28/03/2024
*अरविंद केजरीवाल आणि कंपनी*
*भारताचे सार्वभौमत्व संपवण्यासाठी राजकारणात प्लांट केलेली माणसे*
अरविंद केजरीवाल दिल्लीचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. आज भारतात या माणसाला ओळखत नाही असा कोणीही नसेल. पण मला आपल्याला २००६ या काळात घेऊन जायचे आहे.
आपल्यापैकी किती जणांनी अरविंद केजरीवाल हे नाव २००६ साली ऐकलं होतं? कोणीच नसेल, मला तरी अजिबात माहीत नव्हते. पण या माणसाला २००६ साली *रोमन मॅगसेसे अवॉर्ड* होता. आता आपण म्हणाल की असे किती तरी समाजसेवक आपल्याला माहीत पण नसतात, पण त्यांना अवॉर्ड मिळाल्यावर ते आपल्याला समजतात. पण हा रोमन मॅगसेसे अवॉर्ड या केजरीवालला कशासाठी मिळाला हे तुम्हाला माहिताय का? आता हे जेव्हा तुम्हाला समजेल तेंव्हा तुमच्या पायाखालची जमीन पहिल्यांदा सरकेल.
या केजरीवालला अवॉर्ड *Emerging Leadership in india* या साठी मिळाला होता. लागला का पहिला शॉक? ज्या माणसाला आपण ओळखत पण नाही त्याला लिडरशीपसाठी आशियाचे नोबेल समजले जाणारे अवॉर्ड कसे मिळाले? इथूनच या कहाणीची सुरुवात होते.
*सर्वप्रथम हा रेमन मॅगसेसे अवॉर्ड काय आहे? तो कोणाला दिला जातो ? यात अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयए चा संबंध काय हे तुम्हाला खालच्या लिंकमध्ये समजेल.*
https://www.opindia.com/2019/08/ramon-magsaysay-award-established-by-two-cia-linked-american-organisations-in-memory-of-a-cia-groomed-philippines-president/
त्यातला एक परिच्छेद खालील प्रमाणे
President Magsaysay died in a plane crash in 1957, and the Ramon Magsaysay Award was established in his memory. It may be noted that the award was constituted by New York-based Rockefeller Brothers Fund. In 2000, Ramon Magsaysay Emergent Leadership Award was established by Ford Foundation, another American organisation. Both these organisations are known for working for American interests in foreign countries, and have a history of closely working with the CIA. In fact, the Ford Foundation is alleged to be a philanthropic facade of the Central Intelligence Agency.
आता आपण परत येऊ या केजरीवालवर. केजरीवाल आणि सिसोदिया यांची कबीर नावाची एक एनजीओ होती ज्याला याच फोर्ड फाउंडेशनने प्रचंड पैसा पुरवला. अशाच अनेक एनजीओचे त्यावेळचे मालक आठवा, काही नावं मी सांगतो ज्यांना ह्या फोर्ड फाउंडेशनने पैसे दिले. तिस्ता सेटलवाड, योगेंद्र यादव, मीरा सान्याल, मल्लिका साराभाई, अमर्त्य सेन, मेधा पाटकर, या सगळ्यांना फोर्ड फाउंडेशनने लाखो करोडो डॉलर्सची मदत केली आणि यातील काहींना मॅगसेसे अवॉर्ड पण मिळाले आहेत. या बद्दलची एक लिंक खाली देत आहे, ती पण नक्की बघा
https://m.facebook.com/notes/surajit-dasgupta/the-cia-ford-ngo-congress-nac-aap-nexus/10152395314509630/
आता २००६ ला अमेरिकेला भारत अशांत करण्यात काय फायदा होता, तर तेव्हा भारत परत एकदा द्विपक्षीय राजनीतिकडे चालला होता. भाजप हरली तरी काँग्रेस जिंकली होती आणि सत्तेचा खेळ या दोन राष्ट्रीय पक्षात खेळला जाऊ लागला होता. दोन्ही पक्षांची आर्थिक धोरणे जवळपास सारखीच होती आणि त्यामुळे भारत झपाट्याने विकसित होऊ लागला होता. त्या काळात १०℅ जीडीपी ग्रोथ आपल्या आवाक्यात आली होती. भारत पाकिस्तान संबंध चांगले होऊ लागले होते. त्यामुळेच अमेरिकेच्या पोटात दुखणे सहाजिकच होते. म्हणूनच ही वर दिलेली फौज पैसे देऊन बनवली गेली आणि त्या फौजेचा म्होरक्या बनवला *अण्णा हजारे*
आता येऊ अण्णा आंदोलनावर. अण्णा हजारे असाच एक एनजीओवाला. ज्याला महाराष्ट्रा बाहेर कोणी ओळखत नव्हते तो उपोषणाला काय बसतो, स्टेजवर हे सगळे फोर्ड फाउंडेशनचे पोसलेले कावळे अवतरतात, मीडियाला अमाप पैसा वाटला जातो आणि २८ न्यूज चॅनल त्या अण्णा आंदोलनाचे लाईव्ह प्रक्षेपण १५ दिवस करतात. कोणाच्याच मनात शंकेची पाल कशी चुकचुकली नाही? अण्णा देशाचा नेता बनलाच कसा ज्याला त्याच्या महाराष्ट्रात कोणी विचारत नव्हते. केजरीवाल, सिसोदिया, किरण बेदी, प्रशांत भूषण आणि त्याचा बाप डायरेक्ट स्टेजवर पोचलेच कसे? केंद्र सरकारने यांना लोकपाल कायदा बनवताना बोलावलेच कसे? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. पण या सर्व प्रकारामुळे केंद्रातील तेव्हाचे सरकार अस्थिर झाले आणि भ्रष्टाचार प्रचंड वाढला.
या अण्णा आंदोलनवाल्यांनी परदेशातून आणि इथे आंदोलनाला जमणाऱ्या लोकांकडून जे पैसे जमा केले, त्या पैशावरून अण्णा आणि केजरीवाल यांच्यात भांडणे झाली. पैसे अण्णांच्या नावावर जमा केले होते म्हणून अण्णांनी १२५ कोटी केजरीवालकडे मागितले आणि ह्या मिटिंगचे किरण बेदीच्या घरी व्हिडीओ रेकॉर्डिंग (स्टिंग ऑपरेशन) करून अण्णांना ब्लॅकमेल केले गेले. याची लिंक
https://dai.ly/x55vwwi
आता अण्णांचा पत्ता कट होता. अ टिपिकल युझ अँड थ्रो केस. आजची अण्णांची परिस्थिती काय आहे? त्यांनी कितीही घासले तरी ते पुन्हा आंदोलन करू शकत नाहीत, त्यांना जनता आणि मीडिया कोणीही किंमत देत नाहीत.
अरविंदचे सहकारी प्रशांत भूषण याचे काश्मीरबद्दल विधान आठवा, आठवत नसेल तर ही लिंक बघा
https://youtu.be/ffzQIQh0plI
काश्मीरबद्दल कोणत्याही काँग्रेसीने पण असे विधान केलेले नाही. अफझल गुरूला फाशी पासून वाचवायला रात्री सुप्रीम कोर्ट उघडायला लावणारा पण हाच प्रशांत भूषण होता.
आता येणारा जो पैसा आहे त्याचा मुख्य स्रोत हा खलिस्तान चळवळीच्या लोकांकडून आहे. याबद्दल आलेली बातमी
https://www.financialexpress.com/india-news/bjp-congress-attack-arvind-kejriwal-after-sting-operation-claims-pro-khalistan-front-funded-aap-during-punjab-elections/1338269/
यावर झालेले स्टिंग ऑपरेशन
https://www.republicworld.com/india-news/general-news/watch-after-stung-khalistan-terror-support-group-talks-about-aap-funding-manish-sisodia-abuses-republic-tv-on-being-asked-a-question.html
आणि सर्वात महत्वाचे की अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया जेव्हा परदेशात फंड गोळा करायला गेलेत तेव्हा ते खलिस्तान चळवळीच्या लोकांच्या घरात राहिले आहेत.
ही त्याची लिंक
https://www.indiatoday.in/assembly-elections-2017/punjab-assembly-election-2017/story/punjab-polls-arvind-kejriwal-khalistani-terrorist-house-957933-2017-01-30
आज याच खलिस्तानी आणि मिशनरीच्या पाठिंब्यावर आप पार्टी पंजाब आणि गोव्यात पसरली आहे. आता आपण म्हणाल की, आता मिशनरी यात कुठून आली? तर फोर्ड फाउंडेशन, मिशनरी ते मॅगसेसे अवॉर्डपर्यंत सर्वजण अण्णा आंदोलनात कसे सामील होते याचे आणखी प्रूफ देतो.
जेव्हा मदर तेरेसाना सेंटहुड हा सन्मान दिला गेला, तेव्हा भारताच्या परराष्ट्रमंत्री म्हणून सुषमा स्वराज उपस्थित होत्या. पण तिथे बोलावले गेलेल्यांमध्ये बंगालचा मुख्यमंत्री आणि केजरीवाल होता. त्याची लिंक
https://www.indiatoday.in/india/story/arvind-kejriwal-to-attend-mother-teresa-sainthood-ceremony-in-vatican-331578-2016-07-27
पंजाबमध्ये जेव्हा हे प्रचार करत होते तेव्हा त्यांच्या सुखबिर सिंग खैराने उघडपणे रेफ़्रेंडम २०२० या खलिस्तानी अजेंड्याला सपोर्ट केला होता. त्याची लिंक
https://m.hindustantimes.com/punjab/khaira-s-support-to-referendum-2020-lands-aap-in-a-mess-again/story-sl1HWuXFwxeJDEIhR6xkWM.html
आता सर्वात शेवटचे आणि सर्वात भयानक. आपल्याला आठवत असेल तर अण्णाला उपोषणाला बसवून हे सर्व चोर रोज सरकारने बनवलेल्या लोकपाल कमिटीमध्ये मिटिंगला जायचे आणि काही तरी खुसपट काढून मिटिंग फेल व्हायची. तेव्हा यांना मार्ग निघणे अभिप्रेत नव्हतेच, तेव्हा त्यांना फक्त हा विषय मोठा करून देशात आग लावायची होती. आणि त्यासाठी त्यांनी अनेक मौलवींना हाताशी धरून दिल्लीत इजिप्तच्या तेहरीर स्क्वेअर सारखे आंदोलन करून भारतात क्रांती आणायची होती आणि हे आहे त्याचे प्रूफ
https://youtu.be/qf-MvrrEQP8
आता तुम्हीच ठरवा हा केजरीवाल देशप्रेमी आहे, देशद्रोही आहे, का कोण आहे.
*समीर गोरे*
CIA had groomed and helped Ramon Magsaysay to become president of Philippines, to defeat communism | OpIndia News