29/07/2026
बोरिवली येथील कान्हेरी लेणी तसेच दहिसर येथील मंडपेश्वर लेणी येथे वर्षावास प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहिलो.
या पवित्र प्रसंगी भगवान बुद्धांच्या धम्मपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याचा संकल्प पुन्हा दृढ करण्यात आला. वर्षावासाच्या निमित्ताने धम्म, शील, प्रज्ञा आणि करुणेच्या मार्गावर अधिक निष्ठेने वाटचाल करण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने धम्मबंधू-भगिनी उपस्थित होते. सर्व उपस्थितांशी संवाद साधून धम्मप्रसार, सामाजिक एकजूट आणि संविधानिक मूल्यांच्या जतनासाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
जय भीम | नमो बुद्धाय!