24/08/2026
माटुंगा लेबर कॅम्प येथील 50 ते 60 वर्षे जुने असलेले भाजी विक्रेते फेरीवाले यांच्या गाड्या धंदे लावण्याचे बाकडे कुठलीही पूर्वसूचना न देता बीएमसी आणि पोलिसांमार्फत तोडून टाकण्यात आले आहे.
आज आठ दिवसापासून त्यांना कुठल्याही प्रकारचा धंदा करू दिले जात नाही.
त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ह्या घटनेची माहिती जशी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार झोपडपट्टी सुधार विभाग दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष *श्री कुणाल भजन गणवीर* यांना कळली असता त्यांनी त्वरित सर्व फेरीवाल्या ंना जाऊन भेट दिली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना या घडलेल्या अन्यायाविरुद्ध मदत करण्याचे आश्वासन दिले