12/04/2023
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर आणि मुंबई अर्थशास्त्र सार्वजनिक धोरण संस्था, मुंबई विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्था व लाभधारक शेतकरी यांचेसाठी " पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण " या विषयावर दिनांक २४/०३/२०२३ रोजी तसेच वनामती नागपूर येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेत मजनिप्रा अध्यक्ष मा. डॉ. संजय चहांदे, मजनिप्रा सदस्य मा. श्री. संजय कुलकर्णी (जसवि) मा. डॉ.साधना महाशब्दे (विधी) व मा. श्रीमती श्वेताली ठाकरे (अर्थ) यांनी उपस्थित शेतकरी व अधिकारी यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेस पाणी वापर संस्था तसेच लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेती व पाणी वापर संस्थांशी संबंधीत खालील महत्वाच्या विषयांवर तज्ञांनी शेतक-यांचे प्रबोधन केले.
१. सिंचन व्यवस्थापनातील लोक सहभाग व NGO ची भूमिका,
२. शेतातील नाविन्यपूर्ण प्रयोग, पिक बदल उत्पादन खर्च व उत्पन्न
३. शेतकरी अनुभव कथन
४. पाणी वापर संस्थांचे लेखा परिक्षण व रेकॉर्ड ठेवणे.