02/02/2025
१७८-धारावी विधानसभा मतदारसंघातर्फे राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून धारावी मद्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शालेय विद्यार्थी व धारावी निवडणूक कर्मचारी वर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभात फेरी,तसेच शालेय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन व विधानसभेतील उत्कृष्ट काम करणाऱ्या निवडणूक कर्मचारी वर्गाचा यावेळी मतदान नोंदणी अधिकारी श्री. अजित नैराळे यांच्या हस्ते करण्यात आला. मा. श्री. राजेश बोरसे -सहाय्यक अभियंता व सौ. स्नेहलता डुंबरे - प्रशासकीय अधिकारी (शाळा ) या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सदर प्रसंगी श्री. राजेंद्र तायडे व आयोजक श्री. अरुण खरात उपस्थित होते