Sanjay Shripatrao Katkar

Sanjay Shripatrao Katkar Municipal Commissioner, Meera-Bhayander Municipal Corporation, Bhayander.

छत्रपती शिवाजी महाराज: एक आदर्श व्यवस्थापक आणि दूरदृष्टी असलेले शासकछत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट...
19/02/2025

छत्रपती शिवाजी महाराज: एक आदर्श व्यवस्थापक आणि दूरदृष्टी असलेले शासक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये ही आज ही आदर्श मानली जातात. शिवरायांनी एक सुबक आणि पारदर्शक प्रशासन यंत्रणा उभारली. त्यांनी हिंदवी स्वराज्यात न्यायव्यवस्था मजबूत केली, जिथे सर्वांना समान न्याय मिळत असे. कृषी आणि व्यापारास चालना देण्यासाठी धोरणे राबवली. त्यांनी समुद्री व्यापार सुरक्षित करण्यासाठी आरमार बांधले आणि सुसज्ज किल्ले उभारले. त्यांच्या लष्करी डावपेचांमध्ये वेगवान हालचाल, स्थानिक भूगोलाचा उपयोग, आणि ‘गनिमी कावा’ यासारख्या कल्पक रणनीती होत्या.

आजच्या शासन व्यवस्थापन क्षेत्रातही शिवाजी महाराजांच्या धोरणांमधून नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि धोरणात्मक विचार करण्याची प्रेरणा घेता येते. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपण आपल्या क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करू शकतो.
जय शिवाजी! जय भारत! 🚩

hashtag hashtag hashtag 0 hashtag hashtag hashtag hashtag hashtag hashtag hashtag hashtag

13/02/2025

चेंजमेकर लॅब्स' उपक्रमांतर्गत मनपा विद्यार्थ्यांनी दाखवली सामाजिक जाण आणि कृती!

‘चेंजमेकर लॅब्स फॉर स्कूल्स’ या उपक्रमांतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण मिळाले. यातून शिक्षकांनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गट पाडून त्यांना समस्या सोडवण्याच्या पद्धती आणि कौशल्ये शिकविली.
मग विद्यार्थ्यांनी, सामाजिक समस्यांचे आकलन करून विद्यार्थ्यांनी स्थानिक पातळीवर संशोधन केले आणि प्रभावी उपाययोजना सुचवल्या. त्यांनी समाजपरिवर्तनाचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केला. शिक्षणाच्या माध्यमातून नव्या पिढीला जबाबदारीची जाणीव करून देणारा हा उपक्रम ठरला. या उपक्रमात, विद्यार्थ्यांच्या उपाययोजनात्मक प्रकल्पांचे मूल्यमापन करून, अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

12/02/2025

महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय!
उपक्रमाची यशस्वी सांगता! महिलांच्या उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका आणि नीती आयोगाच्या Award to Reward उपक्रमाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. घरगुती फराळ विक्रीतून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आवश्यक व्यावसायिक प्रशिक्षण, मध्यवर्ती स्वयंपाकघर आणि सर्व साधनसामग्री प्रदान करण्यात आली आहे.
आता या महिला स्वतःच्या उद्योगाच्या प्रवासाला सुरुवात करत आहेत! महापालिका त्यांच्या सदैव त्यांच्या पाठिशी राहील.

फराळ सखीच्या महिलांचा हा प्रवास म्हणजे, आत्मनिर्भरतेची प्रेरणादायी गोष्ट आहे.



NITI Aayog
Women Entrepreneurship Platform
MBMC- Mira Bhaindar Municipal Corporation

ई-गव्हर्नन्समध्ये मिरा भाईंदर अग्रेसर,महाराष्ट्रात ५व्या क्रमांकावर!पब्लिक रिसर्च ऑर्गनायझेशनच्या अहवालात महाराष्ट्रातील...
10/02/2025

ई-गव्हर्नन्समध्ये मिरा भाईंदर अग्रेसर,
महाराष्ट्रात ५व्या क्रमांकावर!

पब्लिक रिसर्च ऑर्गनायझेशनच्या अहवालात महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये मिरा भाईंदर महानगरपालिकेने पाचवा क्रमांक पटकावला आहे. मुंबई महानगर प्रदेश (MMR) मध्ये मुंबई चौथ्या स्थानी तर, मिरा भाईंदरने पाचवे स्थान मिळवले आहे.
महानगरपालिकेने आपल्या डिजिटल सेवांमध्ये मोठी सुधारणा केली आहे. मोबाइल अ‍ॅप अद्ययावत करणे, ऑनलाइन पेमेंट आणि सेवा, एआय (AI) आधारित चॅटबॉट, आणि तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
हा यशस्वी प्रवास महापालिका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांच्या मेहनतीमुळे शक्य झाला असून, भविष्यात ई-गव्हर्नन्सच्या नव्या संधींवर भर दिला जाणार आहे.

29/01/2025

मिरा भाईंदर महानगरपालिका आणि आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅटच्या संयुक्त विद्यमाने हवामान कृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हवामान कृती आराखडा जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे (MITRA) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी (भा.प्र.से) होते. तसेच महाप्रीतचे (MAHAPREIT) व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाली (भा.प्र.से) यांनीही शाश्वत विकासाबाबत सादरीकरण केले.

या कार्यक्रमात, मिरा भाईंदर शहराचा शाश्वत विकास करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. विशेषत: पूरस्थिती व्यवस्थापन, पाणी समस्या दूर करणे, वाहतूक कोंडीचे व्यवस्थापन, कार्बन उत्सर्जन शून्यावर आणणे आदी समस्या सोडविण्यासाठी चर्चा केली गेली. यातील उपाययोजनांची येत्या काळात टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी केली जाणार आहे.

भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! हा दिवस संविधानाच्या अंमलबजावणीचा, यामुळे भारत स्वतंत्र, लोकशाही...
26/01/2025

भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! हा दिवस संविधानाच्या अंमलबजावणीचा, यामुळे भारत स्वतंत्र, लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष देश बनला.
#प्रजासत्ताकदिन

23/01/2025

दर गुरुवारप्रमाणे आज मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्यालयात नागरिक भेट आणि संवाद झाला. आपल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आणि तुमच्या प्रत्येक शंकेचे निवारण करण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत. उपस्थित असलेल्या प्रत्येक नागरिकाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

#मिराभाईंदरमहानगरपालिका #नागरिकभेट #आयुक्तालय #शहरविकास #नागरिकांशीसंवाद

13/01/2025

मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात साप्ताहीक आढावा बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान, माननीय मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निश्चित केलेल्या,सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अंमलबाजवणीबाबत आढावा घेण्यात आला आणि त्यादृष्टीने MBMC- Mira Bhaindar Municipal Corporation च्या सर्व विभाग प्रमुखांसह पुढील कार्यवाहीविषयी नियोजनात्मक चर्चा करण्यात आली, यामुळे मिरा भाईंदरच्या नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर होणार आहे.

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
01/01/2025

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमची उणीव कधीही भरून निघणार नाही, पण तुमचा आदर्श कायमस्वरूपी आमच्या हृदयात जिवंत राहील.
10/10/2024

तुमची उणीव कधीही भरून निघणार नाही, पण तुमचा आदर्श कायमस्वरूपी आमच्या हृदयात जिवंत राहील.

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanjay Shripatrao Katkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share