Sunil Jain Khabia

Sunil Jain Khabia Shivsena Andheri west Co-ordinator, Social Activist,,
Happy-go-lucky person & a proud Indian.

19/12/2025

"शाखा तिथे दवाखाना"

अंधेरी पश्चिम विधानसभेतील ७ शाखांमधून २५००० हुन अधिक नागरिकांनी लाभ घेतला.

महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलनामध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे अंधेरी पश्चिम विधानसभेच्या सहकाऱ्यांसमवेत सहभागी झालो.महा...
11/08/2025

महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलनामध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे अंधेरी पश्चिम विधानसभेच्या सहकाऱ्यांसमवेत सहभागी झालो.

महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे !

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना अंधेरी पश्चिम विधानसभेच्यावतीने युवा विभाग अधिकारी श्री ह्रितिक मांजरेकर व शाखा क...
11/08/2025

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना अंधेरी पश्चिम विधानसभेच्यावतीने युवा विभाग अधिकारी श्री ह्रितिक मांजरेकर व शाखा क्र. ७० च्या वतीने युवा शाखा अधिकारी श्री सिध्देश सुर्वे यांनी "भव्य दहीहंडी सराव शिबीर २०२५" चे आयोजन केले होते. सदरसमयी भेट देऊन बाळगोपाळांना शुभेच्छा दिल्या तसेच उत्तम मानवी मनोरे रचल्याबद्दल त्यांचे शौर्य, कला व धाडसाचे प्रदर्शन केल्याबद्दल अभिनंदन केले.

गणेश चौक, डि. एन. नगर व अंबे माता चौक इर्ला येथे दोन्ही आयोजकांनी प्रशंसनीय आयोजन केले होते. मनापासून अभिनंदन व शुभेच्छा !

महाराष्ट्राचा बुलंद आवाज अन् बाळासाहेबांचा आशीर्वादशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)!
02/06/2025

महाराष्ट्राचा बुलंद आवाज अन् बाळासाहेबांचा आशीर्वाद
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)!

छत्रपतींच्या पराक्रमाची, संतांच्या भक्तीची, आणि क्रांतिकारकांच्या त्यागाची भूमी माझा अभिमान, माझा महाराष्ट्र!महाराष्ट्र ...
01/05/2025

छत्रपतींच्या पराक्रमाची, संतांच्या भक्तीची, आणि क्रांतिकारकांच्या त्यागाची भूमी
माझा अभिमान, माझा महाराष्ट्र!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#महाराष्ट्रदिन

पुढच्या ४८ तासात जर हा प्रश्न सुटला नाही, तर शिवसैनिक आणि मुंबईकर मुंबईतल्या प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर धडक मोर्चा घेऊन जाणार...
12/04/2025

पुढच्या ४८ तासात जर हा प्रश्न सुटला नाही, तर शिवसैनिक आणि मुंबईकर मुंबईतल्या प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर धडक मोर्चा घेऊन जाणार आणि 'वॉर्ड ऑफिसर' ना जाब विचारणार!

प्रभाग क्र. ६६ व ६७ मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी शिवसे...
02/04/2025

प्रभाग क्र. ६६ व ६७ मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेच्यावतीने मनपा के/पश्चिम प्रभागाच्या "परिरक्षण चौकी", आझाद गल्ली, सी. डी. बर्फीवाला मार्ग येथे धडक भेट देण्यात आली.

यावेळी संबंधित अधिकारी रजेवर असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांना समस्या सविस्तर मांडण्यात आल्या व तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. स्थानिक नागरिकांना नाले सफाई, मलनिःसारण वाहिनी, गटारे, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरावस्था, पथदिवे आणि इतर नागरी सुविधांबाबत अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी महिला विधानसभा सहसंघटक सौ. ज्योत्स्नाताई दिघे, शाखाप्रमुख श्री. उदय महाले, महिला सहउपविभाग संघटक श्रीमती प्रज्ञा सावंत, महिला शाखा संघटक सौ स्वाती तावडे, तसेच अन्य महिला व पुरुष पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

तैवानमध्ये होणाऱ्या U-15 आशिया कप महिला सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी रवाना होणाऱ्या भारतीय संघाला मुंबई उपनगर जिल्हा...
25/03/2025

तैवानमध्ये होणाऱ्या U-15 आशिया कप महिला सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी रवाना होणाऱ्या भारतीय संघाला मुंबई उपनगर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनच्या वतीने उपाध्यक्ष श्री सुनिल जैन खाबिया यांनी छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळावर भेटून शुभेच्छा दिल्या!

यावेळी सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडिया चे सचिव डॉ. प्रविण अनोकर, माजी सचिव श्री एल. आर. मौर्या, उपाध्यक्ष व महाराष्ट्र सचिव डॉ. प्रदिप तळवलकर गुरुजी, महाराष्ट्र संयुक्त सचिव श्री गोकुळ तांदळे, मुंबई सचिव श्री त्रिभुवन सिंग, तसेच श्री नितीन पाटील, श्री विजय कदम, श्री हर्षल मोरे, श्री प्रितीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवावा याच शुभेच्छा! विजयी भव!

Address

Veera Desai Road
Mumbai
400053

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918879595619

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunil Jain Khabia posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sunil Jain Khabia:

Share

Category

food distribution

food distribution