22/08/2025
मराठी माणूस आणि मुंबई - लेख पंधरावा
बिल्डर, बिल्डिंग मटेरियल ,हार्डवेअर, माशांचे व्यापारी, कृषी व्यवसायिक, असे वेगवेगळ्या विषयावरती छोटे मराठी बिझनेस ग्रुप आपण बनवतोय.
या पोस्टला तुमच्या सगळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ही मराठी मानसिकता खूप वेगाने बदलत आहे
याचे लक्षण आहे, सर्वांना धन्यवाद.
आता याच विषयाचा मी आज लेख येत आहे. मित्रांनो पटेल, लोढा, लोखंडवाला, गाला झवेरी रुस्तमजी, दवे हिरानंदानी, अशी सगळी मोठ्या बिल्डरची नाव आपण ऐकतो, आहेत अर्थात काही मराठी नावे सापडतात उदाहरणार्थ परांजपे, हावरे , मगर पण परप्रांतीय बिल्डरच्या तुलनेने खूप कमी मराठी नावे समोर येतात. आपण या एका व्यवसायाचे उदाहरण घेऊ, एकूणच मुंबईतले आणि आसपासचे बिल्डरची नाव आपण घेतली तर पाच टक्के सुद्धा मराठी नावे आपल्याला सापडणार नाहीत.
का व्हावी अशी परिस्थिती आपण कधी विचार केलाय का ?
मुंबईत आता घर घेणे हे मराठी माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे, टेनंट बिल्डिंगमध्ये , एक गरीबा सारखी पार्किंग नसलेली बिल्डिंग येथे 295 / 325 रुपये चे घर मूळ मराठी माणसाला दिले जाते , ती सुद्धा खूप मोठी मेहरबानी केल्यासारखं. त्यापुढे एक आलिशान टॉवर उभा राहतो 50 60 मजल्यांचा आणि येथे दोन तीन चार बीएचके फ्लॅट अमराठी लोक घेतात.
आता मुंबईतले बिल्डर आणि मुंबईतली घरे हा विषय सोडून देऊ, ही घरे घेण्याची क्षमता मराठी माणसांमध्ये येईल याकरता नक्की काम करूया पण आता मुंबईच्या बाहेर म्हणजे नवी मुंबई पनवेल, वसई ठाणे, घोडबंदर आणि कल्याण डोंबिवली अंबरनाथ आता नव्याने विकसित होणारी महामुंबई म्हणजेच द्रोणागिरी ऊरण उलवे पुढे जाऊन अलिबाग पेण च्या आसपासची गावे येथे मोठ-मोठे हाउसिंग कॉम्प्लेक्स बनायला लागले, पलावा,
रुस्तमजी
हिरानंदानी, साई वर्ल्ड, भूमी, खूप सारे बिल्डर आपल्याला पाहायला मिळतात,
त्यांनी विकसित केलेल्या 200 एकर, चारशे एकर 1000 एकर अशा भव्य दिव्य टाउनशिप आपण पाहतो, खूप सुंदर डेव्हलपमेंट अगदी युरोप सारखे आणि त्यात हजारो घरे, सुदैवाने या टाऊनशिप मधील घरे मराठी माणसांना परवडतात अजून तरी, यातली किती बिल्डर मराठी आहेत, आणि नाहीत तर का का नाहीत ? कधी आपण विचार केला ?
आता हे सगळे मोठे कॉम्प्लेक्स मोठ्या टाऊनशिप विकसित होतात आमच्या कोकणात, जमिनीचे मालक कोण म्हात्रे, मोकल, भोईर ,कोळी,ठाकूर, सगळे जमिनीचे मालक मराठी, या कॉम्प्लेक्स मध्ये घरे विकत घेणारे 80 टक्के मराठी, बिल्डिंगला परवानगी देणारे महानगरपालिकेचे अधिकारी आणि मदत करणारे नेते सगळे मराठी फक्त यात प्रचंड प्रॉफिट कमवणारा एकच घटक म्हणजे बिल्डर गुजराती मारवाडी सिंधी पंजाबी , अगदी ते टॉवर बांधणारे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मराठी असतात, घर विकत घेणाऱ्यांचे पैसे आणि यांना फायनान्स करणारे बरेचशे मराठी असतात म्हणजे फायनान्स सुद्धा मराठी मात्र व्यवसाय करणारा माणूस अमराठी, आता तर हे सर्व लोक मुंबईच्या आसपास दोनशे एकर हजार एकर अशा जागा विकत घेत आहेत आणि आमचे मराठी स्पर्धा करून आपल्या उरल्या सुरल्या जागा विकत आहेत, मुंबईच्या आसपासच कोकण 90% लोकांनी विकले. भविष्यात त्याच जागेमध्ये झालेल्या एका बिल्डिंगमध्ये एक किंवा दोन घरे जमिनी विकणारे विकत घेतील. म्हणजे एक लाख फूट जमीन विकली आणि दोन हजार फुटाचा घर घेतल . बऱ्याच ठिकाणी आपल्याच जमिनी विकून त्यावर उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांवर वॉचमन म्हणून काम करताना आमची मराठी माणसे दिसतात. हे असं नव्या मुंबईत कल्याण डोंबिवली मध्ये वसई विरार मध्ये घडलं आता हेच त्याच्या पुढच्या मुंबईत म्हणजे पेण अलिबाग आणि त्यानंतर खेड चिपळूण ला होणार आहे. हे असं घडणार हे सांगायला कुठल्याही तज्ञाची गरज नाही हे असंच घडणार आहे. दिलीप पन्नास वर्षे एकाच पद्धतीने आम्ही बनवले जात आहोत.
कधीतरी मराठी माणसे आपण एकत्र असा विचार करणार आहोत का जमिनी पण आमच्या असतील, आणि यावर कॉम्प्लेक्स पण आम्ही डेव्हलप करू मालक सुद्धा आम्ही असु
सतीश मगर नावाच्या एका इंजिनियरने आपल्या मगर आडनाव्याच्या लोकांच्या जमिनी एकत्र करून त्यावर मगरपट्टा नावाची टाउनशिप विकसित केली, राहायला बाहेरचे लोक आले पण टाऊनशिप ची मालकी मगर आडनावाच्या लोकांकडेच ठेवतो तिथले कॉलेज, तिथलं थिएटर, तिथली ऑफिसेस ,इथल्या आयटीच्या बिल्डिंग, सर्वात महत्त्वाचं तिथे विकसित झालेले छोटे मोठे व्यवसाय सगळ्याची मालकी मगर आडनावांच्या लोकांकडे, आणि प्रत्येक मगर कुटुंबाकडे मर्सिडीज घेता येईल इतकी आर्थिक समृद्धी सतीश मगर नावाच्या एका माणसाने निर्माण केले.
पण असे सतीश मगर. म्हात्रे भोईर परब गावकर पाटील आपल्याला का निर्माण करता येत नाही ? का सर्व म्हात्रे किंवा भोईर परब गावकर एकत्र येऊन आपल्या जमिनीवर आपली टाऊनशिप विकसित करत आणि यात आपल्याच मराठी लोकांना घर उपलब्ध करून देत. यातून प्रॉफिट कमवून मोठा बिल्डर ब्रँड आपलाच का तयार होत नाही. हे सगळं शक्य आहे पण भांडणातून आम्हाला मराठी माणसांना कधी वेळ मिळेल आम्ही कधी एकत्र येणार आम्ही वेगवेगळ्या व्यवसायांचं प्रशिक्षण आणि एका दिशेने कधी काम करणार, राजस्थान आणि गुजरात मधून येऊन लोक शून्य भांडवल असताना जमीन नाही स्थानिक पाठबळ नाही असं असताना परप्रांतीय लोक आज मोठमोठे बिल्डर बनले , असे मराठी माणसे पण बनवू शकले असते खरे तर जागा आमच्या मालकीच्या होत्या, त्यांनी तर जागा विकत घेऊन टाऊनशिप उभ्या केल्या आम्हाला आमच्या असलेल्या जागांवर टाऊनशिप करायच्या होत्या पण आम्ही नाही केलं, आम्हाला आजही वाटतं आम्ही आमच्या जातीचे,समाजाचे, भाषेच ,गाववाले, आमदार नगरसेवक तयार केले की आमचा विकास होईल, खरंच हे शक्य आहे का ? असं व्हायचं असतं तर तो कधीच झाला असता.
चला उशिरा का होईना आता जागे होण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला एक 100 तरुण मराठी बिल्डर एकत्र येऊन अशा स्वरूपाचे कॉम्प्लेक्स टाउनशिप प्रोजेक्ट उभे करता येतील का या दृष्टीने प्रयत्न करूया, यासाठी एकमेकांना मदत करू,प्रशिक्षण घेऊ, समजून घेऊ फायनान्स कसा उभा करतात याचं ज्ञान घेऊ यासाठी आवश्यक असलेले स्टार्टअप उभे करूया, शेअर मार्केटचा अभ्यास करूया कंपन्यांचे शेअर्स उभे करूया, आमचं कोकण आमची महामुंबई इथे विकासाच्या प्रक्रियेत सर्वाधिक वाटा आमच्या स्थानिक माणसाचा असेल आमच्या मराठी माणसाचा असेल असा आग्रह धरूया केवळ भावनिक नाही तर यासाठी रात्रंदिवस काम करूया, मराठी माणसांकडे पैसे आहेत जे बाकीच्यांना इन्व्हेस्टमेंट म्हणून देतात त्यांना मराठी उद्योजकांवर विश्वास ठेवण्यासाठी विनंती करूया आणि त्यांच्या विश्वासाला पात्र सुद्धा ठरूया. होय हे शक्य आहे जर सतीश मगर करू शकतात जर नांदेड सिटी वाले करू शकतात तर म्हात्रे ठाकूर भोईर, पाटील परब गावकर सुद्धा करू शकतात, मराठी माणसांनी ठरवण्याची आवश्यकता आहे नक्की सतीश मगर सारखी अनुभवी माणसे आपल्याला मार्गदर्शन करतील दिशा दाखवतील. यापुढे वेगाने विकसित होणारी मुंबई महामुंबई तिसरी मुंबई आणि कोकण येथे सर्वाधिक विकासाच्या प्रक्रियेत मराठी माणसाचा सहभाग असेल यातून मराठी उद्योजक आणि मराठी ब्रँड सुद्धा उभे राहतील यासाठी काम करूया.
मी एक रियल इस्टेट इंडस्ट्रीचा उदाहरण दिले आहे असंच बांधकाम साहित्याबद्दल, असंच बेकरी , मिठाईची दुकाने कपडा मार्केट होजियरी मार्केट किराणा व्यापार माशांचे मार्केट हापूस आंब्याचे मार्केट कृषी उत्पादनांचे मार्केट सर्व विषयात मराठी उद्योजकांनी पुढे आले पाहिजे आणि यासाठी पुढची 25 वर्ष मान खाली घालून फक्त काम काम आणि काम केले पाहिजे, छत्रपती शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले हा विचार मनाशी धरून मराठी तरुणांनी, उद्योगी मुलांनी या पुढच्या काळात एकत्र येऊन एकमेकांच्या मदतीने व्यावसायिक साम्राज्य केवळ मुंबईत नाही देशात निर्माण केलं पाहिजे आणि त्यासाठी योग्य दिशेने सातत्याने काम करणारी एक रचनात्मक चळवळ हवी आणि शिवस्वराज्य मराठी उद्योजक परिवार आणि संघटनेच्या माध्यमातून आपण व्यवसायाच्या वेगवेगळ्या विषयांमध्ये एक चळवळ सुरू करत आहोत आणि या प्रत्येक विषयात पाटून काम करणार्या तरुण उद्योगी उद्योजक मराठी मुलांची टीम आपण उभे करणार आहोत.
जय शिवराय
संजय यादवराव
समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स
शिवस्वराज्य मराठी उद्योजक परिवार
शिवस्वराज्य मराठी संघटना