29/05/2026
विक्रांत आचरेकर फाउंडेशन आयोजित आंबा महोत्सवामध्ये या आजोबांनी सुंदर असा पुस्तकांचा स्टॉल लावला होता.
गेली ७५ वर्षे ते महाराष्ट्रातील १००० हून अधिक किल्ल्यांचा अभ्यास करत आहेत. त्यापैकी १०० किल्ल्यांवर त्यांनी पुस्तकेही लिहिली आहेत.
आपल्या आंबा महोत्सवामध्ये त्यांच्या स्टॉलला खूप छान प्रतिसाद मिळाला. उपस्थितांनी त्यांनी लिहिलेली पुस्तके आवर्जून खरेदी केली आणि त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून खूप आनंद वाटला.