभागृहात दाखविलेल्या या ऐतिहासिक शंभर टक्के उपस्थितीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि अशा प्रामाणिक, कर्तृत्ववान नेतृत्वाला विधान परिषदेत पाठविणाऱ्या मुंबईतील सर्व शिक्षकांचेही मनःपूर्वक आभार!
जालिंदर देवराम सरोदे
(कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना)

15/04/2026

उमरा/वसंत सिरसाट राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शिक्षण विभागाकडून सातत्याने होत असलेल्या .....

*​शिक्षण विभागाच्या उदासीनतेविरुद्ध राज्यभर रणशिंग; १६ एप्रिलला ' महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने'चे विराट आंदोलन!**​प्रशास...
13/04/2026

*​शिक्षण विभागाच्या उदासीनतेविरुद्ध राज्यभर रणशिंग; १६ एप्रिलला ' महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने'चे विराट आंदोलन!*

*​प्रशासनाच्या 'असंवेदनशील' कारभाराचा निषेध; रखडलेले वेतन, आणि थकित देयकांवरून शिक्षक आक्रमक*

राज्यातील शिक्षण विभागातील प्रलंबित समस्या आणि प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या 'महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने'ने आता थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी येत्या १६ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी दिला आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांना निवेदन धाडण्यात आले आहे.
*​प्रशासनाच्या 'अक्षम्य' विलंबाने शिक्षक संकटात*
​शिक्षण विभागाच्या विसंगत निर्णयांमुळे राज्यातील हजारो शिक्षक आर्थिक आणि मानसिक दडपणाखाली आहेत. प्रशासनाच्या असंवेदनशीलतेमुळे शिक्षकांचे कंबरडे मोडले असून, वारंवार विनंती करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
*​आंदोलनाचे प्रमुख मुद्दे आणि मागण्या:*

*​अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व वेतन:*
तर्कहीन निकषांमुळे शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांचे वेतन थांबवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
*​थकित देयकांचा डोंगर:*
गेल्या २ ते ६ वर्षांपासून शिक्षकांची हक्काची देयके थकली आहेत. निधी उपलब्ध असूनही अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे कोट्यवधींचा निधी व्यपगत (Lapse) झाला असून, १५ एप्रिलपासून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
*​बी.एल.ओ. कामातून मुक्ती:*
सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून शिक्षकांना सक्तीने निवडणुकीच्या कामात (BLO) जुंपले जात आहे. हे अशैक्षणिक काम तातडीने थांबवण्याची मागणी पत्रात केली आहे.
*​मार्च महिन्याचे वेतन अद्याप रखडलेले:*
एप्रिल महिना अर्धा संपला तरी मार्चचे वेतन अद्याप मिळालेले नाही. यामुळे शिक्षकांचे कर्जाचे हप्ते थकले असून त्यांना नाहक दंड सोसावा लागत आहे. '१ तारखेला पगार' ही परंपरा कायम राखण्याची आठवण संघटनेने करून दिली आहे.
*​परीक्षा काळात पटपडताळणी नको:*
१० वी, ११ वी आणि १२ वीच्या परीक्षा आणि निकालाच्या धामधुमीत 'पटपडताळणी'चा घाट घातला जात आहे, जो शिक्षकांना नाहक त्रास देणारा आहे. हा कार्यक्रम सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान घेण्याची मागणी केली आहे.
*​"आता सहन करणार नाही!"*
​"प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे शिक्षकांचा आक्रोश शिगेला पोहोचला आहे. जर हे प्रश्न तातडीने सुटले नाहीत, तर १६ एप्रिलचे आंदोलन हे केवळ सुरुवात असेल. शिक्षकांच्या हक्कासाठी आम्ही संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहोत."
*आमदार— ज. मो. अभ्यंकर ( अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना)*

03/04/2026

मुंबई, दि. १ एप्रिल २०२६महाराष्ट्र विधान परिषद सदस्य तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यां...
01/04/2026

मुंबई, दि. १ एप्रिल २०२६
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकांच्या मंजुरीमध्ये होत असलेल्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी शिक्षण विभागाकडे या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.
अभ्यंकर यांनी शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, कार्यालयाकडून सुमारे ६७० देयके नाकारण्यात आली असून १०१९ देयके प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. तसेच शि क्षण निरीक्षक स्तरावर १५२ देयके आणि वेतन क्रेडिट व DDO-२ कडील २७८ देयकेही प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रक्रियेत प्रशासनाकडून अकार्यक्षमता आणि कर्मचाऱ्यांविषयी असंवेदनशीलता दिसून येत असल्याचा आरोप अभ्यंकर यांनी केला आहे. संबंधित प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, या विषयावर प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी ते १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता संबंधित कार्यालयात भेट देणार असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या देयकांबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
दरम्यान, या प्रकरणामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

Address

Adarsh Vidyalaya (Balwadi), Siddharth Nagar, Besides Prabodhan Sports Complex, Goregaon West
Mumbai
400104

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना - Maharashtra Rajya Shikshak Sena posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share