कुणबी युवा , तळा

कुणबी युवा , तळा सुशिक्षित, प्रगतशिल आणि सुसंस्कृत समाज घडवुया ....।।
चला जगण्याची दिशा बदलुया....।।
गावविकासचळवळ

🌾निबंध वक्तृत्व चित्रकला स्पर्धाचे भव्य आयोजन 🌾कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई सलग्न कुणबी युवा मुंबई आयोजित📚 राजर्षी शाहू म...
23/07/2026

🌾निबंध वक्तृत्व चित्रकला स्पर्धाचे भव्य आयोजन 🌾

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई सलग्न कुणबी युवा मुंबई आयोजित

📚 राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.📚

समाज परिवर्तनाचे शिल्पकार, शिक्षणाचे प्रसारक आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवा पिढीमध्ये त्यांचे विचार व कार्य पोहोचविण्याच्या उद्देशाने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

👥 स्पर्धकांची वयोमर्यादा:
• निबंध व वक्तृत्व स्पर्धा – १५ ते २१ वर्षे.

📝 निबंध स्पर्धा.
• निबंध स्वलिखित असावा.
• शब्द मर्यादा – कमाल १००० शब्द.
• निबंध A4 आकाराच्या कागदावर स्पष्ट व सुवाच्य हस्ताक्षरात लिहावा.
• निबंध PDF स्वरूपात दिनांक १८ जुलै पर्यंत खालील WhatsApp वर पाठवावा.

📧 WhatsApp नंबर :*
86930 81745

• निबंधाचे परीक्षण विषयाची मांडणी, विचारांची स्पष्टता, भाषाशैली, सर्जनशीलता व ऐतिहासिक माहितीच्या अचूकतेच्या आधारे करण्यात येईल.

🎙️ वक्तृत्व स्पर्धा.
📅 दिनांक: २६ जुलै.
⏰ वेळ: सकाळी ११:०० वाजता
ठिकाण: कुणबी ज्ञाती गृह, वाघे हॉल, परळ (पुर्व), मुंबई.

🎨 चित्रकला स्पर्धा

विषय - राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित...!!!
📅 दिनांक:२६ जुलै
⏰ वेळ: सकाळी ११:०० वाजता
ठिकाण: कुणबी ज्ञाती गृह, वाघे हॉल, परळ (पुर्व)
👦 लहान गट – इयत्ता १ ली ते ४ थी
👧 मोठा गट – इयत्ता ५ वी ते ८ वी

📌 निबंध व वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय :

१) राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि आजची युवा पिढी
२) राजर्षी शाहू महाराज : सामाजिक न्यायाचे प्रणेते
३) लोककल्याणकारी राजा : राजर्षी शाहू महाराज

📝 स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील गूगल फॉर्मद्वारे आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.

🔗 नोंदणी लिंक :
https://forms.gle/6XgxLSZeQ6wXFLPE6

🏆पहिला दुसरा तिसरा जिंकणाऱ्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

राजर्षी शाहू महाराजांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्व पात्र स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.

📞 संपर्क :
बारकू बेंडल सर : 7021520080
शशांक रांगळे सर: 8450986492
शैलेश दळवी सर: 8850855117
पंकज पालकर सर 9221314272

🙏 धन्यवाद🙏

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई
कुणबी युवा मुंबई
प्रचार प्रसार विभाग

22/07/2026

🌧️ पावसाचा आनंद घ्या... पण सुरक्षिततेला प्राधान्य द्या! ⛰️
पावसाळ्यात ट्रेकिंग, धबधबे, नद्या आणि डोंगर परिसरात साहस करताना विशेष काळजी घ्या.
⚠️ दुर्गम व अनोळखी ठिकाणी ट्रेकिंग टाळा.
⚠️ धबधबे, नद्या व ओढ्यांच्या पाण्यात उतरणे टाळा.
⚠️ हवामानाचा अंदाज व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
⚠️ जीव धोक्यात घालणारे साहसी प्रकार टाळा.
🌿 निसर्गाचा आनंद घ्या... पण सुरक्षित राहा!
आपत्कालीन मदतीसाठी : 📞 डायल 112
fans Maharashtra Police Headquarter Maharashtra DGIPR District Information Office, Raigad CMOMaharashtra Doordarshan National (DD1) DDSahyadri Loksatta Collector Raigad

22/07/2026
शिक्षण व्यवस्थेचा भोंगळ कारभार. देशात NEET सहित विविध परीक्षा पेपर फुटी ने व्यवस्था पोखरून काढली आहे.NEET पेपर फुटी ची व...
22/07/2026

शिक्षण व्यवस्थेचा भोंगळ कारभार. देशात NEET सहित विविध परीक्षा पेपर फुटी ने व्यवस्था पोखरून काढली आहे.

NEET पेपर फुटी ची व यात मृत्यू पडलेल्या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर जंतर मंतर येथे केंद्र सरकारच्या आदेशामुळे करण्यात आलेल्या हल्ल्याचा समस्त तळा तालुका कुणबी समाजमार्फत जाहीर निषेध.

बाजारातील बोगस दूध बाहेर काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर मिळेल याची मला खात्री आहे. - तुकाराम मुंढे (आयुक्त -...
14/06/2026

बाजारातील बोगस दूध बाहेर काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर मिळेल याची मला खात्री आहे. - तुकाराम मुंढे (आयुक्त - अन्न व औषध प्रशासन)

📖 चला संविधान समजून घेऊ... आपल्या मौलिक अधिकारांची जाणीव करून घेऊ! 🇮🇳स्वतःसाठी, समाजासाठी आणि देशासाठी भारतीय संविधानाती...
13/06/2026

📖 चला संविधान समजून घेऊ... आपल्या मौलिक अधिकारांची जाणीव करून घेऊ! 🇮🇳

स्वतःसाठी, समाजासाठी आणि देशासाठी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये व महत्त्वाच्या कलमांची माहिती प्रत्येक नागरिकाला असणे आवश्यक आहे. संविधान जागरूकतेसाठी आयोजित या विशेष प्रशिक्षण शिबिरास आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.

🚩 संविधान जागर अभियान 🚩

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई
कुणबी युवा मुंबई – प्रचार प्रसार विभाग

✨ सामाजिक प्रशिक्षण शिबिर अंतर्गत ✨

📚 संविधान जागर अभियान

📅 दिनांक: १४ जून २०२६ (रविवार)
⏰ वेळ: दुपारी ३.०० ते सायं. ७.०० वाजेपर्यंत

🎤 संविधान प्रशिक्षक:
ॲड. निलेश खानविलकर सर
(संविधान प्रचारक व अभ्यासक)

📍 स्थळ:
कुणबी ज्ञातीगृह (वाघे हॉल)
सेंट झेवियर्स रोड, परळ (पूर्व), मुंबई

संविधान जाणून घेणे म्हणजे आपल्या हक्कांची, कर्तव्यांची आणि लोकशाहीची खरी ओळख करून घेणे होय.

आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा.

जय संविधान • जय भारत 🇮🇳

कुणबी युवा मुंबई
प्रचार प्रसार विभाग

तळा तालुका कुणबी गौरव चषक २०२६
18/04/2026

तळा तालुका कुणबी गौरव चषक २०२६

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईशाखा तालुका तळा संलग्न कुणबी युवा तळा      आयोजिततळा तालुका कुणबी गौरव चषक २०२६📅 शनिवार, १८ ए...
17/04/2026

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई
शाखा तालुका तळा संलग्न कुणबी युवा तळा
आयोजित
तळा तालुका कुणबी गौरव चषक २०२६

📅 शनिवार, १८ एप्रिल २०२६
📅 रविवार, १९ एप्रिल २०२६
📍 स्थळ: गुरुद्वार मैदान, सानपाडा, नवी मुंबई

सर्व समाज बांधवांचे आणि खेळाडूंचे हार्दिक स्वागत आहे..! 💐

Address

कुणबी ज्ञातीगृह, वाघे हॉल, सेंट झेवीअर्स रोड, परेल
Mumbai
400012

Alerts

Be the first to know and let us send you an email when कुणबी युवा , तळा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category